Sasu Sun Marathi Goshta “अगं हो गं आई, तू ज्या चोर ओटीबद्दल बोलतेय ना, ती भरायला येते मी उद्या घरी, काळजी करू नकोस. चल बाय, आता ठेवते मी. मला दुपारचं डायट खायचंय.” असं म्हणून काव्या फोन कट करते.
ती मागे वळून पाहते, तर तिची सासू पार्वती उभी असते. पार्वतीच्या चेहऱ्यावर आश्चर्य असतं आणि ती विचारते,”सुनबाई तू गरोदर आहेस आणि तुझी चोरोटी भरायची आहे, म्हणजे तीन महिने झालेत तुझ्या गरोदरपणाला आणि तू मला सांगितलंही नाही.”
Sasu Sun Marathi Goshta
काव्या तोंड वेडवाकड करते आणि म्हणते, “सासुबाई मी प्रेग्नेंट आहे, मग तुम्हाला कशाला सांगायचं ? तुमचा काय संबंध ?” पार्वती म्हणते,”असं का बोलतेस सुनबाई ? तुझी सासू आहे मी. सून आहेस तू माझी, तुझ्या पोटात माझ्या मुलाचं बाळ आहे. आजी होणार आहे मी. मग मला नको का सांगायला ?”
काव्या म्हणते, “ते मला माहितीये हो, आता इमोशनल ड्रामा करू नका. Sasu Sun Marathi Goshta मी तुम्हाला सांगितलं नाही कारण मला माहिती होतं, एकदा का तुम्हाला कळलं, मग तुमची ही चटरफटर सुरू होईल. सुनबाई असं कर, तसं कर, हे करू नको, ते करू नको. मला खूप बाळंतपणाचा अनुभव आहे. गावात मी खूप डिलिव्हरी केलेल्या आहेत. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नव्हतं, म्हणून तुम्हाला सांगितलं नाही.
आणि एक लक्षात ठेवा, मला काहीही सल्ले द्यायचे नाहीत. मी एक डायटीशनला भेटलेय, डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतेय, त्यांनी मला सगळं सांगितलंय. मला काय खायचं, काय प्यायचं, काय करायचं, काय नाही करायचं, ते सगळं मला डॉक्टर सांगणार आहेत. तुम्ही नाही सांगायचं. मला फुकटचे सल्ले नाही द्यायचे. मी काही ऐकून घेणार नाही. मी शहरातली, शिकलेली मुलगी आहे. तुमच्यासारखी गावातली अडाणी बाई नाही आणि तुमच्याकडून मी काही ऐकून घेणार नाही.”
असं म्हणून काव्या रागाने निघून जाते. पार्वतीला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं. Sasu Sun Marathi Goshta पार्वती लगेच तिच्या दुबईतील मुलाला फोन करते आणि म्हणते, “अरे अनिल, ऐकलस का, तुझी बायको गरोदर आहे.” अनिल म्हणतो, “आई मला माहितीये ते.” पार्वती विचारते, “मग मला का नाही सांगितलं ?” अनिल म्हणतो, “आई तुला माहितीये ना, तुझी सून कशी आहे. तिनेच मला सांगितलं होतं की, तुझ्या आईला काही सांगू नको आणि उगाच घरात वाद नको, म्हणून मी तुला नाही सांगितलं. वाईट वाटून घेऊ नकोस आणि तिच्या जास्त मागे मागे सुद्धा करू नकोस. नाहीतर ती तुलाच काही बाही बोलेल. चल आता मला काम करायचंय” असं म्हणून अनिल फोन कट करतो.
मराठी गोष्ट
पार्वती फोन ठेवते आणि खूप दुःखी होते. पार्वतीचा मुलगा आणि काव्याचा नवरा अनिल दुबईला कामाला होता आणि तो काव्याला बाळ झाल्यानंतरचं परत येणार होता. पार्वती गावी राहायची. परंतु अनिलचे बाबा गेल्यानंतर अनिलने तिला शहरात आणलं होतं. परंतु त्यांचं राहणीमान गावाकडचं Sasu Sun Marathi Goshta असल्यामुळे काव्याला सासू आवडत नव्हती. ती पार्वतीशी नीट बोलतही नव्हती. त्यांचा अपमान करायची. पार्वती गरीब स्वभावाची असल्यामुळे सर्व सहन करत होती.
पार्वतीला काव्याच्या प्रेग्नेंसीबद्दल समजल्यानंतर काव्या तिचं काहीचं ऐकत नव्हती. ती स्वतःच्या मनाने आणि तिच्या आईच्या सांगितल्याप्रमाणे सगळं करायची. चोरोटीचा कार्यक्रम सुद्धा तिने माहेरीचं केला आणि पार्वतीला बोलवलंसुद्धा नाही. त्याचबरोबर सातव्या महिन्याचा कार्यक्रमसुद्धा तिच्या माहेरीचं झाला. पार्वतीला त्याचंही निमंत्रण नव्हतं. सासू घरात आहे की नाही, याची सुद्धा काव्याला आठवण नव्हती. ती तिच्या जगात राहायची. सासूला ती काडीचंही महत्व देत नव्हती.
मराठी कथा
या सगळ्याचा पार्वतीला खूप त्रास होत होता. कारण काहीही झालं तरी आजी Sasu Sun Marathi Goshta आजोबांसाठी त्यांची नातवंड खूप प्रेमाची असतात. मुलांपेक्षाही जास्त. परंतु त्याच होणाऱ्या नातवंडाची थोडीफारही काळजी पार्वतीला घेता येत नव्हती. याचं दुःख तिच्या मनात सलत होतं. एकदा दोनदा तिने काव्याला समजवण्याचा प्रयत्न केला की, “तू माझं काही ऐकू नकोस. पण मी या घरात आहे, एवढी तरी जाणीव ठेव आणि बाळ झाल्यानंतर मी बाळाला सांभाळेल.” परंतु काव्याने त्यासाठीही नकार दिला आणि म्हणाली, “मी एखादी आया ठेवेल. मला तुमची गरज नाहीये आणि माझ्या बाळाला हातही लावायचं नाही.” अशीच तंबी काव्याने पार्वतीला दिली.
बाळाच्या जन्मानंतर अनिल घरी येईल आणि तो नक्कीच काव्याला समजावून सांगेल, Sasu Sun Marathi Goshta असं पार्वतीला वाटलं आणि ती शांत बसली. पाहता पाहता काव्याला नववा महिना सुरू होतो. तिच्या डिलिव्हरीला एक डेट दिलेली असते. त्याच्या 15 दिवसआधी ती तिच्या आई बाबाकडे जाणार असते आणि तेच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार असतात. परंतु या डेटच्या पंधरा दिवस आधीचं काव्याला पोटात दुखू लागतं.
मध्यरात्री झालेली असते आणि काव्याच्या पोटात दुखू लागतं. ती तिच्या आई-बाबांना फोन करण्याचा प्रयत्न करते. परंतु मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नेटवर्क गायब झालेलं असतं. घरातील लँडलाईनही बंद असते. त्यामुळे काव्याला कोणालाही कॉन्टॅक्ट करता येत नाही.
पार्वती तिच्या खोलीत झोपलेली असते. परंतु काव्याच्या ओरडण्याचा आवाज तिच्या खोलीपर्यंत जातो Sasu Sun Marathi Goshta आणि पार्वती झोपेतून जागी होते. तिला समजतं की, हा तर काव्याचा आवाज आहे आणि ती धावत काव्याच्या रूममध्ये येते. तर काव्या बेडवर लोळत असते. तिच्या पोटात खूप दुखत असतं. पार्वती विचारते, “काय झालं सुनबाई ?”
मराठी रडवणारी गोष्ट
काव्या म्हणते, “माझ्या पोटात खूप दुखतंय ?” पार्वतीला समजतं की, आता काव्याचे दिवस भरलेत. तिची डिलिव्हरी होणार आहे. पार्वती म्हणते, “तुझी डिलिव्हरी होणार आहे, असं दिसतंय.” काव्या म्हणते, “मलाही तेच वाटत होतं, म्हणून मी माझ्या मॉम डॅडला फोन केला, पण फोनचं लागत नाहीये, Sasu Sun Marathi Goshta नेटवर्क नाहीये. तुम्ही एखादी टॅक्सी, नाहीतर रिक्षा बोलून आणा.”
पार्वती हो म्हणते आणि घराबाहेर जाते. तर मुसळधार पाऊस पडत असतो. ती छत्री घेऊन बाहेर जाते आणि आजूबाजूला शोधते. परंतु मध्यरात्रीची वेळ आणि इतका मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोठेही रिक्षा किंवा टॅक्सी नसते. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणीही साचलेलं असतं.
पार्वती घरी परत येते. तेव्हा काव्या आणखीनचं विव्हळत असते. पार्वती सांगते, “सगळीकडे पाणी भरलंय. Sasu Sun Marathi Goshta टॅक्सी किंवा रिक्षा नाहीये.” काव्या म्हणते, “मग आता काय करायचं ? मला खूप त्रास होतोय. मला आणि माझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे.” पार्वती म्हणते, “सुनबाई माझ्याकडे एक मार्ग आहे, मी करू शकते तुझी डिलिव्हरी.”
हे ऐकून काव्याला मोठा धक्काचं बसतो. ती म्हणते, “हे काय बोलताय तुम्ही ? हे काय तुमचं गाव आहे का, माझी डिलिव्हरी करायला. तुम्ही काय डॉक्टर आहात का ? माझी डिलिव्हरी तुम्ही कशी करू शकतात ?” पार्वती म्हणते, “का नाही करू शकत. मी गावात शेकडो बायकांच्या डिलिव्हरी केल्या Sasu Sun Marathi Goshta आहेत. हेच तर काम करायचे मी गावाकडे. मला माझ्या आजीने आणि मग त्यानंतर आईने शिकवलंय. त्याही हेच काम करायच्या.
हे तुमचे दवाखाने, हॉस्पिटल आज झालंय. आधी असं काही नव्हतं. सगळ्या डिलिव्हरी घरीच व्हायच्या.” Sasu Sun Marathi Goshta काव्या म्हणते, “नाही, पण माझी डिलिव्हरी घरी नाही होणार. माझ्या अंगाला हात नाही लावायचा. माझ्या बाळाच्या जीवाचं काही बरवाईट झालं, तर काय करायचं ?”
पार्वती म्हणते, “काळजी करू नकोस, तुझ्या बाळाला काही नाही होणार. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव.” परंतु काव्या म्हणते, “नाही माझ्याजवळ नका येऊ.” पार्वतीला समजतं की, आता काव्याला समजावून काही फायदा नाही. अजून उशीर केला, तर खरच तिला आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.
त्यामुळे पार्वती कधी नव्हे ती काव्यावर जोरात ओरडते आणि म्हणते, “गप्प बस. सासू आहे मी तुझी, Sasu Sun Marathi Goshta अन तू माझी सून. त्यामुळे आता तू माझा ऐकायचं. जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही, तोपर्यंत कळा देण्याशिवाय दुसरं काहीही करायचं नाही. परत माझ्या अंगाला हात लावू नका, तुम्ही गावठी आहात, गावंढळ आहात, गावाकडच्या आहात, मी शहरातली आहे, स्टॅंडर्ड आहे, असं काही बोलली, तर थोबाडीत ठेवून देईल एक.”
पार्वतीचा हा रुद्रावतार पाहून काव्या चांगलीचं घाबरते. तिला समजतं, आता तिच्याकडे कोणताचं पर्याय Sasu Sun Marathi Goshta नाहीये आणि ती मूग गिळून गप्प बसते. पार्वती पुढील दहा मिनिटांमध्ये डिलिव्हरीची सगळी तयारी करते. तिने एकटीनेच डिलिव्हरी करायची ठरलेलं असतं आणि ती काव्याची डिलिव्हरी प्रोसेस सुरू करते. पार्वतीला गावामध्ये डिलिव्हरी करण्याचा मागील अनेक वर्षांचा अनुभव असतो.
पुढील पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ती काव्याची डिलिव्हरी एकदम सुखरूप नॉर्मल करते. काव्या आणि तिचं बाळ सुखरूप असतं. काव्याला मुलगा झालेला असतो, त्यामुळे पार्वती आणि काव्या या दोघांनाही खूप आनंद होतो. बाळाला पाहून काव्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबतो. मोबाईलचे नेटवर्कही परत येतात. काव्या तिच्या आई-बाबांना Sasu Sun Marathi Goshta फोन करून बोलावते आणि अनिलला दुबईला फोन करते. तो घरी यायला निघतो. काव्याचे आई बाबा घरी पोहोचतात आणि जेव्हा त्यांना सत्य समजतं की, पार्वतीने घरीच काव्याची डिलिव्हरी केलीये. तेव्हा त्यांना खूप राग येतो. काव्याची आई म्हणते, “तुम्हाला काही अक्कल आहे की नाही, असं कोणी घरच्या घरी डिलिव्हरी करत का ? माझ्या लेकीच्या जीवाला काही झालं असतं, बाळाला काही झालं असतं, तर काय केलं असतं ?”
पार्वती एक शब्दही बोलत नाही. कारण तिला माहीत असतं, ही मूर्ख बाई आहे. तिला समजावून काही फायदा नाही. पण काव्या चक्क पार्वतीची बाजू घेते आणि म्हणते, “मॉम गप्प बसायचं. माझ्या आईने काही चुकीचं केलेलं नाहीये. तिला बोलायचं नाही. काल रात्री त्यांनी माझा आणि माझ्या बाळाचा जीव वाचवला आहे. त्या जर नसत्या, तर मी आज जिवंत नसते. त्यामुळे तोंड सांभाळायचं आणि नीट बोलता येत नसेल तर निघायचं इथून.”
हे ऐकून काव्याच्या आईला मोठा धक्काचं बसतो. Sasu Sun Marathi Goshta काव्याची आई म्हणते, “काव्या तू या गावठी अडाणी बाईसाठी मला बोलतेस का ?” काव्या म्हणते, “त्या गावठी आणि अडाणी नाहीयेत. तुझ्यापेक्षा दहापट जास्त अनुभव आणि ज्ञान आहे त्यांच्याकडे. खरी गावठी आणि अडाणी तू आहेस.”
तेवढ्यात कोणीतरी टाळ्या वाजवतं. सगळे मागे वळून पाहतात. तर चक्क अनिल असतो. Sasu Sun Marathi Goshta अनिलला पाहून काव्या आणि पार्वतीला खूप आनंद होतो. अनिल म्हणतो, “वा काव्या वा, आज खरचं तू माझं मन जिंकलंस. अभिमान वाटतो मला तू माझी बायको असल्याचा आणि माझ्या आईचा अभिमान तर मला नेहमी होताचं.” असं म्हणून तो पार्वतीच्या पाया पडतो. पार्वती त्याला मिठी मारते आणि म्हणते, “पहा तुझं बाळ” आणि ती बाळाला अनिलच्या हातात देते.
अनिल म्हणतो, “अगदी तुझ्यावर गेलंय आणि याने तुझ्यासारखं हुशार Sasu Sun Marathi Goshta आणि संस्कारी व्हावं हीच माझी इच्छा आहे.” अनिल काव्यालाही जवळ घेतो. हे दोघेही खूप खुश असतात. काव्याचे आई-बाबा चिडतात आणि तिथून निघून जातात.
काव्या पार्वतीला म्हणते, “आई माफ करा मला. मी खूप चुकले, आजपर्यंत तुमचा अनेकदा अपमान Sasu Sun Marathi Goshta केला. तुम्हाला कमी लेखलं. गावठी अडाणी म्हटलं. परंतु तुम्ही तर आमच्यापेक्षा खूप मोठ्या निघालात. माझी खूप मोठी चूक झाली. मी माफ करण्याच्या लायकीची नाहीये.”
पार्वती म्हणते, “सुनबाई असं बोलू नकोस. झालं गेलं विसरून जा. आता आपल्या बाळाची काळजी घ्यायची ना. मला माझ्या नातवंडाबरोबर खूप खेळायचंय त्याला चांगले संस्कार द्यायचेत.” काव्या म्हणते, “हो आई, तुम्हीच द्या संस्कार माझ्या बाळाला. तुमच्यासारखचं संस्कारी आणि हुशार व्हायला Sasu Sun Marathi Goshta पाहिजे माझं बाळ.”
त्या दिवसानंतर काव्या, अनिल, पार्वती Sasu Sun Marathi Goshta आणि त्यांचं बाळ खूप आनंदी राहतं. हे सुखी कुटुंब बनतं.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !