Shirdi Water Park Ticket Price मे महिन्यामध्ये उन्हाच्या तडाक्यापासून कसं वाचायचं हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. त्यातचं शाळांना सुट्टी असल्यामुळे बच्चे कंपनीसुद्धा मागे लागलीये की, आम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय. मग या परिस्थितीत एक सुवर्णमध्य तुम्हाला काढता येईल आणि तो म्हणजे वॉटर पार्क.
वॉटर पार्कला गेल्यामुळे उन्हाच्या तडाक्यापासूनही वाचता येईल आणि बच्चे कंपनीची मस्त पिकनिक सुद्धा होईल, ते एन्जॉय करतील. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी एक खूपच सुंदर अशा वॉटर पार्कबद्दल माहिती घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही सहकुटुंब एन्जॉय करू शकतात. या वॉटर पार्कचे नाव आहे वेट एन जॉय वॉटर पार्क शिर्डी.
मग या वॉटर पार्कचं तिकीट किती आहे ? येथे कोणकोणत्या राइडस आहेत ? येथे जायचं कसं ? आज आपण त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
Shirdi Water Park Ticket Price
वेट एन जॉय वॉटर पार्क शिर्डी जवळचं आहे. तुम्ही शिर्डीला बस, रेल्वे किंवा स्वतःच वाहन यापैकी कोणत्याही साधनाने पोहोचू शकता आणि तेथून हा वाटर पार्क जवळचं आहे.
या वाटर पार्कमध्ये तुम्हाला अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राईडस खेळायला मिळतील. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, येथील तिकीट किती आहे ? तर सध्या एका वयस्कर व्यक्तीसाठी येथील तिकीट 1999/- रुपये आहे.
वेट एन जॉय वॉटर पार्क शिर्डी तिकीट प्राईस
जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील आणि त्यांची हाईट 3 फूट 3 इंचापेक्षा कमी असेल, तर त्यांना फ्री एन्ट्री आहे. पण यापेक्षा जास्त हाईट असलेल्या लहान मुलांसाठी 899 रुपये तिकीट आहे.
वेट एन जॉय वॉटर पार्क लोणावळा संपूर्ण माहिती
या तिकिटाच्या किमतीत जेवण किंवा कपडे समाविष्ट नाहीये. तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या आवडीनुसार जेवण आणि कपड्यांची खरेदी करू शकतात.
याचबरोबर तुम्हाला तिकीट खरेदीवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. जसं की तुम्ही जर 5 पेक्षा जास्त टिकीट एकाचं वेळेस खरेदी केली, तर तुम्हाला 10 % ऑफ मिळेल.
शिर्डीचा हा वॉटर पार्क संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला येथे जाऊन एन्जॉय करायचं असेल, तर हे तुमच्या कुटुंबासाठी नक्कीचं एक चांगलं सरप्राईज असेल यात शंका नाही. तर तुम्ही कधी येताय या वॉटर पार्कला ? नक्कीचं कमेंट करून सांगा.
अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !