TATA Curve SUV : ऑटोमोबाईल बाजारात धूमधडाका करायला येतेय टाटाची ही धमाकेदार एसयूव्ही

Tata Curve SUV

TATA Curve SUV भारतातील ऑटोमोबाईल मार्केट सध्या बुमवर आहे. लोक मोठ्या प्रमाणात चारचाकी गाड्या खरेदी करताय. त्यामुळे देशातील फोर व्हीलर कंपन्याही नवनवीन मॉडेल लॉन्च करत आहेत. मारुती सुजूकी, ह्युंदाई, किया, आणि टाटासारख्या भारतीय कंपनीनेसुद्धा फोर व्हीलर मार्केटमध्ये आपला जम बसवला आहे. एकानंतर एक चांगल्या गाड्या लॉन्च करत त्यांनी मार्केटमध्ये आपली पकड मजबूत केली आहे.

ऑटोमोबाईल मार्केटमध्ये विविध सेगमेंटस असतात. हॅचबॅक, सिडान, फॅमिली कार आणि एसयूव्हीपर्यंत. एसयूव्हीमध्ये सुद्धा विविध सेगमेंट आहेत आणि असंच एक सेगमेंट आहे मिड साईज एसयूव्ही आणि या सेगमेंटशी लीडर आहे ह्युंदाई क्रेटा.

Hyundai Creta Vs Tata Curve
Hyundai Creta Vs Tata Curve

TATA Curve SUV

मागील अनेक वर्षांपासून क्रेटाने या सेगमेंटमध्ये आपला जम बसवला आहे. काही महिन्यांपूर्वी क्रेटाचं नवीन व्हर्जन लाँच करण्यात आलं होतं, जे  मोठ्या प्रमाणात हिट झालं आणि ही गाडी बाजारात खूप विकली जातेय.

पण आता क्रेटाचा खेळ बिघडवण्यासाठी टाटा मोटर्स एक खूप मोठी खेळी खेळणार आहे. त्यांची नवीन कोरी एसयूव्ही आता या सेगमेंटमध्ये येणार आहे आणि गाडीचं नाव असेल टाटा कर्व (TATA Curve SUV). मागील अनेक वर्षांपासून या गाडीबद्दल चर्चा आहे. मागील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये टाटाने कन्सेप्ट व्हर्जन दाखवलं होतं.

Tata Curve SUV
Tata Curve SUV

बाजारात येणार टाटा कर्व एसयूव्ही

तेव्हा या गाडीबद्दल चांगलीचं चर्चा रंगली होती आणि आता लवकरचं टाटा कर्व बाजारात येणार आहे. असं म्हटलं जात आहे की, टाटा कर्व (TATA Curve SUV) ही एसयूव्ही असली तरी, तिला खूप स्टाईलमध्ये डिझाईन करण्यात आलंय. म्हणजेचं या कारचं डिझाईन खूप अग्रेसिव्ह असेल. आतापर्यंत टाटा कर्व जे फोटोज लीक झाले आहेत, त्यावरून डिझाईनच्या बाबतीत ती क्रेटाला नक्कीचं पछाडेल, यात शंका नाही.

Tata Curve Features

आता आपण टाटा कर्वमध्ये काय काय फीचर्स असतील ते पाहूयात.

या गाडीत कूप स्टाईल स्लोपिंग लाईन, 18 इंच ऍलोय व्हील्स, फोर स्पोक स्टेरिंग व्हील, फुल साईज इन्फोटेनमेंट सिस्टिम, फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि व्हेंटिलेटेड सीटस असे फीचर्स असतील.

या आहेत भारतातील टॉप १० इलेकट्रीक फोर व्हिलर

सुरुवातीला TATA Curve SUV ही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात येईल आणि येत्या काही काळात तिला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही लॉन्च करण्याचा टाटाचा उद्देश आहे.

एकूणचं टाटा कर्वचे हे डिझाईन आणि फीचर्स पाहता, ही गाडी लवकरचं मार्केट लीडर होईल, यात शंका नाही.

तर तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि ऑटोमोबाईल जगताशी निगडित अशाचं नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top