महाराष्ट्राची हास्यजत्रा हा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सगळ्याचं कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून या कार्यक्रमाला कोणाची तरी नजर लागलीये, असंच दिसतंय. कारण कार्यक्रमातील अनेक प्रमुख कलाकारांनी कार्यक्रमाला सोडचिठ्ठी दिली आहे.
सर्वात आधी अभिनेत्री विशाखा सुभेदारने महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडली. त्यानंतर ओंकार भोजनेनेसुद्धा कार्यक्रमाला रामराम ठोकला आणि मग गौरव मोरेच्या एक्झिटने तर प्रेक्षकांना खूपचं दुःख झालं. परंतु आता या कार्यक्रमाची धुरा एकहाती सांभाळत असलेले समीर चौगुलेसुद्धा महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडतील की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे.
समीर चौगुले सोडणार महाराष्ट्राची हास्यजत्रा
आणि या चर्चेचं कारण म्हणजे समीर चौगुले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक आनंदाची बातमी फॅन्स बरोबर शेअर केली आहे. समीर चौगुले यांचा एक पात्री प्रयोग “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
समीर चौगुले यांचा हा एक पात्री प्रयोग असणार आहे, जेथे ते दीड तास प्रेक्षकांचं मनोरंजन करतील. त्यांच्या या आनंदाच्या बातमीमुळे सगळेचं फॅन्स खूप खुश झाले आहेत. परंतु अनेकांच्या मनात ही शंकाही यायला लागलीये की, आता ते सुद्धा गौरव मोरे आणि ओंकार भोजने सारखं कार्यक्रमाला रामराम ठोकणार नाहीत ना.
कारण ओंकार भोजने आणि गौरव मोरे गेल्यानंतर कार्यक्रमात ती मजा राहिली नाहीये, असं प्रेक्षक म्हणताय. सध्या समीर चौगुले हे कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळत आहेत. पण जर त्यांनी या कार्यक्रमाला रामराम ठोकला, तर मात्र प्रेक्षक महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला रामराम ठोकतील, असं म्हटलं जातंय.
श्री स्वामी समर्थ मराठी स्टोरी
मागील अनेक वर्षांपासून समीर चौगुले यांनी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलंय. मग त्यांची मिमिक्री असो किंवा वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये प्रेक्षकांना हसवण्याचा कसंब. प्रेक्षक त्यांचे जबरा फॅन्स आहेत.
फॅन्सनी त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर अनेक फॅन्स त्यांना विचारताय की, तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम तर सोडणार नाहीत ना ? परंतु अजून समीर चौगुले यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. त्यांचा निर्णय काय असेल, हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे ?
तर तुम्हाला काय वाटतं समीर चौगुले महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडतील का ? त्यांच्याशिवाय या कार्यक्रमात मजा राहील का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !