Shram Vidya Shaikshanik Karja Yojana शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला एक अभिशाप आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. परंतु ज्या कुटुंबात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे, ज्यांचं संपूर्ण आयुष्य उध्वस्त झालंय, पुढे त्या कुटुंबाचं काय, त्यांच्या मुलाबाळांचं काय, हा ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा आहे.
आणि आता याच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे “श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना.” या योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ज्या मुलांनी बारावीची परीक्षा पास केली आहे, त्यांना शून्य टक्के ते अत्यल्प व्याजदराने पुढील शिक्षणासाठी कर्ज दिलं जाईल.
Shram Vidya Shaikshanik Karja Yojana
मे 2023 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य बँकेच्या कार्यक्रमात या “श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेची” घोषणा केलीये.
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना 2023 स्वरूप
या Shram Vidya Shaikshanik Karja Yojana योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ज्या मुलांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने ते अत्यल्प व्याजदराने शैक्षणिक कर्ज दिले जाईल.
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना पात्रता
या Shram Vidya Shaikshanik Karja Yojana योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना कर्ज हवं आहे, त्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांना हे कर्ज दिलं जाईल.
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना व्याजदर
१) पाच लाख रुपये पर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याजदर असेल.
२) पाच लाख ते दहा लाख रुपये पर्यंतच्या कर्जाला दोन टक्के व्याजदर असेल
३) दहा लाखाच्या पुढील कर्जासाठी चार टक्के व्याजदर असेल.
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना अटी
१) विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा उत्तीर्ण व्हायला हवी.
२) या Shram Vidya Shaikshanik Karja Yojana कर्जासाठी कोणतंही तारणाची आवश्यकता नसेल.
३) पाच लाख रुपये पर्यंतच्या कर्जासाठी जामीनदाराची गरज नसेल.
४) या कर्ज योजनेमध्ये विद्यार्थ्यांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क घेतलं जाणार नाही.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील गुणवान विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक
ज्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेत सरासरी 75% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, त्यांना 50 हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल.
तर ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेत सरासरी 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, त्यांना एक लाख रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल.
या Shram Vidya Shaikshanik Karja Yojana लेखातील माहिती तुम्हाला फायदेशीर वाटली असल्यास नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !