Sabudana Vada Recipe
Sabudana Vada Recipe दर महिन्यात आपल्याकडे अनेक उपवास असतात त्यासाठी आपण घरात साबुदाणा खिचडी नेहमीच बनवत असतो. साबुदाणा खिचडी सर्वांनाच खूप आवडते. पण नेहमी नेहमी खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो त्यामुळे प्रत्येकजण काहीतरी नवीन बनवण्याचं ट्राय करत असतो.
साबुदाणा वडा हासुद्धा उपवासासाठी उत्तम पर्याय मानला जातो. एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट साबुदाणा वडा खाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.
बाहेर हॉटेलमध्ये साबुदाणा वडा खाण्यासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते पण बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरीच साबुदाणा वडा Sabudana Vada Recipe बनवला तर खूप चांगलं होईल. आज आपण हाच कुरकुरीत आणि टेस्टी साबुदाणा वडा घरच्याघरी बनवणार आहोत.
साबुदाणा वडा बनवण्याचं साहित्य :
साबुदाणा वडा Sabudana Vada Recipe बनवण्यासाठी काय काय साहित्य गरजेचं आहे ते आपण पाहूया.
- अर्धा कप साबुदाणा
- पाव कप शेंगदाण्याचा कूट
- 2 उकडलेले बटाटे
- 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- 1 चमचा जिरे
- अर्धा इंच किसून घेतलेलं आलं
- 1 चमचा कुटून घेतलेली काळी मिरी
- 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- लिंबाचा रस
- गरजेनुसार पाणी
- तळण्यासाठी तेल
उपवासाची चटणी बनवण्यासाठीचं साहित्य :
- 1 वाटी शेंगदाणे
- अर्धा वाटी दही
- 2 चमचे साखर
- 2 हिरव्या मिरच्या
- अर्धा कप पाणी
- गरजेनुसार तेल
Procedure For Sabudana Vada Recipe साबुदाणा वडा बनवण्याची कृती :
- साबुदाणा वडे Sabudana Vada Recipe बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका भांड्यात अर्धा कप साबुदाणा घेणार आहोत. हा साबुदाणा आपण दोन वेळा पाण्याने धुवून घेतला आणि मग साबुदाणा भिजेल एवढं पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचं आहे.
- दुसऱ्या दिवशी सकाळी आपला साबुदाणा छान मऊसर आणि मोकळा झालाय. साबुदाणा छान फुललाय.
- साबुदाण्यात जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर वडे मऊ पडतात त्यामुळे साबुदाणा भिजेल एवढंच पाणी घालायचं म्हणजे साबुदाणा मोकळा होतो आणि वडे कुरकुरीत होतात.
- या साबुदाण्यात आपल्याला पाऊण कप शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. हा छान मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर त्यात 2 उकडलेले बटाटे कुस्करून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे.
- त्यात 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, अर्धा इंच किसून घेतलेलं आलं, काळी मिरी कुटून घेतलेली, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबूचा रस टाकून हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा करून घ्यायचा.
- त्यानंतर आता या साबुदाण्याचे वडे थापून घ्यायचे. त्यासाठी वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे पाणी हाताला लावून घ्यायचं म्हणजे साबुदाणा हाताला चिकटणार नाही.
- यानंतर पिठाचे हाताने गोळे तयार करून घ्यायचे आणि थोडासा दाब देऊन वडे तयार करायचे. अशाचप्रकारे आपले सर्व वडे तयार करायचे आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे.
- आता एका कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं. हे तेल गरम झालंय का पाहण्यासाठी एक साबुदाण्याचा छोटासा चेंडू करून तेलात टाकून पाहायचा. हा छान तळला गेला की आपले वडे तेलात टाकून छान तळून घ्यायचे.
- आपले वडे तेलात टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाहीत एखादा मिनिट तसेच तळू द्यायचे आणि मग पलटून घ्यायचे.
- मध्यम आचेवर आपले वडे खरपूस तळून घ्यायचे. आपले कुरकुरीत वडे तयार आहेत. हे आपण एका टिशू पेपरवर काढून घेऊया.
आपले उपवासाचे साबुदाणा वडे Sabudana Vada Recipe तयार आहेत.
उपवासाची शेंगदाण्याची चटणी बनवण्याची कृती :
- चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईमध्ये शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. मग या शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घ्यायचे.
- त्यानंतर शेंगदाण्याचा हा बारीक कूट डिशमध्ये काढून घ्यायचा. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून बारीक करून घ्यायच्या.
- पुन्हा या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी दही, 2 चमचे साखर, शेंगदाण्याचा कूट टाकून बारीक करून घ्यायचं. तुम्हाला जर घट्ट ठेवायचं असेल तर तुम्ही घट्ट देखील ठेवू शकता.
- आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करायचं. हे मिश्रण त्यात टाकून वरून अर्धा कप पाणी टाकायचं. सगळं मिक्स केल्यानंतर एक उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा.
Bakarwadi Recipe In Marathi | बाकरवडी रेसिपी 2024
आपली उपवासाची शेंगदाण्याची चटणी तयार आहे. आपले साबुदाणा वडे Sabudana Vada Recipe तुम्ही या उपवासाच्या शेंगदाणा चटणीसोबत सर्व्ह करू शकता.
सध्या साबुदाणा वडे अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मिळतात. हे साबुदाणा वडे खाण्यासाठी भरपूर गर्दीसुद्धा पाहायला मिळते. प्रत्येक शहरात तुम्हाला अशी फेमस दुकानं सापडतील जेथे साबुदाणा वडा मिळतो. एखाद्यावेळेस हा वडा खाणं चांगलं पण नेहमी नेहमी खाणं चांगलं नाही. बाहेरचं खाणं हे आपल्या तब्येतीसाठी चांगलं नाही.
बाहेरच्या पेक्षा कितीतरी पटीने टेस्टी, हेल्दी आणि स्वस्त पदार्थ हे आपण आपल्या घरातच बनवू शकतो. आपण घरामध्ये अन्न बनवताना चांगली स्वच्छताही पाळतो. यासोबतच साबुदाणा वडा आणि उपवासाची चटणीची रेसिपी अतिशय सोपी आहे त्यामुळे वारंवार बनवण्यातही आनंद होतो.
साबुदाणा वडा Sabudana Vada Recipe प्रमाणेच साबुदाणा खीरदेखील बनवणं खूपच सोपं आहे. पण साबुदाणा खीर उपवासातच खाल्ली जाते असं काही नाही आपण कधीही ही खीर खाऊ शकतो. साबुदाणा खीर वजन वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त असते.
साबुदाणा खीर बनवण्यासाठी साहित्य :
- 1 कप साबुदाणा
- 1 लिटर दूध
- अर्धा कप साखर
- 4 ईलायची
- केशर
साबुदाणा खीर बनवण्याची कृती :
- सर्वात आधी साबुदाणा 15 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवायचा.
- दुधामध्ये साखर आणि ईलायची टाकून उकळायचे.
- आता या दुधात साबुदाणा मिसळायला. काही वेळाने 1 कप पाणी टाकायचं आणि साबुदाणा फुगेपर्यंत उकळायचं.
- केशर पाव कप गरम दुधात टाकून जवळपास 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
- काही वेळाने हे दूध फेटा म्हणजे चांगला रंग येईल. हे दूध साबुदाणाच्या मिश्रणात टाकून द्या. आपली साबुदाणा खीर तयार आहे. गरमागरम साबुदाणा खीर तुम्ही सर्व्ह करू शकता.
उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा Sabudana Vada Recipe, साबुदाण्याचे थालीपीठ, साबुदाणा बर्फी, भगर असे अनेक पदार्थ खाल्ले जातात.
एकापेक्षा एक असे खमंग पदार्थ असल्यामुळे उपवासाची मजा ही आणखीनच वाढते एवढं मात्र नक्की. रोजच्या जेवणापेक्षा हे उपवासाचे खाद्यपदार्थ खूपच टेस्टी असतात त्यामुळेच तर ते सर्वांचे फेव्हरेट आहेत.
Sabudana Vada Recipe Important Tips खूप महत्वाच्या टिप्स :
- साबुदाणा भिजवताना त्यात गरजेएवढंच पाणी टाकायचं म्हणजे साबुदाणा मोकळा होतो आणि वडे कुरकुरीत होतात. जास्त पाणी टाकलं तर साबुदाणा वडे मऊ होतात.
- साबुदाणा वडे हाताने थापताना आधी हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे साबुदाणा हाताला चिकटणार नाही.
- तेल जर चांगलं गरम नसेल तर साबुदाणा वडे तेलात तळताना तुटू शकतात त्यामुळे आधीच तेल चांगलं गरम होऊ द्यायचं.
FAQ About Sabudana Vada Recipe काही महत्त्वाचे प्रश्न :
- Sabudana Vada Recipe कशापासून बनतो ?
साबुदाणा वडा हा आपल्याकडील उपवासासाठी खाल्ला जाणारा स्वादिष्ट पदार्थ आहे. हा साबुदाणा वडा साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, मॅश केलेले बटाटे, हिरव्या मिरच्या आणि मसाल्यापासून बनवला जातो आणि त्यानंतर गरम तेलात तळला जातो.
- साबुदाणा वडा खाण्याचे काय फायदे आहेत ?
साबुदाणा वडे Sabudana Vada Recipe खाण्याचे अनेक फायदे आहेत. साबुदाणा वडा खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते. शरीरात चांगली ऊर्जा येते, आपली पचनशक्ती सुधारते, हाडांसाठी चांगलं असतं, हाय ब्लडप्रेशरच्या पेशंटसाठीही फायदेशीर असते.
- साबुदाणा वडा तेलामध्ये का तुटतो ?
साबुदाणा वडा तेलामध्ये तळताना जर तेल चांगलं गरम नसेल तर आपला साबुदाणा वडा तेलात तुटू शकतो. नेहमी वडे तळण्याच्या आधी तेल चांगलं गरम आहे की नाही ते पाहणं गरजेचं आहे. साबुदाणा वडे नेहमी मध्यम आचेवर तळायचे.
- साबुदाणा खाल्ल्याने वजन वाढते का ?
साबुदाणा खाल्ल्याने आपलं वजन वाढू शकते पण हे निरोगी वजन असतं. यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे पण चरबीचं प्रमाण कमी आहे. ज्यांना आपलं वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी हा खूप आरोग्यदायी पदार्थ आहे. साबुदाण्यात असणाऱ्या कार्बोहायड्रेटमुळे पोट भरलेले वाटते आणि वजन झपाट्याने वाढते.
- साबुदाणा कशापासून बनवला जातो ?
साबुदाणा हा उपवासासाठी खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ आहे. तो सॅगो पाम नावाच्या झाडाच्या खोडापासून निघणाऱ्या चिकापासून बनतो. शिजल्यावर तो नरम आणि थोडा पारदर्शक बनतो. आपल्याकडे साबुदाणा खिचडी आणि खीर बनवण्यासाठी वापरला जातो.
- साबुदाणा कधी खायला नाही पाहिजे ?
साबुदाणा हा लो ब्लडप्रेशर असणाऱ्या पेशंटने खायला नको त्यांना त्रास होऊ शकतो. यासोबतच हार्टच्या समस्या असलेल्या पेशंटनेही साबुदाणा खाऊ नये. साबुदाणा खाल्ल्याने ब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो.
आपले कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे साबुदाणा वडे Sabudana Vada Recipe छान तयार आहेत हे तुम्ही उपवासाची शेंगदाणा चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकता. सोबतच तुम्ही चटपटीत बटाट्याचे चिप्सदेखील खाऊ शकता. उपवासाच्या दिवशी हा खूपच चांगला जेवणाचा बेत आहे.
असे टेस्टी साबुदाणा वडे Sabudana Vada Recipe घरी बनवल्यानंतर घरचे तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बनवायला लावतील हे मात्र नक्की त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा.
तुम्हाला ही Sabudana Vada Recipe रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.