Soldier Father Daughter Story “अहो, याना लवकर. मी आणि आपली छकुली तुमची खूप वाट पाहतोय.” असं म्हणून प्रतीक्षा सीमेवर तैनात असलेल्या आपल्या नवऱ्याला घरी येण्याची गळ घालते. आर्मीमध्ये सैनिक असलेला प्रतीक म्हणतो, “अगं प्रतीक्षा महिन्याभरापूर्वीचं तर मी इकडे आलो आहे. आता लवकर सुट्टी नाही भेटणार. तु जे फोटोग्राफ पाठवलेत ना, त्यात मी पाहिलंय आपल्या छकुलीला. एकदम तुझ्यासारखी दिसते. हो फक्त नाक माझ्यासारखं आहे तिचं.”
प्रतीक्षा म्हणते, “नाही माझ्यासारखी नाही दिसत ती. अगदी तुमच्यासारखी दिसते आणि तिने तुमच्यासारखंचं सैनिक व्हावंझ तुमच्यासारखंचं शूर व्हावं, हीच माझी इच्छा आहे.” प्रतीक म्हणतो, “हो ही तर माझीपण इच्छा आहे. परंतु देशाचा सैनिक जेवढा शूर असतो, तेवढचं त्याचं कुटुंब आणि त्याची बायको सुद्धा शूर असते आणि हो स्वतःची काळजी घे. उगाचं मी तेथे नाही, म्हणून रडत बसू नको. वाईट मानून घेऊ नको. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत फोटोग्राफ आणि व्हिडिओ कॉल चालूचं राहतील.”
Soldier Father Daughter Story
प्रतीक्षा हो म्हणते. तरीही तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती म्हणते, “ठीक आहे, आता फोन कट करते, डॉक्टर आलेत” आणि ती फोन कट करते.
प्रतीक्षा आणि प्रतीक या दोघांचं अवघ्या वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं. प्रतीक आर्मीमध्ये होता आणि सीमेवर तैनात होता. महिन्याभरापूर्वीचं तो सुट्टीसाठी येऊन गेला. जवळपास पंधरा दिवस त्याने प्रतीक्षाबरोबर घालवले. Soldier Father Daughter Story परंतु मुलीचा जन्माच्या वेळेस मात्र त्याला सुट्टी मिळाली नाही. आता लवकरात लवकर त्याने सुट्टी घ्यावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. प्रतीक्षाला त्याची खूप आठवण येत होती. परंतु प्रतिक येऊ शकत नाही, हे तिलाही माहीत होतं.
प्रतीक्षाचे सासू आणि आई या दोघी प्रतीक्षाबरोबर वॉर्डमध्ये तर प्रतीक्षाचे सासरे आणि बाबा हे दोघे बाहेर बसलेले होते. आता सर्वांसाठी घरून डबा आणायचा, असा त्यांचा विचार सुरू होता. Soldier Father Daughter Story इतक्यात प्रतीक्षाच्या सासऱ्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. ते फोन उचलतात. तेव्हा त्यांना समोरून जी बातमी समजते, ती ऐकून त्यांना जबरदस्त धक्काचं बसतो आणि ते खाली कोसळतात.
प्रतीक्षाचे बाबा विचारतात, “काय झालं, तुम्ही असे खाली का बसलात ?” प्रतीक्षाचे सासरे सुन्न झालेले असतात. ते एक शब्दही बोलत नाही. प्रतीक्षाचे बाबा त्यांच्या हातून फोन घेतात आणि फोनवर बोलतात, Soldier Father Daughter Story तेव्हा त्यांना समजतं की, प्रतीक्षाचा नवरा प्रतीक सीमेवर शहीद झाला आहे. ही बातमी ऐकून त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं. आजचं आपली नात जन्माला आली आणि प्रतीक हे जग सोडून गेला, तो शहीद झाला या बातमीने त्यांचं हृदय पिळवटून जातं.
काही क्षण तर दोघे काहीचं बोलत नाही. प्रतीकचे बाबा म्हणतात, “आता काय करायचं, ही बातमी सर्वांना कशी सांगायची. उद्या प्रतीकचा मृतदेह आपल्या गावात येईल.” प्रतीक्षाचे बाबा म्हणतात, “सांगावं तर लागेलचं. Soldier Father Daughter Story परंतु एवढ्यात प्रतीक्षाला नाही सांगायचं.” प्रतीक्षाची आई आणि सासू बाहेर येतात आणि सांगतात, “आत मध्ये साफसफाई चालू आहे. म्हणून आम्ही बाहेर आलोय.” प्रतीक्षाचे बाबा म्हणतात, “तुम्ही दोघी चला माझ्याबरोबर बाहेर, एक महत्त्वाचं सांगायचंय.”
हे चौघे बाहेर येतात. तेव्हा प्रतीक्षाचे बाबा सांगतात, तुम्ही स्वतःला सावरा. खूप दुःखद बातमी आहे. आपला प्रतीक आता या जगात नाही. सीमेवर शहीद झाला आहे.” हे ऐकून या दोघींना जबर धक्काचं बसतो. Soldier Father Daughter Story प्रतीक्षाची आई रडू लागते. तर प्रतिकची आई म्हणते, “काय बोलताय तुम्ही हे. आता तर सुनबाई त्याच्याशी बोलली. तो असा कसा सोडून जाऊ शकतो आपल्याला. आज त्याच्या लेकीचा जन्म झालाय आणि हे कसं होऊ शकतं.” असं म्हणून प्रतीक्षा टाहो फोडते आणि रडू लागते.
प्रतीकचे बाबा आईला म्हणतात, “सावर स्वतःला. आता ही वेळ रडत बसायची नाही. आपल्या मुलाला वीरमरण आलंय. तो देशासाठी शहीद झाला आहे. आपण आता आपल्या सुनबाईला आणि नातीला जपायचं. Soldier Father Daughter Story त्यांना कसं सावरायचं, त्यांना ही बातमी कशी सांगायची, त्याचा विचार केला पाहिजे.” आई म्हणते, “मी नाही सांगू शकत. कशी सांगू तिला, कोणत्या तोंडाने सांगू, त्या इवल्याश्या जीवाने तर आपल्या बापाला पाहिलंही नाही आणि तो हे जग सोडून गेला.”
प्रतीक्षाचे बाबा म्हणतात, “मला वाटतं, आता त्या दोघींनाही काही सांगायला नको. Soldier Father Daughter Story उद्या जेव्हा प्रतीक येईल तेव्हाच त्यांच्यासमोर हे सत्य येईल.”
ती रात्र सर्वांसाठीचं खूप दुःखाची असते. प्रतीक्षाला कुणी काहीही सांगत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतीकचा मृतदेह गावात पोहोचतो. Soldier Father Daughter Story आपल्या गावातील सैनिकाला वीरमरण आलंय, त्यामुळे पंचक्रोशी जमा झालेली असते. हजारो लोक जमा झालेलं असतात. भारत माता की जय, वंदे मातरम, या घोषणांचा जयघोष सुरू असतो.
इकडे हॉस्पिटलमध्ये प्रतीक्षाला काहीही माहित नसतं. प्रतीक्षाचे बाबा आणि सासरे तेथे येतात. तेव्हा प्रतीक्षा विचारते, “काय झालं बाबा, आई कुठे आहे ?” Soldier Father Daughter Story बाबा म्हणतात, “काही नाही, चल आमच्याबरोबर घरी.” प्रतीक्षा विचारते, “इतक्या लवकर मला डिस्चार्ज मिळाला का ? बरं झालं तसंही मला इथे खूप बोर होत होतं. मलाही घरी यायचंय.” असं म्हणून प्रतीक्षा आवरा सावर करते आणि घरी यायला निघते.
गाडीतून घरी जात असताना रस्त्यावर इतक्या लोकांची गर्दी आहे, हे पाहून प्रतीक्षालाही आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, “बाबा एवढी गर्दी का आहे ? एखादा नेता येतोय का आपल्या गावात ? सभा आहे वाटतं. Soldier Father Daughter Story नाही तर एवढी गर्दी आपल्या गावात कोठून आली ?” प्रतीक्षा चे बाबा आणि सासरे तिला काहीही उत्तर देत नाही. ते आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करतात.
त्यांची गाडी घरासमोर येऊन थांबते. तर तेथे असंख्य लोक जमलेले असतात. प्रतीक्षा आपल्या बाळाला घेऊन गाडीतून खाली उतरते. तेव्हा इतकी माणसं पाहून नक्कीचं काहीतरी घडलंय, हे तिला समजतं. Soldier Father Daughter Story ती पावले पुढे टाकत येते. तर तिला प्रतीकचा मृतदेह दिसतो. आपला प्रतीक आता या जगात नाही राहिला, तो शहीद झालाय, ही गोष्ट तिच्या लक्षात येते.
प्रतीक्षाची आई तिच्या हातून छकुलीला घेते. प्रतीक्षा सुन्न झालेली असते. ती प्रतीकजवळ येते आणि त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते, “अहो मी तुम्हाला कालचं म्हटले होते, याना लवकर भेटायला, Soldier Father Daughter Story आपल्या छकुलीला पाहायला आणि तुम्ही तर खरंच आलात. पहा आपली छकुली अगदी तुमच्यासारखी दिसते ना. तिचं नाक, डोळे, सगळं तुमच्यासारखचं आहे. घ्या ना तिला हातात. पहा ना एकदा तिच्याकडे.”
प्रतीक्षाचे हे शब्द ऐकून तेथे असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. सगळे रडू लागतात. तेवढ्यात प्रतीक्षाचं बाळही रडू लागतं. प्रतिक्षा भानावर येते आणि छकुलीला घेते. ती प्रतिकला म्हणते, “पहा छकुली नाराज झालीये. Soldier Father Daughter Story आपले बाबा आले, पण ते आपल्याला घेत नाहीये, आपल्याशी बोलत नाहीये, म्हणून रडतेय ती. तुम्ही असं का करताय, उठा ना, घ्या ना तिला.”
प्रतीक्षाचे बाबा पुढे येतात आणि प्रतीक्षाला म्हणतात, “पोरी , तुझा नवरा या जगात नाही राहिला. शहीद झालाय. Soldier Father Daughter Story अभिमान आहे, आम्हाला सर्वांना त्याचा.”
प्रतीक्षाला आठवतं की, जेव्हा एक महिन्यापूर्वी प्रतीक तिला सोडून देशाच्या सीमेवर चालला होता, तेव्हा तो तिला म्हणाला होता, “प्रतीक्षा मी परत येईल की नाही कोणास ठाऊक ? पण जर खरंच असं काही झालं, तर मला एक शब्द दे. तू रडणार नाहीस. Soldier Father Daughter Story कमीत कमी सगळ्यांसमोर तरी तू रडणार नाहीस. तू एका सैनिकाची पत्नी आहेस, सैनिकाची पत्नी ही किती खणखर असते, तिच्यात किती ताकद असते, शक्ती असते, हे तू जगाला दाखवून दे.”
प्रतीकने सांगितल्याप्रमाणे प्रतीक्षा स्वतःच मन घट्ट करते. तिच्या डोळ्यातून एक अश्रूही येत नाही. ती प्रतीकजवळ आपल्या छकुलीला घेऊन जाते. तेव्हा छकुली अलगद प्रतीकचं एक बोट पकडते. एका दिवसाच्या लेकीने आपल्या शहीद झालेल्या बापाचं बोट पकडलेलं असतं आणि हे पाहून सगळ्यांच्या अश्रूंचा बांध फुटतो. Soldier Father Daughter Story त्या हजारो लोकांच्या जनसमूहात असा एकही माणूस नसतो, ज्याच्या डोळ्यात पाणी नसतं आणि प्रत्येकाच्या तोंडून भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा ऐकू येऊ लागतात. संपूर्ण आसमंत त्याने दणाणून जातो.
प्रतीक्षा आपल्या लेकीला म्हणते, “छकुली हे तुझे बाबा आहेत. त्यांना डोळे भरून पाहून घे. यानंतर ते तुला फक्त फोटो आणि व्हिडिओमध्येचं दिसणार आहेत. प्रत्यक्ष कधीही दिसणार नाही. फक्त तुझा आणि त्यांचा एकही फोटो एकत्र नसेल, याचचं वाईट वाटतंय. Soldier Father Daughter Story एक नेहमी लक्षात ठेव, तुझे बाबा खूप शूर आहेत, त्यांनी देशासाठी वीरमरण पत्करलं आणि तुलाही त्यांच्यासारखचं व्हायचंय. तुझ्या बाबांची हीच इच्छा होती आणि ती तुला पूर्ण करायची.”
प्रतिकवर अंत्यसंस्कार केले जातात. प्रतीक्षाला खूप दुःख झालेलं असतं Soldier Father Daughter Story परंतु प्रतिकने सांगितल्याप्रमाणे ती एक अश्रूही ढाळत नाहज.
अंत्यसंस्कारानंतर प्रतीक्षा आपल्या खोलीत येते. प्रतीक आणि तिच्या लग्नाची फोटो फ्रेम भिंतीवर लावलेली असते. प्रतीक्षाला तो दिवस आठवतो, जेव्हा तिने प्रतीकशी लग्न केलं होतं. तो दिवस आठवतो जेव्हा तो तिला शेवटचा भेटला होता आणि तिच्या अश्रूंचा बांध तुटतो. Soldier Father Daughter Story ती रडू लागते. बाहेर बसलेल्या सर्वांना तिच्या रडण्याचा आवाज येतो. प्रतीक्षाची आई आतमध्ये जाऊ लागते. तर बाबा तिला थांबवून म्हणतात, “नको जाऊ, रडू दे तिला. तिच्या मनावरचं ओझं हलकं होऊ दे.”
आपल्या आईला रडताना पाहून ती एक दिवसाची छकुलीही रडू लागते. Soldier Father Daughter Story तिला तर माहितही नसतं, तिने आज काय गमावलंय.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली, आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !