SBI Amrit Kalash Fixed Deposit सध्या अनेक लोकांकडे पैसा तर आहे, परंतु हा पैसा गुंतवायचा कोठे ? हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक त्यावर जास्त व्याज मिळवणं, त्याचबरोबर तो सुरक्षित राहणं, या अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं.
अनेक लोकांचा कल फिक्स डिपॉझिटकडे असतो. फिक्स डिपॉझिटमध्ये पैसा सुरक्षितही राहतो, त्याचबरोबर त्यावर चांगलं व्याजही मिळतं. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी अशीचं एक सुरक्षित आणि जास्त व्याज देणारी फिक्स डिपॉझिट योजना घेऊन आलो आहोत.
SBI Amrit Kalash Fixed Deposit
या योजनेचे नाव आहे (SBI Amrit Kalash Fixed Deposit) एसबीआय अमृत कलश फिक्स डिपॉझिट योजना. या योजनेची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत, आपण ती पाहूयात.
एसबीआय अमृत कलश एफडीमध्ये फक्त 400 दिवसांसाठी गुंतवणूक करायची असते. 400 दिवसानंतर मॅच्युरिटीवरील व्याज देऊन तुमचे पैसे परत केले जातात. त्याचबरोबर टीडीएस आणि इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे कपातही केली जाते.
पोस्ट ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट जॉब
एसबीआय अमृत कलश फिक्सड डिपॉझिट योजना
एसबीआय अमृत कलश योजनेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत चक्क 7.1 टक्के व्याजदर दिले जाते. तर वरिष्ठ नागरिकांसाठी हेच व्याजदर 7.5 टक्के आहे. तसंच या योजनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 कोटी रुपये गुंतवू शकता. म्हणजे पैसे गुंतवण्याची लिमिटसुद्धा मोठी आहे
असं नाहीये की, तुम्ही गुंतवलेले पैसे 400 दिवसांच्या आत तुम्ही काढून घेऊ शकत नाही. पैसे मॅच्युरिटीआधी काढून घेण्याची या योजनेत सोय केलेली आहे.
मागील काही दिवसांमध्ये एसबीआय ची ही योजना खूप लोकप्रिय ठरली आहे आणि फक्त काही काळासाठी सुरू झालेल्या या योजनेला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 सप्टेंबर 2024 अशी आहे.
तुम्ही अशी एखादी गुंतवणुकीची योजना शोधत असाल, जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील, व्याजदर जास्त मिळेल आणि तुम्हाला सरकारची सुरक्षितताही मिळेल, तर त्यासाठी एसबीआयची अमृत कलश एफडी योजना खूप योग्य आहे, यात शंका नाही.
तर तुम्ही एसबीआयच्या या अमृत कलश एफडी योजनेमध्ये (SBI Amrit Kalash Fixed Deposit) गुंतवणूक कराल का ? तुम्हाला यापेक्षा चांगली योजना तुम्हाला माहित आहे का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !