Samosa Recipe In Marathi
Samosa Recipe In Marathi चटपटीत तळलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडतं. भजी, वडे, समोसे हे आपले सर्वांचे आवडते पदार्थ आहेत. अनेकदा आपण हे पदार्थ खात असतो. लहान मुलं असो किंवा मग मोठी माणसं घरातसुद्धा खाण्यासाठी नवीन काहीतरी असं चमचमीत बनवण्याची फर्माईश करत असतात.
आपल्याला सर्वांना समोसे खायला आवडतंच पण बाहेरच्या सारखे समोसे आपल्याला घरी बनवायला जमतील का हाच प्रश्न सर्वांना पडतो त्यामुळे आज आपण घरच्याघरी समोसा कसा बनवायचा ते शिकणार आहोत.
समोसा हा अतिशय टेस्टी स्नॅक आहे. बाहेरचा समोसा खाण्याऐवजी आपण घरीच अतिशय सोप्या पद्धतीने समोसा बनवू शकतो. समोसा बनवण्याची रेसिपी Samosa Recipe In Marathi खूपच सोपी आहे.
समोसा बनवण्याचं साहित्य :
समोसा Samosa Recipe In Marathi बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
समोश्याचं आवरण बनवण्याचं साहित्य :
- 2 कप मैदा
- 1 चमचा ओवा
- चवीनुसार मीठ
- पाव कप तेल
समोश्यातील सारण बनवण्याचं साहित्य :
- 4 उकडलेले बटाटे
- 5-6 लसणाच्या पाकळ्या
- अर्धा इंच आल्याचा तुकडा
- 2 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा धने
- 1 चमचा जिरे
- अर्धा चमचा बडीशेप
- 4-5 पुदिन्याची पानं
- भरपूर कोथिंबीर
- 1 चमचा हिरवे वाटाणे
- 2 चमचे पाणी
- 1 चमचा तेल
- अर्धा कप वाटाणे
- अर्धा चमचा कसुरी मेथी
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा लाल मिरची पावडर
- अर्धा चमचा जिरे पावडर
- 1 चमचा धने पूड
- अर्धा चमचा साखर
- अर्धा चमचा गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- अर्धा चमचा आमचूर पावडर
- अर्धा चमचा काळं मीठ
- गरजेनुसार पाणी
Procedure For Samosa Recipe In Marathi समोसा बनवण्याची कृती :
सामोसा बनवण्यासाठी आपल्याला सामोस्याचं आवरणं आणि चटणी वेगवेगळी बनवावी लागेल.
समोश्याचं सारण बनवण्याची कृती :
- समोश्याचं सारण बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात 4 उकडलेले बटाटे सालं काढून घ्यायचे आहेत.
- समोश्याचा खास मसाला तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, 4-5 पुदिन्याची पानं, भरपूर कोथिंबीर, 1 चमचा हिरवे वाटाणे, 2 चमचे पाणी हे सर्व घ्यायचं आणि अगदी काही सेकंद फिरवून जाडसर वाटून घ्यायचं.
- त्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर हे वाटण त्यात टाकून द्यायचं आणि 1 मिनिट परतून घ्यायचं.
- नंतर यामध्ये अर्धा कप हिरवे वाटाणे टाकायचे आणि वाटाणे शिजेपर्यंत 4-5 मिनिटे शिजवून घ्यायचंय.
- यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मसाले टाकून 1 मिनिट परतून घ्यायचं.
- आता आपल्याला 4 उकडलेले बटाटे हाताने कुस्करून या कढईमध्ये टाकायचे आहेत. बटाटे किसून घालायचे नाहीत हातानेच कुस्करायचे म्हणजे आपल्या समोश्याला चांगली चव येते आणि अगदी बाहेरच्या सारखाच समोसा बनतो.
- हे सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकून मिक्स करायचं.
- हे मिश्रण आपल्याला 3-4 मिनिटे कमी गॅसवर छान परतून घ्यायचं म्हणजे त्यातला ओलसरपणा निघून जाईल आणि मिश्रण कोरडं होईल.
- आपलं समोश्यातलं आतलं सारण तयार आहे. हे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे.
Khaman Dhokla Recipe In Marathi | खमण ढोकळा मराठी रेसिपी 2024
समोश्याचं आवरण बनवण्याची कृती
- समोश्याचं वरचं आवरण बनवण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये 2 कप मैदा घ्यायचाय.
- त्यामध्ये 1 छोटा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, पाव कप तेल टाकायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तेल मैद्याला पूर्णपणे लागलं पाहिजे. त्यासाठी मैदा हातात घेऊन त्याची मूठ पडते का ते पाहायचं. मूठ पडली म्हणजे सर्व छान एकजीव झालंय.
- आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट गोळा तयार करून घ्यायचाय. पीठ छान मळून घ्यायचं आणि गोळा झाला की तो छान 5 मिनिटे आपटून घ्यायचा. हा गोळा आपल्याला अजिबात तेलकट व्हायला नकोय. तो हाताला चिकटायला नाही पाहिजे.
- आपला गोळा तयार आहे तो 20 ते 25 मिनिटे झाकून ठेवायचाय.
- 25 मिनिटांनंतर आपला हा गोळा छान मुरला आहे. हे पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि याचे 4 तुकडे करायचे. घोळण्यासाठी आपण मैदा वापरणार आहोत. एका गोळ्याचे 2 समोसे होतात.
- आता पोळपाटावर थोडासा मैदा टाकायचाय आणि समोश्याचं बाहेरचं आवरण तयार करून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला गोळा घेऊन तो लाटण्याने पोळपाटावर लाटून घ्यायचाय. आपल्याला पोळीपेक्षा या पाऱ्या जाड एकदम पराठ्यासारख्या लाटायच्या.
- लाटून झाल्यावर त्याचे 2 भाग करून घ्यायचे. समोश्यासाठी खूप साऱ्या पाऱ्या लाटून घ्यायच्या. आता समोसा बनवण्यासाठी एक भाग घ्यायचा आणि त्याच्या कडेवर पाणी लावून समोश्याच्या आकाराचा कोन तयार करून घ्यायचाय.
- हा कोन सर्व बाजूने छान चिकटून घ्यायचा म्हणजे आपलं सारण बाहेर येणार नाही. आता यामध्ये 2-3 चमचे सारण भरायचंय आणि वरच्या कडांना पाणी लावून चिकटून घ्यायचं.
- आपले सर्व समोसे असेच सारण भरून तयार करायचे आणि तळण्याआधी अर्धा तास तसेच ठेवायचे.
- तुम्हाला जर समोसे संध्याकाळी बनवायचे असतील तर ते दुपारी जेवणाच्या आधीच भरून ठेऊ शकता आणि संध्याकाळी तळून खाऊ शकता. पण जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला बनवायचे असतील तर रात्रीच भरून फ्रीजमध्ये ठेऊ शकता आणि सकाळी तळून खाऊ शकता.
- अर्ध्या तासाने आपले समोसे तळून घ्यायचे आहेत. यासाठी कढईमध्ये तेल हलकं गरम करून घ्यायचं. जास्त गरम करायचं नाही. तेलात पिठाचा गोळा टाकून पाहायचा तो गोळा हळू हळू वर आला पाहिजे म्हणजे तेल बरोबर तापलंय. जर तो लगेच वर आला म्हणजे तेल जास्त गरम झालंय.
- समोसे तेलात टाकायचे आणि कमी गॅसवर आपल्याला हे समोसे साधारण 20 मिनिटे तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीचे 5 मिनिटे झाल्यानंतर समोसा पलटून घ्यायचा आणि असेच थोड्या थोड्या वेळाने पलटून समोसे तळून घ्यायचे आहेत.
- कमी गॅसवर समोसे तळून घ्यायचे म्हणजे छान खुसखुशीत होतील. समोश्याला ब्राऊन रंग आला की तेलातून बाहेर काढून घ्यायचे. याच तेलात मिरच्या काप करून तळून घ्यायच्या म्हणजे त्या फुटणार नाहीत.
आपले टेस्टी समोसे Samosa Recipe In Marathi तयार आहेत आणि त्याबरोबर मिरच्यासुद्धा तयार आहेत. तुम्ही तळलेल्या मिरच्या, टोमॅटो केचअप आणि चिंचेच्या चटणीसोबत हे सर्व्ह करू शकता.
Important Tips For Samosa Recipe In Marathi महत्वाच्या टिप्स :
- Samosa Recipe In Marathi समोश्यासाठी बटाट्याची चटणी बनवताना उकडलेले बटाटे हाताने कुस्करायचे किसून टाकायचे नाही म्हणजे समोसे चविष्ट बनतात.
- काळं मीठ बटाट्याच्या चटणीत नक्की टाका त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि बाहेरच्या सारखा समोसा बनतो.
- समोसे बनवताना त्याची पारी पोळीपेक्षा थोडी जाडसरच लाटून घ्यायची.
- समोसे बनवताना त्याच्या आवरणाला पाणी लावून चिकटून घ्यायचं म्हणजे आतलं बटाट्याचं सारण बाहेर येणार नाही.
- समोसे कुरकुरीत बनवण्यासाठी ते मंद आचेवर जास्त वेळ तळायचे असतात.
- मिरच्या तळण्यासाठी त्यात काप करून मग तेलात टाकायच्या म्हणजे त्या फुटत नाहीत.
समोसाचे प्रकार
समोसे अनेक प्रकारचे बनवले जातात.
- आलू समोसा
- मुगडाळ समोसा
- नूडल्स समोसा
- पनीर समोसा
- खवा समोसा
- मावा समोसा
- मिक्स भाजी समोसा
- वाटाणे समोसा
- पिझ्झा समोसा
- चॉकलेट समोसा
- कीमा समोसा
असे वेगवेगळे समोसे Samosa Recipe In Marathi बनतात जे आपण नक्की ट्राय केले पाहिजेत.
FAQ About Samosa Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :
- Samosa Recipe In Marathi हा कुठला खाद्यपदार्थ आहे ?
समोसा हा आपल्याकडील खूपच चटपटीत स्नॅक्स आहे. सगळेजण खूप आवडीने खातात. समोश्याला खूप जुना इतिहास आहे. समोसा मूळचा इराण देशातील आहे पण सध्या जगभर प्रचंड प्रमाणात लोकप्रिय आहे.
- Samosa Recipe In Marathi कशापासून बनवला जातो ?
समोसा हा मैद्यापासून बनवला जातो आणि त्यामध्ये उकडलेले बटाटे, लसणाच्या पाकळ्या, आलं, हिरव्या मिरच्या, हिरवे वाटाणे, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, बडीशेप आणि खूप सारे मसाले टाकून सारण भरलं जातं. त्यानंतर हा समोसा तेलात तळला जातो. आपला टेस्टी समोसा तयार आहे.
- Samosa Recipe In Marathi जंक फूड आहे का ?
समोसा हे जंक फूड नाही. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, फायबर, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट, सोडियम असे खूप सारे पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पण समोश्याला हेल्दी पदार्थ म्हणू शकत नाही त्यामुळे तो कमी प्रमाणात खायला पाहिजे.
- Samosa Recipe In Marathi खाण्याचे नुकसान कोणते आहेत ?
समोसा अनेकांचा खूप फेव्हरेट आहे. समोसे हे तेलात डीप फ्राय केलेले असतात त्यामुळे त्यात अधिक प्रमाणात तेल असतं. समोसा खाल्ल्याने आपल्या शरीरात जास्त कॅलरीज आणि फॅट वाढते. शरीरातील चरबी वाढते. जास्त समोसे खाल्ले तर हाय ब्लडप्रेशर होतं आणि हार्टचे आजारदेखील होऊ शकतात.
- Samosa Recipe In Marathi कुरकुरीत कसे बनवायचे ?
आपल्याला सर्वांना कुरकुरीत समोसे खायला खूप आवडतात. समोसे कुरकुरीत बनवण्यासाठी ते तळताना गॅसवर मंद आचेवर खूप वेळ तळायचे असतात. त्यानंतरही तुम्ही आणखी तळून समोसे जास्त कुरकुरीत बनवू शकता.
आपले अगदी मार्केटपेक्षाही चांगले कुरकुरीत समोसे Samosa Recipe In Marathi तयार आहेत. तुम्ही हे घरच्यांना सर्व्ह करू शकता. घरातील मोठ्यांना आणि लहान मुलांना तर समोसे खूपच आवडतात त्यामुळे असे समोसे घरात बनवता आले तर खूपच उत्तम.
तुम्हाला ही समोसा रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी शिकून घेण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.