Sasra Sunn Marathi Story मेघनाच्या लग्नाला अवघे सहा महिने झाले होते. परंतु नवीन लग्न म्हणण्यासारखं त्या दोघांमध्ये काहीही नव्हतं. मेघना ही खूप दुःखी रहायची. एका नव्या नवरीसारखं तेज तिच्या चेहऱ्यावर कधीचं दिसलं नव्हतं.
जेव्हा मेघनाचं लग्न ठरलं, तेव्हा ती खूप खुश होती. तिला नवरा, सासर खूपचं छान भेटलंय, असं सगळे म्हणायचे. मेघनाचा नवरा आशिषही दिसायला सुंदर होता. एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होता. तर सासू-सासरे ही हौशी आणि मॉडर्न होते. एकुलता एक मुलगा असल्यामुळे तेही मेघनाचे खूप लाड करायचे.
Sasra Sunn Marathi Story
परंतु लग्न झाल्यानंतर सगळं बदललं. मेघनाचा नवरा आशिष हा रात्रंदिवस कामातचं असायचा. घरीही तो लॅपटॉप घेऊनचं बसायचा आणि नोकरीला गेल्यानंतर मेघनाने कधी फोन केला, तर तो फोन उचलत नव्हता. एखाद्या अनोळखी मुलीसारखं तो मेघनाशी बोलणंही टाळायचा.
मेघनाला वाटायचं की, आपलं नवीन नवीन नातं हे म्हणून त्यांना असं होत असेल. परंतु महिन्यानंतर महिने उलटले, तरी सुद्धा या नात्यात काहीच बदललं नव्हतं. त्यामुळे मेघना ही दिवसेंदिवस दुखी राहायला लागली. Sasra Sunn Marathi Story आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम नाही, त्यांना मी आवडत नाही, या विचाराने ती पूर्णपणे निराश झाली होती.
मेघनाच्या सासू-सासर्यांना सगळं दिसत होतं. दोघांनीही आपल्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आशिष एक दिवस स्पष्टव्ह बोलला, मला ती आवडत नाही. मी तुम्हाला लग्नाच्या आधी सांगितलं होतं ना, माझं एका मुलीवर प्रेम आहे. Sasra Sunn Marathi Story माझ्या एका कलीगबरोबर माझं अफेअर आहे. मला तिच्याशी लग्न करायचंय. पण तुम्ही जबरदस्तीने माझा हिच्याशी लग्न करून दिलं. आता भोगा तुमच्या कर्माची फळं.
मेघनाने आशिषचं हे उत्तर ऐकलं होतं. तेव्हापासून ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. अनेकवेळेस आत्महत्या करण्याचे विचारही तिच्या मनात येऊन गेले. Sasra Sunn Marathi Story पण आपल्या आई-बाबांकडे पाहून तिने हे सगळं मुकाट्याने सहन केलं.
एक दिवस मेघना आपल्या लग्नाचा अल्बम पाहत बसली होती. लग्नात आपण किती आनंदी होतो, किती स्वप्न पाहिली होती, Sasra Sunn Marathi Story हे सगळं तिला आठवतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात मेघनाचे सासरे प्रकाशराव तेथे येतात.
त्यांना पाहून मेघना आपले डोळे पुसते आणि विचारते, “बाबा काही हवंय का ? तुमच्या चहाची वेळ झालीये ना. मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते.” प्रकाशराव म्हणतात, “ठीक आहे, Sasra Sunn Marathi Story पण दोन कप बनव. आज आपण दोघे मिळून चहा घेऊयात.”
प्रकाशराव बाल्कनीमध्ये जाऊन बसतात. पाच मिनिटानंतर मेघना चहा घेऊन येते. प्रकाशराव म्हणतात, “बस मेघना येथे. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय.”
मेघना बसते. प्रकाशराव म्हणतात, “मेघना सर्वात आधी तर मला तुझी माफी मागायची आहे. मी तुझा गुन्हेगार आहे. Sasra Sunn Marathi Story माझ्या मुलाबद्दल सगळं माहित असताना सुद्धा, मी जबरदस्तीने त्याचं तुझ्याशी लग्न लावून दिलं आणि तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. मला माफ कर.”
मेघना म्हणते, “बाबा अशी माफी नका मागू. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. Sasra Sunn Marathi Story काहीतरी विचार करूनचं तुम्ही हे सगळं केलं असेल ना. शेवटी नशिबात असतं, तेचं घडत.”
प्रकाशराव म्हणतात, ” आज तुला सगळं सत्य मी सांगतो. आशिषला आम्ही लग्नाआधीचं विचारलं होतं, तुझं एखाद्या मुलीवर प्रेम असेल, तर आम्हाला सांग. Sasra Sunn Marathi Story त्याने आपल्या ऑफिसमधील कलीगबद्दल सांगितलं. त्यानंतर मी आणि तुझी सासू त्या कलीगला जाऊन भेटलो.
तेव्हा ती मुलगी म्हणाली, हो माझं आशिषवर प्रेम आहे. परंतु मला कोणत्याही बंधनात अडकवाचं नाहीये. Sasra Sunn Marathi Story मला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये. लग्न, सासू-सासरे, नवरा, मुलं ही जबाबदारी मी आयुष्यात नाही घेऊ शकत. असं म्हणून तिने चक्क लग्न करण्यास नकार दिला होता.
आम्ही आशिषला ही गोष्ट सांगितली, तेव्हा आशिषने तिला जाब विचारला. तर ती मुलगी म्हणाली, मला तुझ्याबरोबर लिव इन रिलेशनशिपमध्ये राहायचंय. Sasra Sunn Marathi Story मी नाही तुझ्याशी लग्न करू शकत. तुझ्या आई बाबांबरोबर, तुझ्या घरी नाही राहू शकत.
आम्ही आशिषला म्हणालो होतो, तुला जर तसं राहायचं असेल, तर राहू शकतो. तुझं सुख हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा आशिषने नकार दिला. त्या मुलीला तो विसरून गेला. परंतु या घटनेनंतर तो खूपसाग दुःखी राहू लागला. Sasra Sunn Marathi Story तेव्हा आम्हाला वाटलं की, जर त्याचं लग्न करून दिलं, तर तो सुखी होईल। तुझ्यासारखी गुणी आणि सुंदर मुलगी त्याला भेटली, पण तो त्याच्या पहिल्या प्रेमातून कधी बाहेरचं येऊ शकला नाही.
आमच्या मुलाचं आयुष्य सुधारण्यासाठी, आम्ही तुझ्या आयुष्याचं वाटोळ केलं. Sasra Sunn Marathi Story आम्ही तुझे गुन्हेगार आहोत. मला माफ कर.” असं म्हणून प्रकाशरावांच्या डोळ्यात पाणी येतं.
मेघना म्हणते, “बाबा तुम्ही नका रडू. नका वाईट वाटून घेऊ.” प्रकाशराव म्हणतात, “मेघना आमची खूप मोठी चूक झाली. परंतु आता मला ती चूक सुधारायची आहे. मी तुझ्या आई-बाबांशी बोललो. Sasra Sunn Marathi Story त्यांचीही माफी मागितली आणि आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय घेतलाय, तू माझ्या मुलाला आशिषला घटस्फोट द्यायचा.”
मेघनाला मोठा धक्काचं बसतो आणि ती म्हणते, “हे काय बोलताय बाबा ?” प्रकाशराव म्हणतात, “एकदम बरोबर बोलतोय मी. मी माझ्या मुलाला सहा महिन्यांसाठी संधी देऊन पाहिली, परंतु तो काही सुधारायला तयार नाही. Sasra Sunn Marathi Story त्याला जर असंच आयुष्य जगायचं असेल. तर तो त्याचा निर्णय आहे. परंतु मी तुला असं आयुष्य नाही जगू देणार. अजून तुझ्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलंय. ते असं मी नाही वाया जाऊ देणार.
लवकरचं तू आशिषपासून घटस्फोट घ्यायचा आणि त्यानंतर मी तुझ्यासाठी एक दुसरा चांगला मुलगा पाहणार आणि तुझं लग्न करून देईल. आता तू नाही, Sasra Sunn Marathi Story नाही म्हणायचं. पहिल्यांदा जी चूक मी केली, ती आता दुसऱ्यांदा नाही करणार. तुझं आयुष्य मी सुधारणार, माझी चूक सुधारणार.”
मेघनाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती प्रकाशरावांना मिठी मारून रडू लागते. ती म्हणते, “बाबा तुम्ही खरंच माझे बाबा आहात. तुम्ही माझ्या सुखाचा विचार केलात. Sasra Sunn Marathi Story जरी मी हे घर सोडून गेले, तरी मी तुमच्या पासून दूर जाणार नाही. तुम्ही नेहमी माझे आई-बाबा राहाल. प्रकाशराव सुद्धा आपल्या मुलीची आयुष्यभर काळजी घ्यायची ठरवतात. तिचं आयुष्य सुधरवायचं ठरवतात.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !