Shri Swami Samarth Story दिगंबर आणि सरिता हे एक गरीब जोडपं. रोजच्या रोज कष्ट करून ते आपलं आयुष्य पुढे चालवत होते. रोज कमवायचं आणि खायचं, हा त्यांचा नित्यक्रम होता. रात्रंदिवस कष्ट आणि मेहनत हे तर पाचवीलाचं पुजलेलं. या दोघांना दोन मुलं होती. सात वर्षांची निकिता आणि पाच वर्षांचा समर्थ.
दिगंबर आणि सरिताचं एक स्वप्न होतं की, आपलं आयुष्य जरी गरिबीत जात असलं, कष्टात जात असलं, तरी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, त्यांना मोठं करायचं, त्यांना या गरिबीत नाही राहू द्यायचं. त्यासाठीचं ते रात्रंदिवस कष्ट करत होते. आपल्या मुलांचं भविष्य सोनेरी करणं, आता हे एकचं त्यांचं स्वप्न होतं.
Shri Swami Samarth Story
दिगंबर आणि सरिता हे दोघे जसे रात्रदिवस कष्ट करायचे, तशीच त्यांची देवावरही भक्ती होती. सरिता ही श्री स्वामी समर्थांची भक्त होती. दिवसभर ती श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत राहायची. ती स्वामी समर्थांना नेहमी म्हणायची, ‘देवा आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल, परंतु आमच्या मुलांचं भविष्य सोनेरी होऊ दे. Shri Swami Samarth Story त्यांच्या शिक्षणात कोणतीही कमी पडू देऊ नकोस.’
होळीचा सण जवळ आला होता. सगळीकडे रंग पिचकारी यांची दुकानं लागली होती. परंतु दिगंबर आणि सरिता हे दोघे मात्र खूप दुःखी होते. कारण मागील आठ दिवसांपासून त्यांना कोणतही काम मिळालं नव्हतं. त्यामुळे घरात धान्य संपत चाललं होतं. त्यातचं पाच वर्षांचा समर्थ हा शाळेतून घरी आला आणि बाबांना म्हणाला, Shri Swami Samarth Story “बाबा मला पिचकारी घ्यायचीये, रंग घ्यायचे आहेत. आम्ही सगळे मित्र मिळून होळी साजरी करणार आहोत.”
तर निकिता म्हणली, “बाबा मला पुरणपोळी खायची आहे. किती दिवस झाले आपण पुरणपोळी नाही खाल्ली. Shri Swami Samarth Story माझ्या एका मैत्रिणीने डब्यात आज पुरणपोळी आणली होती ना, तर खूप छान लागली मला. आपण या होळीला पुरणपोळी करणार ना ?”
सरिताच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती काहीही न बोलता तेथून निघून जाते. दिगंबर मुलांना म्हणतो, “हो बाळांनो, या होळीला आपण पुरणपोळी खाणार आणि समर्थसाठी रंग आणि पिचकारीही आणूया. Shri Swami Samarth Story तुम्ही दोघे आता बाहेर खेळायला जा.” हे दोघे बाहेर खेळायला जातात.
दिगंबर सरिताला हाक मारतो. सरिता येते. दिगंबर विचारतो, “सरिता काय झालं ?” तिच्या डोळ्यात पाणी असतं. ती म्हणती, “अहो कशाला मुलांना असं सांगितलं की, आपण होळीला पुरणपोळी खाऊ. रंग आणि पिचकारी आणू. तुम्हाला सत्य माहितीये ना. Shri Swami Samarth Story होळीला पुरणपोळी काय, आपल्या घरात अन्नाचा एक कणही शिजणार नाही. घरात अन्नधान्यच राहिलं नाहीये. तर मग आपण त्यांच्यासाठी पिचकारी आणि रंग तरी कसे आणणार ?”
दिगंबर म्हणतो, “तुझा देवावर विश्वास आहे ना. तो करेल काहीतरी. आपल्या लेकरांना तो कधी असा उपाशी नाही झोपू देणार. तू नको काळजी करू, होईल काहीतरी.” असं म्हणून दिगंबर बाहेर काम शोधण्यासाठी निघून जातो. Shri Swami Samarth Story दिगंबरचं हे वाक्य सरिताच्या कानात बसत. ती देवासमोर येते आणि हात जोडून श्री स्वामी समर्थांना म्हणते, “परमेश्वरा, आमच्या घरात अन्नाचा एक कण नाहीये. मुलांना होळीला पुरणपोळी खायची आहे. रंग आणि पिचकारी हवी आहे.
मी आजपर्यंत स्वतःसाठी काही नाही मागितलं. फक्त माझ्या मुलांसाठी मागितलंय, आज मी परत त्यांच्यासाठीच मागते. आम्हाला असा काहीतरी मार्ग दाखव, ज्यामुळे मुलांची इच्छा पूर्ण होईल.
संध्याकाळ होते. मुलं घरामध्ये अभ्यास करत असतात. दिगंबर घरी पोहोचतो. सरिता त्याला विचारते, “काय झालं अहो, भेटलं का एखादं काम ?” दिगंबर खूप निराश असतो, तो म्हणतो, “नाही भेटलं. खूप लोकांना विचारलं, परंतु सध्या कोठेचं काम सुरू नाहीये. मार्केटमध्ये खूप मंदी आहे. माझं तर डोकं चालत नाहीये. कळतंच नाही की, असं का होतंय ? Shri Swami Samarth Story कधी कधी एकाच वेळेस दोन दोन कामं येतात, एक काम सोडून द्यावं लागतं आणि आता एकही काम नाही.”
हे ऐकून सरितालाही खूप वाईट वाटतं. रात्री मुलं झोपी जातात. दिगंबर दाराजवळ बसलेला असतो. सरिता म्हणते, “अहो झोपायचं नाहीये का ?” तर दिगंबर म्हणतो, “होळी फक्त तीन दिवसांवर आली आहे, कसं होणार ? काम मिळेल अशी कोणती शक्यताही नाहीये.” दिगंबर रडू लागतो. Shri Swami Samarth Story सरिता म्हणते, “अहो, का रडताय, रडू नका. मी स्वामी समर्थांना सांगितलंय, ते नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील, होईल काहीतरी.”
दिगंबर डोळे पुसतो आणि हात जोडून म्हणतो, “परमेश्वरा आता तुझाचं आम्हाला आधार आहे. काहीतरी चमत्कार कर. Shri Swami Samarth Story आमच्या घरात या होळीला पुरणपोळी होऊ दे. माझ्या मुलांची इच्छा पूर्ण होऊ दे.”
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं शाळेत निघून जातात. दिगंबर आणि सरिता हे दोघेही बाहेर कुठे काम भेटतं का, त्याची चौकशी करण्यासाठी जात असतात. तेवढ्यात त्यांच्या घरी एक माणूस येतो आणि म्हणतो, “तुम्हीच दिगंबर आणि सरिता आहात का ?” Shri Swami Samarth Story हे दोघे म्हणतात, “हो आम्हीचं आहोत, काही काम आहे का ?” हा माणूस म्हणतो, “हो एक महत्त्वाचं काम आहे.”
हे ऐकून दिगंबर आणि सरिताला खूप आनंद होतो. दिगंबर विचारतो, “काय काम आहे ?” हा माणूस सांगतो, “मी एका अनाथ आश्रमातून आलोय. आमच्या अनाथ आश्रमामध्ये जवळपास 50 मुलं राहतात आणि होळीला त्या मुलांसाठी एका दानशूर व्यक्तीने मोठ दान दिलंय, Shri Swami Samarth Story तर या होळीला त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालायचा आहे. तुम्हाला पुरणपोळी जमते का ? सगळ सामान आमचं असेल, तुम्हाला फक्त पुरणपोळी करून द्यायच्या असतील.”
हे ऐकून सरिताला खूप आनंद होतो आणि सरिता म्हणते, “हो देईल ना मी करून.” हा माणूस म्हणतो, “अनाथाश्रम असल्यामुळे आम्ही तुम्हाला त्याचा काही मोबदला नाही देऊ शकणार. Shri Swami Samarth Story परंतु तुमचं कुटुंब आमच्या अनाथआश्रमात येऊन पुरणपोळीचं जेवण करू शकतं.” सरिता खूप खुश होते आणि म्हणते, “आम्हाला पैसे नकोय, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी दोन-चार पुरणपोळ्या भेटल्या, तरी ठीक आहे.”
हा माणूस यासाठी हो म्हणतो आणि त्यांना सांगतो, “तुम्ही सगळे पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन आमच्या अनाथाश्रमातचं या तेथेचं सगळे जेवण करा.” दिगंबर आणि सरिता हो म्हणतात.
हा माणूस म्हणतो, “आणखीन एक काम आहे. अनाथ आश्रमाच्या मुलांनी होळी खेळावी यासाठी रंगांची पॅकिंग करायची आहे. पिचकारी पॅक करायच्या आहेत आणि त्याचे गिफ्ट बॉक्स बनवून त्या मुलांना द्यायचे आहेत. ते काम तुम्हाला जमेल का ?” दिगंबर म्हणतो, “हो जमेल ना, मी करेल ते काम. Shri Swami Samarth Story आम्ही दोघे मिळून करू.” हा माणूस म्हणतो, “मग ठीक आहे. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला सगळ समान आणून देतो. होळीच्या दिवशी ते घेऊन तुम्ही आमच्या अनाथाश्रमात येऊन जा.” दिगंबर आणि सरिता हो म्हणतात. हा माणूस तिथून निघून जातो.
दिगंबर आणि सरिताला खूप आनंद झालेला असतो. ते एकमेकांकडे पाहू लागतात. सरिता म्हणते, “ही सगळी श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. त्यांना मी म्हणाले होते आणि त्यांनी आपलं सगळ दुःख दूर केलं.” Shri Swami Samarth Story दोघेही स्वामी समर्थांसमोर येतात आणि हात जोडून धन्यवाद म्हणतात.
थोड्या वेळानंतर तो माणूस सांगितल्याप्रमाणे रंग, पिचकारी आणि पुरणपोळीसाठी लागणार सगळ सामान देऊन जातो. दिगंबर सरीताला म्हणतो, “उद्या होळी आहे, तर आपण उद्या पुरणपोळी बनवू आणि आज आपण हे रंग आणि पिचकारी पॅकिंगचं काम पूर्ण करून घेऊ.” Shri Swami Samarth Story सरिता हो म्हणते आणि हे दोघे रंग आणि पिचकारी पॅकिंग करून ठेवतात.
दुसऱ्या दिवशी होळी असते. तेव्हा हे दोघे मिळून पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी करतात आणि पुरणपोळ्या बनवून ठेवतात. शाळा सुटल्यानंतर निकिता आणि समर्थ घरी येतात. पुरणपोळ्यांचा घमघमाट सुटलेला असतो. निकिता विचारते, “आई तू खरचं पुरणपोळ्या केल्यास का ?” सरिता सांगते, “हो बाळा पुरणपोळ्या केल्या आहेत. Shri Swami Samarth Story आपल्याला एक ऑर्डर मिळाली होती. या सर्व पुरणपोळ्या घेऊन अनाथाश्रमात जायचंय आणि तेथेच मुलांबरोबर होळी साजरी करायची आणि पुरणपोळ्याही खायच्या, जेवण करायचं.”
हे ऐकून समर्थ आणि निकितालाही खूप आनंद होतो. संध्याकाळ झाल्यानंतर दिगंबर, सरिता आणि त्यांची दोन मुलं ह्या सगळ्या पुरणपोळ्या आणि रंग पिचकारीची पॅकेट घेऊन अनाथ आश्रमात पोहोचतात.
अनाथ आश्रमातील माणसं त्यांना विचारतात, “तुम्हाला आमच्या अनाथ आश्रमाला काही दान करायचं आहे का ?” तर दिगंबर सांगतो, “नाही आम्ही तर ऑर्डर द्यायला आलो आहोत. आमच्या घरी एक माणूस आला होता आणि त्याने आम्हाला पुरणपोळ्या रंग आणि पिचकारीची पाकीट या अनाथाश्रमात घेऊन यायला सांगितली होती. Shri Swami Samarth Story तो म्हणाला होता की, तुम्ही तेथेच होळी साजरी करा, मुलांबरोबर जेव्हा. त्यानेचं आम्हाला हे सगळं सामान दिलं होतं.”
अनाथ आश्रमातील माणसं सांगतात, “आमच्या आश्रमातून तर असा कोणताचं माणूस आला नाही. उलट आमच्या अनाथाश्रमात यावेळेस होळी साजरी होणार नव्हती. कारण मुलांसाठी एवढ धान्य उरलं नव्हतं. Shri Swami Samarth Story आम्हीच प्रयत्न करत होतो की, कुठून तरी पैसे मॅनेज करून मुलांना होळी साजरी करता यावी, त्यांना गोडाचं जेवण देता यावं आणि तुम्ही हे घेऊन आलात.”
हे ऐकून दिगंबर आणि सरिताच्या पायाखालची जमीनचं सरकते. त्यांना काही कळतच नाही. तेव्हा सरिताला समोरच्या भिंतीवर श्री स्वामी समर्थांचा फोटो दिसतो आणि तिला सगळं समजतं. ती दिगंबरला म्हणते, “अहो हे सगळं.” दिगंबरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तो म्हणतो, “नको काही बोलूस. चल आपण या मुलांबरोबर जेवण करूया, त्यांना खाऊ घालूया आणि होळी साजरी करूया.”
त्यादिवशी दिगंबर, सरिता आणि त्यांची मुलं या मुलांबरोबरचं होळी साजरी करतात. पुरणपोळी खातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते होळीही खेळतात. म्हणजेचं निकिताची पुरणपोळी खाण्याची इच्छाही पूर्ण झालेली असते Shri Swami Samarth Story आणि समर्थची होळी खेळण्याची इच्छा ही पूर्ण झालेली असते. या दोघांना तिथे अनेक नवीन मित्रही भेटतात.
सरिता आणि दिगंबर श्री स्वामी समर्थांचे आभार मानतात आणि म्हणतात, आम्ही आयुष्यभर अशीचं तुमची सेवा करत राहू.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा, नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !