Shetmal Taran Karja Yojana 2024 | शेतमाल तारण कर्ज योजना

Shetmal Taran Karja Yojana 2024

Shetmal Taran Karja Yojana 2024

Shetmal Taran Karja Yojana 2024 आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोणापासूनही लपलेली नाहीये. शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय. ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.

वातावरणातील बदल, पावसाचं कमी जास्त पडणं, अवकाळी पाऊस, गारपीट या आसमानी आणि नैसर्गिक संकटांपासून तर शेतकरी कसाबसा कष्ट करून आपल्या शेतात अन्नधान्य पिकवतो. परंतु जेव्हा हे अन्नधान्य तो बाजारात विक्री करण्यास आणतो. तेव्हा मात्र त्याला मानवनिर्मित एका संकटाचा सामना करावा लागतो.

हजारो शेतकरी एकाचं वेळेस मोठ्या प्रमाणात एकसारखा शेतमाल बाजारात विकण्यास घेऊन येतात. त्यामुळे या शेतमालाचे दर पडतात. शेतकऱ्यांनी एवढं कष्ट करून पिकवलेलं हे अन्नधान्य कवडीमोलाच्या भावात त्याला विकावं लागतं.

शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. हा शेतमाल पिकवण्यासाठी जेवढे पैसे लागतात, त्यापेक्षा कमी पैसे त्यांना हा शेतमाल विकून भेटतात. म्हणजे फायदा तर होतच नाही. मग शेतकऱ्यांच्या हातात काय राहणार ? त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार ? ते कसे जगणार ? हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो.

मग काही महिन्यानंतर जेव्हा बाजारात शेतमाल उपलब्ध राहत नाही. तेव्हा मात्र या मालाची किंमत खूप जास्त होते आणि शेतकऱ्यांना तेव्हा वाटतं की, माझा शेतमाल तेव्हा विकला नसता, तर बरं झालं असतं. परंतु शेतकऱ्यांकडे या शेतमालाची साठवणूक करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसते.

तसंच जर हा शेतमाल साठवून ठेवला, परंतु जोपर्यंत शेतमालाला जास्त भाव मिळत नाही तोपर्यंत पैशाचं काय करायचं ? त्यांचं घर कसं चालणार ? ही सुद्धा एक मोठी समस्या असते आणि या दोन समस्यांचा विचार करूनचं आता महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या या योजनेचे नाव आहे (Shetmal Taran Karja Yojana 2024) शेतमाल तारण कर्ज योजना. या योजनेच्या नावातचं कळून येते की, शेतकरी आपला शेतमाल तारण ठेवून कर्ज मिळवू शकतात. मग ही योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत ? या Shetmal Taran Karja Yojana 2024 योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा मिळतो ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

शेतमाल तारण कर्ज योजना

महाराष्ट्र सरकारच्या कृषी पणन महामंडळाने ही Shetmal Taran Karja Yojana 2024 योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी सुगीच्या दिवसात आपला शेतमाल कमी भावात न विकता बाजार समितीच्या गोदामांमध्ये साठवून ठेवू शकतात आणि या मालावर कर्ज घेऊ शकतात.

म्हणजे एकूणचं सुगीच्या दिवसात आपला शेतमाल न विकल्यामुळे शेतकऱ्यांना पुढे जाऊन चांगला बाजारभावही मिळतो आणि त्यांना असलेल्या पैशांची गरज सुद्धा या शेतमालावर तारण घेऊन भागवली जाते.

या Shetmal Taran Karja Yojana 2024 योजनेमध्ये बेदाणा, काजू बी, तुर, मूग, हरभरा, हळद, ज्वारी, बाजरी, मका, गहू, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन आणि करडई यांसारखा शेतमाल शेतकरी बाजार समितीच्या गोदामांमध्ये साठवण करून ठेवू शकतो आणि त्यावर तारण कर्ज घेऊ शकतो.

जर शेतकऱ्यांना या शेतमालावर कर्ज हवं असेल, तर या शेतमालाच्या संपूर्ण किमतीच्या 75 टक्के रक्कम सहा महिन्यासाठी सहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज म्हणून दिली जाते. म्हणजेचं या Shetmal Taran Karja Yojana 2024 योजनेचा दुहेरी फायदा आहे. शेतकऱ्यांना त्यांचा मालही साठवून ठेवता येतो. त्याचबरोबर त्यांना तारण कर्जही मिळतं.

शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी पात्रता आणि अटी

या Shetmal Taran Karja Yojana 2024 योजनेत कर्ज घेण्यासाठी काही पात्रता आणि अटीही आहेत, आपण त्या पाहुयात.

1) सध्या बाजारात विक्रेत्यांमध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी जास्त दिसतात. पण या योजनेअंतर्गत फक्त शेतकरीच आपला माल गोदामांमध्ये साठवून ठेवू शकतो. व्यापाऱ्यांना ही सवलत मिळत नाही.

2) जेव्हा शेतकरी गोदामात त्याचा शेतमाल ठेवतोय. त्यावेळेस बाजारात जी किंमत मिळते किंवा सरकारने जी आधारभूत किंमत ठरवली आहे, या किमतींमधून जी किंमत कमी असेल, तीच या शेतमालाची किंमत ग्राह्य धरली जाते.

3) जर या गोदामात साठवणूक केलेल्या मालावर कर्ज घ्यायचं असेल, तर मालाच्या 75 टक्के किंमत कर्ज म्हणून दिली जाते आणि या कर्जाची परतफेड करण्यासाठी सहा महिन्यांची म्हणजेचं 180 दिवसांची मुदत असते.

4) जर शेतकऱ्याने कर्जाची परतफेड सहा महिन्यांच्या आत केली, तर त्याला फक्त तीन टक्के व्याजदर लावला जातो. परंतु सहा महिन्यानंतर कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्याला सहा टक्के व्याजदर आकारला जातो.

5) सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी घेतल्यास पुढील सहा महिन्यांसाठी 12 टक्के व्याजदराने या कर्जावर व्याज आकारलं जातं.

शेतमाल तारण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये

महाराष्ट्रात सुरू झालेली ही Shetmal Taran Karja Yojana 2024 योजना खूपचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण या योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

1) जसं की आपण पाहिलं सुगीच्या दिवसात आपला शेतमाल न विकता शेतकरी बाजार समितीच्या गोदामांमध्ये तो सहा महिन्यासाठी साठवणूक करून ठेवू शकतो.

2) तसंच या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम शेतकऱ्याला तारण कर्ज म्हणून ही दिली जाते.

3) या रकमेवर परतफेड कधी केली गेली आहे, यानुसार तीन टक्क्यांपासून 12 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारलं जातं.

4) गोदामात ठेवलेल्या शेतमालाची देखरेख करणे याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची असते.

5) या शेतमालाची निगराणी करणे, या शेतमालास कोणतंही नुकसान न होऊ देणे, विमा काढणे आणि नुकसान झाल्यास शेतकऱ्यास भरपाई करून देणे, ही जबाबदारी बाजार समितीची असते.

शेतमाल तारण कर्ज योजनेत शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

ही Shetmal Taran Karja Yojana 2024 योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे, परंतु शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे ही महत्त्वाचं आहे.

1) जेव्हा शेतकरी सुगीच्या दिवसात आपला शेतमाल गोदामांमध्ये ठेवणार आहे. तेव्हा या शेतमालाला बाजार भाव कधी येईल, याकडेही लक्ष ठेवायला पाहिजे, म्हणजे बाजार भाव आल्यानंतर शेतकरी आपला माल बाजारात आणून चांगल्या किमतीत विकू शकतो.

2) बाजार समितीच्या गोदामात शेतमाल ठेवताना या शेतमालाची स्वच्छता करणं, शेतमाल चांगल्या प्रकारे जमा करणे ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे.

3) ही Shetmal Taran Karja Yojana 2024 योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावावर इतर व्यापाऱ्यांचा माल ठेवणं चुकीचं आहे.

4) या Shetmal Taran Karja Yojana 2024 योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यावर 180 दिवसापर्यंत व्याजदरात सवलत मिळते. त्यामुळे 180 दिवसांच्या आत शेतकऱ्यांनी हे कर्ज परतफेड केल्यास त्यांना जास्तीचं व्याज भरावं लागणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी

शेतमाल तारण कर्ज योजनेचे महत्त्व

एकूणचं महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली ही Shetmal Taran Karja Yojana 2024 योजना खूपचं कौतुकास्पद आहे. शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करून शेतामध्ये सोनं पिकवतो. परंतु जेव्हा बाजारात तो हे सोनं घेऊन येतो, तेव्हा त्याला कवडीमोल भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि मनस्थिती दोन्ही ढासळतात.

आपल्या देशातील शेतकऱ्यांची शेती फायदेशीर करायची असेल, नफ्यात आणायची असेल, त्यांना खरंच सुगीचे दिवस आणायचे असतील, तर अशा एक ना अनेक योजना राबवल्या गेल्या पाहिजेत, यात शंका नाही.

आपण बाजारात कोणतीही वस्तू विकत घेतो, त्यावेळेस या वस्तूचा जो उत्पादक असतो, त्याने या वस्तूवर स्वतःचा फायदा आधीचं ठेवलेला असतो. म्हणजे एक रुपयाची वस्तू दीड रुपये किंवा दोन रुपयांना तो विकतो. त्याशिवाय तो नुकसानीत कोणतीही वस्तू विकत नाही. परंतु अनेकदा शेतकऱ्यांना त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या मालावर नुकसान सहन करावं लागतं. त्यांना फायदा मिळत नाही आणि हे खूपचं चुकीचं आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळायलाचं हवा. त्यांनी शेतात पिकवलेल्या मालावर त्यांना फायदा व्हायलाचं हवा. सरकारने आणि नागरिकांनी सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायला हवी, एवढं मात्र नक्की.

त्यामुळेचं शेतमाल तारण कर्ज योजना Shetmal Taran Karja Yojana 2024 ही खूप महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक नाही, तर दोन दोन फायदे होतात. एक तर ज्यावेळेस बाजारात त्यांच्या शेतमालाला कमी भाव मिळतोय, तेव्हा ते गोदामामध्ये चांगला भाव मिळेपर्यंत शेतमाल साठवून ठेवू शकतात आणि तोपर्यंत उदरनिर्वाह चालवण्यासाठी या मालावर ते कर्जही घेऊ शकतात. म्हणूनचं ही योजना नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे.

LIC Jeevan Shanti Policy | एलआयसी जीवन शांती पॉलीसी 2024

FAQ About Shetmal Taran Karja Yojana 2024 शेतमाल तारण कर्ज योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : शेतमाल तारण कर्ज योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

उत्तर : या Shetmal Taran Karja Yojana 2024 योजनेअंतर्गत सुगीच्या दिवसात शेतकऱ्यांना शेतमालावर जो कमी भाव मिळतो आणि त्यांचं नुकसान होतं, हे नुकसान टाळणं आणि त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी शेतमालावर तारण कर्ज मिळवून देणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.

2) प्रश्न : शेतमाल तारण कर्ज योजनेवर शेतकरी आणि व्यापारी दोन्ही फायदा घेऊ शकतात का ?

उत्तर : नाही, या योजनेचा व्यापारी फायदा घेऊ शकत नाही. फक्त शेतकऱ्यांनाचं या योजनेचा फायदा मिळतो.

3) प्रश्न : शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती कर्ज मिळतं ?

उत्तर : या Shetmal Taran Karja Yojana 2024 योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतमालाच्या किमतीवर 75 टक्के कर्ज मिळतं.

4) प्रश्न : शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जावर किती टक्के व्याजदर आकारलं जातं ?

उत्तर : या योजनेअंतर्गत जितकं कर्ज मिळालं आहे, ते कर्ज फेडण्यासाठी 180 दिवसांची मुदत असते. या मुदतीत कर्ज फेडल्यास कर्जावर तीन टक्के व्याजदर आकारलं जातं किंवा त्यानंतर सहा टक्के आणि 12% व्याजदर आकारण्याची ही तरतूद आहे.

एकूणचं ही शेतमाल तारण कर्ज योजना खूपचं कौतुकास्पद आहे. या Shetmal Taran Karja Yojana 2024 योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला हवा, यात शंका नाही. तुमच्या मनात या योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top