Social Media Star Sairaj Kendre मागील वर्षी सोशल मीडियावर गणपती बाप्पांच्या एका गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हे गाणं होतं माझ्या पप्पांनी गणपती आणला.
बीडचा चिमुकला साईराज केंद्रे याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळवतोय. सध्याचे ट्रेंडिंग गाणं म्हणून फेसबुक, इंस्टाग्राम, youtube सगळीकडे या गाण्याचे रिल्स बनवले जात आहेत. साईराज केंद्रे हा चिमुकला चांगलाचं फेमस झाला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का या गाण्याचा खरा गीतकार कोण आहे ? आज त्याबद्दल जाणून घेऊया.
Social Media Star Sairaj Kendre
भिवंडीजवळील अंजुर फाटा येथे वडापावची गाडी चालवणारे मनोज घोरपडे यांनी माझ्या पप्पांनी गणपती आणला या गाण्याची रचना केलीये. पाच वर्षांपूर्वी त्यांनी हे गाणं तयार केलं होतं आणि मागच्या वर्षी त्यांचा मुलगा मोहित आणि मुलगी शौर्य यांच्याकडून हे गाणं गाऊनही घेतलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. हे गाणंही तेव्हा व्हायरल झालं आणि चक्क दोन मिलियन मिळवले होते.
तारक मेहताचा रोशन सोधी बेपत्ता
परंतु यावर्षी साईराज केंद्रेने (Social Media Star Sairaj Kendre) हे गाणं रिक्रीयेट केलं आणि त्याचा व्हिडिओ मात्र तुफान व्हायरल झाला. मनोज घोरपडे याबद्दल म्हणतात की, मला आनंद झालाय की साईराज केंद्रेचा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामुळे माझ्या गाण्याला चांगली ओळख मिळाली.
पप्पांनी गणपती आणला फेम साईराज केंद्रे
मनोज घोरपडे हे वडापावचा व्यवसाय करतात. परंतु लहानपणापासूनचं त्यांना गाणं बनवण्याची, गीत रचण्याची आवड होती. ती आवड त्यांनी जोपासली आहे. उडत्या चालीची गाणी ते बनवतात. नवरात्रीत त्यांनी गरबा नाचायला आली मम्मीच्या संगे हे गाणं बनवलं होतं आणि आपल्या मुलीकडून गाऊन घेतलं.
या गणेशोत्सवासाठी Social Media Star Sairaj Kendre सुद्धा त्यांनी गणपती येणार आमच्या घरा दहा दिवसांची मजा करायला हे गाणं तयार करून ठेवलंय आणि येत्या काही दिवसात ते रिलीज करणार आहेत. हे गाणं सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी त्यांची अपेक्षा आहे.
एकूणचं दरवर्षी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या तोंडावर असं एखाद्या उडत्या चालीचं गाणं फेमस होतं आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या गाण्यावरच नाचतो. काही वर्षांपूर्वी शांताबाई हे गाणं सुद्धा असंच फेमस झालं होतं. परंतु या गाण्याला बनवणाऱ्यांना त्याचा किती फायदा होतो याचा विचार करणंही तेवढचं महत्त्वाचं.
अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !