Share Market Information In Marathi वर्तमानपत्र असो किंवा टीव्ही चॅनल्स, राजकारणा व्यतिरिक्त एखाद्या क्षेत्रातील सर्वात जास्त बातम्या येत असतील, तर ते शेत्र म्हणजे “शेअर मार्केट.” आज शेअर मार्केट कोसळलं, आज शेअर मार्केट वर चढलं, इतक्या हजार कोटींचं नुकसान झालं, तितक्या शेकडो कोटींचा फायदा झाला, अशा अनेक बातम्या तुम्ही रोजचं वाचत असाल, पहात असाल.
मग अशावेळेस प्रत्येकाच्याचं मनात एक प्रश्न येतो की, (Share Market Information In Marathi) शेअर मार्केट म्हणजे काय ? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण फायद्याचं की तोट्याचं ? खरंच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने रातोरात करोडपती होता येतं का ?
आज आम्ही तुम्हाला याबद्दलचं माहिती सांगणार आहोत.
(Share Market Information In Marathi) शेअर मार्केट म्हणजे काय ?
शेअर मार्केट ही अशी एक जागा आहे, जेथे कंपनीच्या शेअरची ब्रोकर मार्फत खरेदी किंवा विक्री केली जाते.
शेअर्स म्हणजे काय ?
कोणतीही कंपनी मार्केटमध्ये आपले शेअर्स आणू शकते. या शेअरची एक किंमत ठरवली जाते. मराठीमध्ये शेअर्स म्हणजे “भाग”. एखाद्या कंपनीने त्यांचे 100 शेअर्स जर मार्केटमध्ये Share Market Information In Marathi आणले आणि आपण त्यातील एक शेअर खरेदी केला, तर आपण कंपनीचे शेअर होल्डर म्हणजेचं भागधारक होतो.
असे कंपन्यांचे लाखो शेअर शेअर मार्केटमध्ये असतात आणि याचा फायदा घेऊन कंपन्या शेअर होल्डर्सच्या पैशातून कंपनीचं एक मोठं भांडवल तयार करतात. भांडवल जमा करण्यासाठी अनेक कंपन्या आपले शेअर शेअर मार्केटमध्ये आणत असतात.
आपल्या भारतात शेअरची खरेदी आणि विक्री दोन स्टॉक एक्सचेंजमध्ये होते.
१) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)
२) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)
शेअर मार्केटमध्ये शेअर कसे खरेदी करायचे ?
शेअर मार्केटमधून (Share Market Information In Marathi) शेअर खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला आहे ऑफलाइन आणि दुसरा आहे ऑनलाइन.
१) ऑफलाइन : तुम्ही शेअर ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा त्यांना फोन करून स्वतःच्या नावाने शेअर्स खरेदी करू शकतात.
२) ऑनलाइन : सध्याच्या इंटरनेटच्या युगात मोबाईल ॲप्लिकेशन किंवा वेबसाईटचा वापर करून तुम्ही शेअर ब्रोकरच्या वेबसाईट किंवा ॲप्लिकेशनवरून शेअर ऑनलाईन खरेदी किंवा विक्री करू शकतात.
शेअर मार्केटमध्ये (Share Market Information In Marathi) विकत घेतलेले शेअर हे तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात.
डिमॅट अकाउंट म्हणजे काय ?
डिमॅट अकाउंटचा फुल फॉर्म आहे “dematerialized account“.
काही वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स (Share Market Information In Marathi) विकत घ्यायचा, तेव्हा तुम्हाला कागदपत्रांच्या स्वरूपात हे शेअर्स दिले जायचे. मग ही कागदपत्र फाटणं, म्हणजे शेअर फाटणं, हरवण, अशा घटना घडायच्या. परंतु आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये शेअर्स इलेक्ट्रॉनिक झाले आहेत. म्हणजेचं डिमॅट अकाउंट हे एक असं अकाउंट आहे, ज्यामध्ये तुमचे शेअर्स, म्युचल फंड, बॉण्ड आणि इतर गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये जतन केले जातात.
सध्या अनेक शेअर ब्रोकर्स डिमॅट अकाउंट फ्रीमध्ये ओपन करून देतात.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून रातोरात करोडपती होता येतं का ?
तुम्ही अशा अनेक बातम्या, अनेक किस्से ऐकले असतील की, शेअर मार्केटमध्ये (Share Market Information In Marathi) हा व्यक्ती रातोरात करोडपती झाला.
परंतु असं काहीही नसतं. शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या लिस्टेड आहेत. त्यांचं बाजारमूल्य काय आहे, हे ते कोणता व्यवसाय करतात ? तो व्यवसाय कसा चालतोय ? प्रॉफिट किती आहे ? लॉस किती आहे ? त्यानंतर गुंतवणूकदार या शेअरमध्ये, या कंपनीमध्ये किती गुंतवणूक करताय, त्या कंपनीचे शेअर खरेदी करत आहेत की नाही, या सर्व गोष्टींचा परिणाम त्या त्या कंपनीच्या शेअरच्या किमतीवर होतो.
एकूणच शेअर मार्केटमध्ये (Share Market Information In Marathi) कोणीही रातोरात करोडपती किंवा लखपती होत नाही. संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय येथे गुंतवणूक करू नये. नाहीतर फायद्यापेक्षा तोटा होण्याची जास्त संभावना असते.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, हा Share Market Information In Marathi लेख फायदेशीर वाटल्यास नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !