Shiva Serial Actor Marriage News तुम्हाला सर्वांना ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही ओम आणि स्वीटूची अतिशय सुंदर मालिका तर आठवत असेलच. स्टायलिश आणि हँडसम ओम आणि प्रेमळ, सोज्वळ स्वीटूची लव्हस्टोरी प्रेक्षकांना अतिशय आवडली होती. या मालिकेनंतर अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री अन्वीता फलटणकर खूप लोकप्रिय झाले.
Shiva Serial Actor Marriage News
सध्या अभिनेता शाल्व किंजवडेकर हा झी मराठीच्या ‘शिवा‘ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येतोय. Shiva Serial Actor Marriage News त्याची ही भूमिकासुद्धा प्रेक्षकांना फार आवडतेय. शाल्वचे खूप सारे फॅन्सदेखील आहेत. आता शाल्वच्या फॅन्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
अभिनेता शाल्व किंजवडेकर हा श्रेया दफळापूरकरसोबत लवकरच लग्न करणार आहे. श्रेया ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट म्हणून काम करते. शाल्व आणि श्रेया मागील अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. मागील वर्षी या दोघांनी खूपच धुमधडाक्यात साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्यासाठी अनेक कलाकार मंडळीदेखील हजर होते.
CID 2 मालिका लवकरचं सुरू होणार
Shiva Serial Actor Marriage News शाल्व आणि श्रेया दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि आपले सोबतचे फोटो नेहमी शेअर करत असतात. त्यांची जोडी सर्वांना खूपच आवडते.
शाल्व आणि श्रेयाच्या साखरपुड्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरच हे दोघे लग्नसुद्धा करणार आहेत. श्रेयाने नुकतीच आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माहिती दिलीय की त्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त पार पडला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर दोघांचा फोटो टाकलाय आणि ‘मुहूर्त’ असं कॅप्शन दिलंय. लवकरच शाल्व आणि श्रेया लग्नबंधनात अडकणार आहेत पण त्या दोघांनी आपल्या लग्नाची तारीख अजून सांगितलेली नाही.
शाल्व किंजवडेकर लवकरचं लग्नबंधनात अडकणार
हे दोघे लवकरच इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या लग्नाबद्दल सर्व काही माहिती देतील अशी आशा आहे. साखरपुड्याप्रमाणेच त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी फॅन्स खूपच उत्सुक आहेत. या दोघांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा होईपर्यंत आपण वाट पाहूया. पण त्या दोघांचा लग्नसोहळा अतिशय धुमधडाक्यात पार पडणार एवढं मात्र नक्की.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद