Tejashree Pradhan Marriage मालिका विश्वातील सर्वांची आवडती अभिनेत्री म्हटलं की, तेजस्वी प्रधान हे नाव डोळ्यासमोर येतं. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत दिसून येतेय.
तेजश्रीने आजपर्यंत होणार सुन मी या घरची, अग्ग बाई सासुबाई आणि आता प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. परंतु वैयक्तिक आयुष्यात मात्र ती एकटी आहे. तेजश्री प्रधान लग्न करणार अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर पसरत असतात.
आता मात्र स्वतः तेजश्रीने सांगितलंय की, तिला लग्न करायचं आहे की नाही, आणि तिला कसा मुलगा हवा आहे ?
Tejashree Pradhan Marriage
तेजश्रीने एका मुलाखती सांगितलं की, लोकांना असं वाटतं. मला लग्नचं करायचं नाहीये. माझं लक्ष माझ्या करिअरवर आहे. पण तसं काही नाहीये. मला लग्न करायचंय. Tejashree Pradhan Marriage मला सुद्धा माझी प्रेमाची माणसं, माझं कुटुंब हवं आहे. पण लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मला लग्नाची स्थळचं येत नाहीत.
अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या मुलीचं नाव माहितेय का ?
परंतु ज्या दिवशी मला आवडणारं स्थळ, मला आवडणारा मुलगा माझ्या आयुष्यातील येईल, त्यादिवशी मी नक्कीचं लग्न करेल आणि संसार सुरू करेल. मी खूप बडबडी आहे. त्यामुळे माझं ऐकून घेणारा मुलगा मला हवा आहे. तसंच मी काही पार्टीला जाणारी मुलगी नाहीये, मला माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो. त्यामुळे अशाचं विचारसरणीचा मुलगा मला हवा आहे.
तेजश्री प्रधानचं पहिलं लग्न
आपणा सर्वांना माहितीये की, होणार सुन मी या घरची या मालिकेदरम्यान शशांक केतकर या अभिनेत्या बरोबर काम करत असताना तेजश्री प्रधानचं त्याच्यावर प्रेम जडलं आणि या दोघांनी लग्न केलं होतं. परंतु अवघ्या वर्षभरातच या दोघांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर शशांक केतकरने दुसरं लग्न केलं आणि आता त्याचा सुखी संसार सुरू आहे. परंतु तेजश्री प्रधानने Tejashree Pradhan Marriage मात्र अजूनही लग्न केलेलं नाहीये. त्यामुळेच ही आपली आवडती अभिनेत्री कधी लग्न करणार, असं प्रत्येक फॅनला वाटत असतं.
आता स्वतः तेजश्रीने सांगितलंय की, तिला लग्न करण्याची इच्छा आहे. त्यामुळे सर्वच फॅन्सला खूप आनंद झाला आहे. मग आता तेजश्रीच्या स्वप्नातला राजकुमार तिच्यासमोर कधी येईल, आपण याचीच वाट पाहूया.
मनोरंजन विश्वातील अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग बातम्या जाणून घेण्यासाठी, आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !