Shegaon Kachori Recipe In Marathi | शेगांव कचोरी रेसिपी 2024

Shegaon Kachori Recipe In Marathi

Shegaon Kachori Recipe In Marathi

Shegaon Kachori Recipe In Marathi शेगांव हे श्री संत गजानन महाराजांचं अतिशय प्रसिद्ध गाव आहे आणि तिथलीच शेगांव कचोरी हीसुद्धा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या जबरदस्त टेस्टमुळे सगळेजण हीच कचोरी खाणं खूप पसंत करतात. ही टेस्टी कचोरी सर्वात आधी आपल्या महाराष्ट्रातील शेगांवात बनवली गेली त्यामुळे या कचोरीला शेगांव कचोरी Shegaon Kachori Recipe In Marathi असं नाव पडलं.

सध्या शेगांव कचोरीची क्रेझ पाहता ती आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सहजपणे खाण्यासाठी मिळून जाते. उत्तर भारतात मिळणाऱ्या कचोरीपेक्षा आपली ही शेगांवची कचोरी खूप वेगळी असते. शेगांव कचोरी ही खूप खस्ता खुसखुशीत असते आणि त्यातले मसालेही उत्तम असतात.

सगळेजण खूपच आवडीने ही कचोरी खाताना दिसतात. सगळीकडे ही कचोरी सहज मिळते पण आपण जर आपली फेव्हरेट शेगांव कचोरी घरीच बनवली तर किती छान होईल. घरी बनवलेली ही कचोरी खूपच टेस्टी आणि हेल्दी बनेल.

आज आम्ही तुमच्यासाठी शेगांव कचोरी घरच्याघरी बनवण्याची एकदम सोपी रेसिपी Shegaon Kachori Recipe In Marathi घेऊन आलो आहोत.

Ingredients For Shegaon Kachori Recipe In Marathi शेगांव कचोरी बनवण्याचं साहित्य :

शेगांव कचोरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.

कचोरीची पारी बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

  • 3 कप मैदा
  • थोडंसं मीठ
  • पाव कप तेल
  • थोडंसं पाणी

कचोरीतील सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

  • 2 मोठे चमचे धने
  • 1 मोठा चमचा बडीशेप
  • 1 छोटा चमचा जिरे
  • 1 प्लेट कोथिंबीर
  • 2 आल्याचे काप
  • 5-6 हिरव्या मिरच्या
  • 9-10 लसणाच्या पाकळ्या
  • 2 मोठे चमचे तेल
  • अर्धा छोटा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा छोटा चमचा हळद
  • 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर
  • 2 छोटे चमचे साखर
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • 1 कप बेसन
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • अर्धा कप पाणी
  • तळण्यासाठी तेल
  • तळण्यासाठी काही हिरव्या मिरच्या

Procedure For Shegaon Kachori Recipe In Marathi शेगांव कचोरी बनवण्याची कृती :

शेगाव कचोरी Shegaon Kachori Recipe In Marathi बनवण्यासाठी आपण सर्वात आधी पारी तयार करून घेऊया.

  1. एका भांड्यात 3 कप मैदा घेऊया आणि त्यात थोडंसं मीठ, पाव कप कच्चं तेल टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. या मिश्रणाची मूठ पडली पाहिजे.
  2. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचाय. आपला गोळा तयार झाल्यानंतर अर्धा तास तो तसाच ठेवायचा आहे.
  3. आता कचोरीच्या आतील सारण तयार करून घेऊया.
  4. यासाठी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे धने, 1 मोठा चमचा बडीशेप, 1 छोटा चमचा जिरे घेऊन मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे छान सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं.
  5. भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्यायचं आणि एका भांड्यात टाकायचं. धने आणि बडीशेप अख्खे दिसले पाहिजे.
  6. पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 प्लेट कोथिंबीर घ्यायची. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून वाळवायची आणि मग बारीक चिरायची. शेगांव कचोरीच्या आतल्या सारणाला हिरवेपणा हा कोथिंबीरमुळेच आलेला असतो. थोडीशी कोथिंबीर आपण बाजूला ठेवणार आहोत.
  7. कोथिंबीरसोबत मिक्सरच्या भांड्यात 2 आल्याचे काप, 5-6 हिरव्या मिरच्या, 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकून वाटून घ्यायचं आणि एका वाटीत काढून घ्यायचं.
  8. त्यानंतर एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं. हे तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट टाकून थोडा वेळ परतून घ्यायचं.
  9. त्यानंतर यात धने, बडीशेप आणि जिरेचं वाटण टाकून परतून घ्यायचं. मग अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट पावडर, 2 छोटे चमचे साखर आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व टाकून परतून घ्यायचं आहे.
  10. चवीनुसार मीठ आणि उरलेली कोथिंबीर टाकून मध्यम आचेवर परतून घ्यायचं. त्यानंतर 1 कप बेसनपीठ टाकून मध्यम आचेवर चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचंय. 12 ते 15 मिनिटे मध्यम आचेवर हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे.
  11. यामध्ये आता आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी शिंपडून छान परतून घ्यायचं. 1 कप बेसन आपण घेतलंय त्यासाठी अर्धा कप पाणी आपल्याला लागेल. थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी टाकून आपण हे परतून घेणार आहोत.
  12. आपलं बेसन छान परतलं आहे. आता कढईवर एक झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 6 मिनिटे एक वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटांनंतर आपलं सारण तयार आहे हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे.
  13. आता या सारणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर सारण कोरडं वाटत असेल तर त्यात गरम तेल किंवा गरम पाण्याचा शिपका मारून सॉफ्ट करू शकता पण खूप सॉफ्ट नाही करायचं फक्त गोळे बनवता येतील एवढंच सॉफ्ट पाहिजे. सर्व गोळे छान तयार करून घ्यायचे.
  14. अर्ध्या तासानंतर आपला मळलेला मैदा छान मुरला आहे. याचेसुद्धा आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत.
  15. एक गोळा घेऊन आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. जेवढ्या आकाराची आपल्याला कचोरी हवी त्यापेक्षा कमी आकाराची पारी लाटायची. त्यानंतर आपण जे गोळे बनवले आहेत ते यामध्ये टाकून मोदकासारखं बनवायचं आहे त्यामुळे आपलं सारण बाहेर येणार नाही.
  16. आता सगळ्या बाजूने गोल गोल फिरवून छान गोळा तयार करायचा आहे. या गोळ्याला हाताने चपटा करून कचोरी लाटून घ्यायची आहे. कचोरी भरताना त्याचं वरचं कव्हर पॅक असलं पाहिजे थोडाही गॅप नको किंवा सारण दिसायला नको नाहीतर तुमची कचोरी फुटू शकते आणि तेल खराब होऊ शकतं.
  17. आपल्या सगळ्या कचोऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कचोऱ्या तेलात तळून घ्यायच्या आहेत. यासाठी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायचं आहे आणि मंद गॅसवर कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत.
  18. कचोऱ्या मैद्याच्या आहेत आणि पारी जाड असल्यामुळे कचोरी तळायला 10 ते 12 मिनिटे वेळ लागू शकतो. खरपूस रंग येईपर्यंत कचोऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत.
  19. आपली शेगांव कचोरी तयार आहे. यासोबतच मिरच्या कापून मग तळून घ्यायच्या आहेत. कचोरीसोबत मिरची खूप टेस्टी लागते.

आपली खुसखुशीत शेगांव कचोरी Shegaon Kachori Recipe In Marathi मिरचीसोबत तुम्ही एका प्लेटमध्ये सर्व्ह करू शकता. ही कचोरी सर्वांना नक्कीच आवडेल.

Homemade Pizza Recipe In Marathi | पिझ्झा रेसिपी मराठी 2024

शेगांव कचोरी महत्वाच्या टिप्स :
  1. शेगांव कचोरीमधील Shegaon Kachori Recipe In Marathi सारण हिरवं असतं. हा हिरवेपणा कोथिंबीरमुळे येतो त्यामुळे भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची.
  2. कचोरीतील सारण बनवताना 1 कप बेसनाला अर्धा कप पाणी घ्यायचं. त्यावर थोडं थोडं पाणी शिंपडायचं.
  3. सारण तयार करताना ते जास्त सॉफ्ट करायचं नाही गोळे होतील एवढंच करायचं.
  4. कचोरीमध्ये Shegaon Kachori Recipe In Marathi सारण भरताना ते बाहेर दिसायला नको नाहीतर कचोरी तळताना फुटू शकते आणि तेल खराब होऊ शकतं.
  5. मिरचीमध्ये काप करून मग त्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे तळताना त्या फुटत नाहीत.

या सर्व टिप्स वापरून आपली शेगांव कचोरी खूपच टेस्टी बनू शकते.

FAQ About Shegaon Kachori Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :
  1. Shegaon Kachori Recipe In Marathi कशापासून बनवली जाते ?

शेगांव कचोरी ही खूपच टेस्टी असते आणि सर्वांना खायला आवडते. ही कचोरी मैद्यापासून बनवलेली असते आणि यामध्ये बेसन, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि खूप सारे मसाले वापरून सारण भरलं जातं. त्यानंतर ही कचोरी लाटून मग तेलात तळली जाते. आपली कचोरी तयार आहे.

  1. Shegaon Kachori Recipe In Marathi शोध कोणी लावला ?

कचोरी हा राजस्थानचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. असे पुरावे नाहीत पण मानलं जातं की कचोरी ही राजस्थानमधील मारवाड भागातील मारवाडी लोकांनी बनवली होती. त्यांच्यामुळेच कचोरीची सर्वांना ओळख झाली.

  1. Shegaon Kachori Recipe In Marathi प्रकार कोणकोणते आहेत ?

कचोरीचे खूप सारे प्रकार असतात. बटाटा कचोरी, कांदा कचोरी, मूगडाळ कचोरी, पनीर कचोरी, मावा कचोरी, राज कचोरी, चायनीज कचोरी, बटाटा कांदा कचोरी अशा अनेक प्रकारच्या कचोरी असतात. त्या आपण नक्की ट्राय करायला हव्या.

  1. कचोरी खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे का ?

कचोरी ही कधी कधी खाणं चांगलं आहे. कचोरीमध्ये जास्त प्रमाणात फॅट, सोडिअम आणि कार्बोहायड्रेट असतात आणि त्याचे कमी प्रमाणात पौष्टिक फायदे असतात. जास्त प्रमाणात कचोरी खाल्ली तर ते चांगलं नसतं आणि तब्येतीच्या तक्रारी वाढू शकतात.

  1. Shegaon Kachori Recipe In Marathi आणि समोसामध्ये काय फरक आहे ?

कचोरी आणि समोसा या दोन्हींमध्ये खूप फरक असतो. कचोरीमध्ये बेसन, कोथिंबीर आणि खूप साऱ्या मसाल्याचं सारण असतं. तर समोश्यामध्ये मसालेदार बटाटा, वाटाणे असतात. कचोरीचा आकार गोल असतो तर समोसा त्रिकोणी आकाराचा असतो.

तुम्ही ही आपली टेस्टी शेगांव कचोरी घरच्यांना सर्व्ह करू शकता. तुमच्या घरातील सर्वांना ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील हे नक्की. घरी बनवलेली शेगांव कचोरी बाहेरच्या पेक्षाही अधिक टेस्टी आणि हेल्दी बनेल ही आमची गॅरेंटी आहे त्यामुळे आता बाहेर कधीही कचोरी खावी लागणार नाही.

तुम्हाला ही Shegaon Kachori Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top