सुबोध भावेची नवी मालिका. सध्या मराठी वाहिन्यांमध्ये एकानंतर एक नवीन मालिका लॉन्च करण्याची स्पर्धा सुरू आहे. स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी मराठी या वाहिन्या अनेक नवीन मालिका लॉन्च करताय. त्यात आता सोनी मराठी ही मागे राहिलेली नाही.
लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुबोध भावेची नवीन मालिका तू भेटशी नव्याने सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला होता. जो प्रेक्षकांना खूपच आवडलेला. या प्रोमोमध्ये सुबोध भावे आणि शिवानी सोनार या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्याचं दिसलं. या मालिकेत सुबोध भावे हा 40 वर्षाच्या एका प्रोफेसरची आणि 20 वर्षांपूर्वी तो जेव्हा या कॉलेजमध्ये शिकत होता, त्या तरुणाची भूमिका साकारणार आहे.
सुबोध भावेची नवी मालिका
सुबोध भावेच्या या डबल रोलची कमाल होणार आहे AI च्या मदतीने. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाचं असा एखादा प्रयोग करण्यात येतोय. त्यामुळे हा प्रोमो सगळीकडेचं व्हायरल झाला होता आणि प्रेक्षक खूप उत्सुकतेने या मालिकेची वाट पाहत होते. ही मालिका टेलिव्हिजनवर कधी सुरू होणार, हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता.
परंतु आता या प्रश्नाचे उत्तर मिळालंय. तू भेटशी नव्याने मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात दिसून येत आहे ही मालिका सोनी मराठीवर येत्या 8 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक खूपचं उत्सुकतेने मालिकेची वाट पाहताय.
सुबोध भावे टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा कमबॅक करणार म्हणून प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. त्यातचं त्याची जोडी अभिनेत्री शिवानी सोनार बरोबर आहे. शिवानी सोनार खूपच चांगली अभिनेत्री आहे. याआधी सुबोध भावेची तुला पाहते रे मालिका टेलिव्हिजनवर खूप गाजली होती.
श्रेया बुगडे दिसणार या रियालिटी शोमध्ये
तसंच शिवानी सोनारने सुद्धा राजा राणीची गं जोडी या मालिकेत खूप महत्त्वाची भूमिका साकारली आणि तिचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. काही दिवसांपूर्वीच शिवानी सोनारने साखरपुडा करून प्रेक्षकांना आनंदाचा धक्का दिला होता आणि आता तिची नवीन मालिका येणार म्हटल्यावर सगळे पेक्षक खूप खुश झाले आहेत.
तर तुम्ही सुद्धा एक्साईटेड आहात का, तू भेटशी नव्याने या नवीन मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार या दोघांची जोडी पाहायला ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !