चेहऱ्यावर खूप पिंपल्स येताय, हा लिव्हर खराब होण्याचा संकेत तर नाही ना ?

लिव्हर खराब होण्याचा संकेत

लिव्हर खराब होण्याचा संकेत. जसा जसा माणूस प्रगत होत चाललाय, तसं तसं माणसाला आरोग्याच्या विविध समस्या होणंही वाढलंय. अशीचं एक आरोग्याची समस्या आहे लिव्हर खराब होणं किंवा लिव्हर फेल्युअर होण. आपलं शरीर शरीरात कोणताही बदल झाला, तर त्याबद्दल आधी संकेत देत असतं. त्याचप्रकारे लिव्हर खराब होणं किंवा फेल्युअर याबद्दलही संकेत मिळत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबद्दल सांगणार आहोत.

लिव्हर खराब होण्याचा संकेत

1) त्वचा पिवळी पडणे : जर तुमचं लिव्हर डॅमेज होत असेल, तर रक्तात बिलीरुबिनचं प्रमाण वाढतं आणि स्किन पिवळी पडते. त्यामुळे या संकेतांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

2) हाताचे तळवे लालसर होणे : अनेकदा तुम्हाला तुमच्या हाताचे तळवे लालसर झालेले दिसतील. हे याचं लक्षण आहे की, तुमच्या हातामध्ये रक्ताचं सर्कुलेशन वाढलंय आणि लिव्हर खराब होत असेल, तर हा एक संकेत आहे.

3) चेहरा सुजणे : पुन्हा पुन्हा चेहरा सुजणे हे सुद्धा लिव्हर डॅमेज असल्याचं एक लक्षण आहे.

4) चेहऱ्यावर खाज येणे आणि चट्टे पडणं : जर चेहऱ्यावर खूप जास्त खाज येतेय, त्याचबरोबर लाल आणि पिवळे चट्टे पडताय, तर हे सुद्धा लिव्हर डॅमेज होण्याचं एक मोठं लक्षण असू शकतं.

वजन कमी करण्यासाठी हा खास उपाय करा

5) चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येणं : अनेकदा शरीरातील घातक द्रव्य शरीराबाहेर न टाकले गेल्यामुळे चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणात पिंपल्स येतात. ते सुद्धा लिव्हर खराब होण्याचं एक लक्षणचं आहे.

एकूणचं कोणताही आजार हा जर वेळेआधी ट्रीट केला गेला, तर तो बरा होण्याची शक्यता असते. परंतु वेळ निघून गेल्यावर कितीही महागडी ट्रीटमेंट घेतली, मोठा डॉक्टर आणला, तरी तो रोग बरा होत नाही. वेळ निघून गेलेली असते.

म्हणूनचं आपल्या शरीरात कोणते बदल होत आहेत, नेहमीपेक्षा गोष्टी वेगळ्या प्रकारे घडत आहेत, याकडे लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. वेळीच जर आपण हे संकेत ओळखले, तर अनेक आजारांना आपण तोंड देऊ शकतो. त्यांचा सामना करू शकतो आणि योग्य ट्रीटमेंट घेऊन या आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो.

आरोग्याशी निगडित अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top