Shubhvivah (Star Pravah) Serial Cast | शुभविवाह मालिकेची कास्ट

Shubhvivah (Star Pravah) Serial Cast

Shubhvivah (Star Pravah) Serial Cast ही मालिका आकाश आणि भूमीच्या गोड नात्यावर आधारित आहे. हँडसम आणि स्मार्ट बिझनेसमन आकाश महाजनच्या कारचा अपघात होतो. त्यात त्याच्या आईवडिलांचा मृत्यू होतो आणि आकाशची स्मृती जाते. याशिवाय आकाशची कार भूमीच्या बाबांच्या सायकलला धडकते त्यात त्यांचेही पाय निकामी होतात. या अपघातानंतर आकाशच्या आयुष्यात काहीच पूर्वीसारखं राहत नाही. तो अगदी लहान मुलासारखा वागू लागतो. त्याची आत्या रागिणी प्रॉपर्टीसाठी त्याच्या जीवावर उठते. तर दुसरीकडे भूमीच्या बाबांचे पाय गेल्याने घराची जवाबदारी भूमीवर येते.

पण पुढे आकाश आणि भूमीची ओळख होऊन या दोघांचं लग्न होतं. मग हे दोघे मिळून रागिणीच्या कटकारस्थानाचा सामना करतात आणि तिला धडा शिकवतात हीच या मालिकेची कथा आहे.

Shubhvivah (Star Pravah) Serial Cast

आज आपण या मालिकेच्या कलाकारांविषयी (Shubhvivah (Star Pravah) Serial Cast) माहिती जाणून घेणार आहोत.

1. यशोमन आपटे – यशोमनने या मालिकेत आकाशची भूमिका साकारलीय. तो या मालिकेचा मुख्य अभिनेता आहे.

यशोमन आपटे
यशोमन आपटे

2. मधुरा देशपांडे – मधुरा या मालिकेत भूमी हे पात्र साकारताना दिसतेय. ती आकाशची बायको आणि मालिकेची नायिका आहे.

मधुरा देशपांडे
मधुरा देशपांडे

3. विशाखा सुभेदार – विशाखा या मालिकेत रागिणी या पात्रात दिसतेय. ती आकाशची आत्या आणि मालिकेची मुख्य खलनायिका आहे.

विशाखा सुभेदार
विशाखा सुभेदार

5. मनोज कोल्हटकर – हे या मालिकेत माधवच्या भूमिकेत दिसत आहेत. ते भूमीच्या बाबाच्या भूमिकेत आहेत.

मनोज कोल्हटकर
मनोज कोल्हटकर

6. मृणाल देशपांडे – त्या या मालिकेत निलांबरी हे पात्र साकारताय. या मालिकेत भूमीची सावत्र आई आहेत आणि खलनायिकासुद्धा आहेत.

मृणाल देशपांडे
मृणाल देशपांडे

7. शीतल शुक्ला – या मालिकेत त्या सुरेखाची भूमिका साकारत आहेत. त्या आकाशच्या आजी आहेत आणि महाजन कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आणि कुटुंबाचा आधार आहेत.

शीतल शुक्ला
शीतल शुक्ला

8. अभिजीत श्वेतचंद्र – अभिजीत या मालिकेत अभिजीत पटवर्धन हे पात्र साकारतोय. तो रागिणीचा मोठा मुलगा आणि खलनायकदेखील आहे.

अभिजीत श्वेतचंद्र
अभिजीत श्वेतचंद्र

9. अक्षय जाधव – अक्षय या मालिकेत अथर्वची भूमिका साकारत आहे. तो रागिणीचा धाकटा मुलगा आहे.

अक्षय जाधव
अक्षय जाधव

10. काजल पाटील – काजल या मालिकेत मानसी या भूमिकेत दिसतेय. ती भूमीची धाकटी बहीण आणि अथर्वची बायको आहे.

काजल पाटील
काजल पाटील

12. रुचिर गुरव – रुचिर या मालिकेत प्रशांत हे पात्र साकारतोय. तो निलांबरीचा मुलगा आणि भूमीचा धाकटा सावत्र भाऊ आहे.

रुचिर गुरव
रुचिर गुरव

13. कुंजीका काळवीट – कुंजीका या मालिकेत पौर्णिमा या भूमिकेत दिसतेय. ती निलांबरीची मुलगी, भूमीची धाकटी सावत्र बहीण आणि अभिजीतची बायको आहे. मालिकेत ती खलनायिकासुद्धा आहे.

कुंजीका काळवीट
कुंजीका काळवीट

सध्या शुभविवाह ही मालिका Shubhvivah (Star Pravah) Serial Cast खूपच रंजक वळणावर येऊन उभी आहे. आकाश आणि भूमी मिळून रागिणीच्या कटकारस्थानांना जशास तसं प्रत्युत्तर देताय. प्रेक्षकांना मालिकेची कथा आणि कलाकारांचा अभिनय फारच आवडतोय.

ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांची ओळख

मनोरंजनविश्वातील अशीच Shubhvivah (Star Pravah) Serial Cast महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top