SIP Full Form SIP चा फुल फॉर्म माहितेय का ?

SIP Full Form

SIP बद्दल आपण सगळेच ऐकत आलो आहोत. SIP हा इन्वेस्टमेंट्चा खूप चांगला पर्याय आहे. आज आपण SIP Full Form आणि SIP म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत.

SIP Full Form

SIP Full Form आहे Systematic Investment Plan.

SIP म्हणजे तुम्ही नियमित अंतरावर ठरल्याप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवणूक करू शकता.

काही वर्षांनंतर तुम्हाला ही थोडी थोडी गुंतवणूक पुढे मोठी संपत्ती म्हणून परत मिळू शकते. या गुंतवणूकीमुळे तुम्ही भविष्यात श्रीमंत बनू शकता.

एकावेळी पैसे गुंतवणूक करण्याला लंप सम इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात.

SIP चे काम कसे चालते

SIP मध्ये म्युच्युअल फंड एजन्सीकडून नियमितपणे गुंतवणूक केली जाते आणि दर महिन्याला ठरलेल्या दिवशी तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे कट होऊन जातात आणि त्याची मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते.

बँक अकाऊंटमधून गेलेल्या पैशांची शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. तुम्हाला त्यासाठी काहीच करायची गरज नाही.

SIP मध्ये तुम्ही कधीही पैसे गुंतवू शकता आणि कधीही काढू शकता.

SIP साठी ठराविक कार्यकाळ नसतो. तुम्ही म्युच्युअल फंड एजन्सीला रिक्वेस्ट करून कधीही SIP बंद करू शकता.

SIP ची टर्म संपल्यानंतर तुम्ही सर्व पैसे काढून घेऊ शकता.

या म्युच्युअल फंड एजन्सी शेअर मार्केटमध्ये ऑटोमोबाईल, प्रॉडक्शन, फार्मा कंपन्या, आयटी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात.

Mutual Fund Information In Marathi 
sip full form

SIP चे फायदे

1. नियमितपणे लहान रक्कम गुंतवून त्याच्या रिटर्नमध्ये मोठी रक्कम मिळते.

2. SIP मध्ये तुम्हाला गुंतवणूक करताना मार्केटची स्थिती काय आहे ते पाहण्याची गरज नाही किंवा किती पैसे गुंतवावे तेही विचार करण्याची गरज नाही.

3. दर महिन्यात एक ठरलेल्या रकमेची गुंतवणूक केली जाते. त्यात जेव्हा किंमत कमी असते तेव्हा जास्त शेअर्सची खरेदी केली जाते आणि किंमत वाढल्यावर कमी शेअर्स खरेदी केले जातात.

4. SIP मुळे बचत करण्यास प्रोत्साहन मिळते. जेवढी जास्त बचत कराल तेव्हा संपत्ती वाढते.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा.

खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top