Saas Bahu Story एक दिवस सून चक्क रस्त्यावर भीक मागायला लागली आणि मग…

Saas Bahu Story

Saas Bahu Story कोमल आणि प्रतापच्या लग्नाला जवळपास दोन वर्ष पूर्ण झाली होती. कोमल आनंदी होती कारण सगळी काही सुख तिच्या पायाशी लोळण घेत होती. अतिशय प्रेम करणारा नवरा, वडिलांची माया देणारे सासरे तिला लाभले होते. परंतु एक अशी व्यक्ती होती, जी कोमलला खूप त्रास द्यायची आणि ती व्यक्ती होती, तिची सासू कल्याणी.

प्रताप एका मोठ्या कंपनीत इंजिनियर पदावर कामाला होता. माझ्या मुलाला त्याच्या तोलामोलाचं स्थळ मिळायला पाहिजे. त्याच्या बायकोने येताना सोनं नाणं, दाग दागिने, पैसा अडका, जमीन जुमला सगळं घेऊन यायला पाहिजे. माझा चांगला मान व्हायला पाहिजे, असं तिचं स्वप्न होतं.

Saas Bahu Story 

परंतु कल्याणीचा नवरा म्हणजेचं प्रतापच्या वडिलांनी त्यांच्या लहानपणीच्या मित्राची मुलगी कोमलला प्रताप साठी निवडलं. कोमलच्या आई-बाबांची परिस्थिती बेताची होती. Saas Bahu Story त्यामुळे त्यांना ना मोठ लग्न करून देता आलं, ना कोणाचा मानपान करता आला. ना लग्नात दाग दागिने, जमीन जुमला देता आला.

कल्याणीच्या मनात याचा राग होता आणि पहिल्या दिवसापासूनचं ती कोमलला त्रास देत होती. तिला येता जाता टोमणा मारायची की, ‘तुझ्या आई बापाने लग्नात काही नाही दिलं. काही मानपान नाही केला. Saas Bahu Story माझ्या मुलाचा मानपान नाही झाला. दोन दिवाळीसण गेले तरी त्याला काही नाही मिळालं. धोंड्याच्या महिन्यातही काही नाही मिळालं.’

सासूच्या या रोजच्या कटकटीला कोमल खूप कंटाळली होती. कोमलचे सासरे आणि कोमलचा नवरा प्रताप त्यांनासुद्धा हे समजलं होतं आणि त्यांनी अनेकदा कल्याणीला समजावण्याचा प्रयत्न केला की, ‘आपण प्रतापसाठी एखादी दुसरी मुलगी केली असती, तिने पैसा अडका, जमीन जुमला आणला असता, परंतु जर ती कोमलसारखी संस्कारी नसती, तर आपण काय केलं असतं ? Saas Bahu Story आपल्या मुलाला ती घेऊन गेली असती. घर तुटलं असतं. मग तो पैसा आणि जमीन जुमला चाटायचा होता का ?

आपला मुलगा कर्तबगार आहे. तो कमवेल ना सगळं.’ परंतु कल्याणी काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिला कोमलला टोमणे मारायची सवय लागली होती आणि रात्रंदिवस तिचा तोच पाढा सुरू असायचा. Saas Bahu Story कोमलच्या हातून छोटीशी चूक झाली, तरीही ती तिला नाव ठेवायची, तिच्या आई बाबांचा उद्धार करायची संधी सोडत नव्हती. कोमलसाठी आता या घरात राहणं दिवसेंदिवस मुश्किल होत चाललं होतं.

एक रात्री कोमल आणि प्रताप त्यांच्या खोलीत बसलेले असतात. तेव्हा कोमल प्रतापला म्हणते, “मी काय करू प्रताप, मी सासूबाईंशी किती चांगलं वागते. त्यांचा एक शब्दही खाली पडू देत नाही. दिवस रात्र त्यांची सेवा करते. Saas Bahu Story परंतु त्यांचा माझ्यावरचा राग गेलेलाचं नाहीये. त्या फक्त मला टोमणे देत असतात. माझ्या आई बाबांचा उद्धार करतात. कितीही म्हटलं, तरी मला वाईट वाटतचं ना रे.”

प्रताप म्हणतो, “मला कळतंय कोमल, आई खूप चुकीची वागतेय. मी आणि बाबांनी तिला किती समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ऐकतचं नाहीये. Saas Bahu Story मी फक्त तुला सल्ला देऊ शकतो, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये.”

कोमल म्हणते, “खरं बोलतोयस तू. परंतु एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडताना, दोन वर्ष निघून गेलीत. मग अशीचं पुढची 20 वर्ष सुद्धा घालवायची का ? Saas Bahu Story उद्या आपल्याला मुलं होतील त्यांच्यासमोर सुद्धा हाच आदर्श ठेवायचा का ? जर सासूबाईंनी माझी किंमत नाही केली, तर आपली मुलं सुद्धा माझी आणि माझ्या आई बाबांची किंमत नाही करणार.”

प्रतापला ही गोष्ट पटते. तो क्षणभर काहीतरी विचार करतो आणि म्हणतो, “आईला अद्दल घडवावी लागेल.” कल्याणी विचारते, “कोणती अद्दल ?” Saas Bahu Story तर प्रताप तिच्या कानात एक कल्पना सांगतो. कोमल खूप घाबरते आणि म्हणते, “नाही प्रताप, यामुळे तर आपल्या घराण्याची खूप बदनामी होईल.”

प्रताप म्हणतो, “घाबरू नकोस, मी नाही आपल्या घराण्याची बदनामी होऊ देणार. सगळे माझे मित्रचं असतील. Saas Bahu Story बाबांचेही काही मित्र असतील. बाहेरच्या कोणाला ही गोष्ट समजायची नाही.” कोमल म्हणते, “ठीक आहे, तू म्हणत असशील तर असचं करू.”

प्रताप लगेचं बाबांना फोन करून बाहेर बोलवतो. बाबा बाहेर येतात. प्रताप त्यांना झालेला सगळा प्रकार आणि त्याची कल्पना सांगतो. Saas Bahu Story ही आयडिया त्यांनाही खूप आवडते आणि ते उद्याचं हे सगळं करायचं ठरवतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी कल्याणी झोपेतून उठते आणि कोमलला जोर जोरात हाका मारू लागते. “अगं कोमल, किती वाजलेत, चहा दे ना. माझा डोकं दुखतंय. Saas Bahu Story मला वेळेवर चहा नाही मिळाला, तर डोकं दुखतं, माहितीये ना तुला.” परंतु कोमल तिला काही उत्तर देत नाही।

कल्याणीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, “कुठे गेलीस कोमल ? तुझ्या आई बापाकडे चहा द्यायला गेली की काय ? Saas Bahu Story त्यांनी तर लग्नामध्ये सर्वांना चहा सुद्धा नव्हता पाजला आणि तू त्यांना चहा पाजायला गेलीस का ?”

परंतु हे ऐकून सुद्धा कोमलचा काहीच आवाज येत नाही. कल्याणी बेडवरून उठते आणि किचनमध्ये येऊन पाहते. तर किचनमध्ये कोमल नसते. ती कोमलच्या बेडरूममध्ये पाहते, तर तेथे फक्त प्रताप असतो. Saas Bahu Story तो त्याचं त्याचं काम करत बसलेला असतो. कल्याणी विचारते, “काय रे प्रताप, तुझी ती बायको कुठे गेली ?” प्रताप सांगतो, “मला काय माहित, असेल किचनमध्ये.” कल्याणी म्हणते, “नाही, तेथे मी आत्ताच पाहून आले.”

असं म्हणून ती संपूर्ण घरभर कोमलला शोधू लागते. परंतु कोमल कोठेही नसते. तेवढ्यात प्रतापचे बाबा बाहेरून पेपर घेऊन येतात. Saas Bahu Story तेव्हा कल्याणी विचारते, “काय हो, तुम्हाला तरी तुमची आवडती सुनबाई दिसली का कोठे ?” प्रतापचे बाबा सांगतात, “नाही, मी तर उठलो आणि पेपर आणायला गेलो. मला नाही दिसली, ती घरात नाहीये का ?”

कल्याणी सांगते, “सकाळपासून हाका मारतेय तिला, चहासुद्धा दिला नाही तिने. घरातही कोठे नाहीये. कुठे गेली कोणास ठाऊक ? गेली असेल तिच्या त्या दळभद्री आई बापाकडे. Saas Bahu Story काही दुखत खूपत असेल, त्यांची सेवा करायला. येथे सासूची सेवा करायला नको आणि त्यांची सेवा करायला गेली. त्यांनी लग्नात काही दिलं तरी का आपल्याला ?”

प्रतापचे बाबा सोफ्यावर बसून पेपर वाचू लागतात. तेवढ्यात प्रतापही बाहेर येतो आणि म्हणतो, “बाबा आज काय बातमी आलीये पेपरमध्ये नवीन ?” Saas Bahu Story आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसतो. हे दोघेही पेपर वाचू लागतात. कल्याणी चिडून म्हणते, “येथे कोमल कोठे गेली माहित नाही आणि यांना पेपर वाचायचं पडलंय.”

तेवढ्यात कल्याणीचा फोन वाजतो. कल्याणी फोन उचलते. तर कल्याणीची सोसायटीमधील मैत्रीण ताराबाई असते. Saas Bahu Story कल्याणी विचारते, “काय हो ताराबाई, आज सकाळी सकाळी फोन केलात ?” तर ताराबाई तिला दुसऱ्या बाजूने जे सांगते, ते ऐकून कल्याणीच्या पायाखालची जमीनचं सरकते आणि तिच्या हातून फोनचं खाली पडतो. हे पाहून प्रताप आणि त्याचे बाबाही घाबरतात आणि विचारतात काय झालं.

कल्याणी एक शब्दही बोलत नाही आणि घरातून बाहेर पळत सुटते. प्रताप आणि त्याचे बाबा एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. हे दोघेही तिच्या मागे मागे जातात. Saas Bahu Story कल्याणी लिफ्टमध्ये जाते. हे दोघेही बरोबर असतात. प्रताप विचारतो, “काय झालं आई, कुठे जातेस तू ?” कल्याणी म्हणते, “काही विचारू नकोस मला. मला सुद्धा माझ्या डोळ्यांनी पाहायचंय. माझा तर विश्वासच बसत नाहीये, तू फक्त गपचूप चल.”

लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवर येते. Saas Bahu Story कल्याणी लिफ्टमधून बाहेर येऊन क्लब हाऊसमध्ये घुसते. तेव्हा तेथील दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्काचं बसतो.

कारण तेथे सोसायटीतील अनेक लोकांच्या घोळक्यामध्ये चक्क कोमल बसलेली असते. तिने एकदम जुनी फाटकी साडी नेसलेली असते आणि तिच्या हातात एक कटोरा असतो. शेजारी एक बोर्ड लिहिलेला असतो की, ‘माझ्या आई बापाने लग्नात काही दिलं नाही. Saas Bahu Story माझ्या सासरच्या लोकांचा मानपान केला नाही. कारण त्यांची परिस्थिती गरिबीची होती. तेव्हा तुम्ही सर्वांनीच मला भिक द्या. म्हणजे मी माझ्या सासूबाईंना ते पैसे देऊ शकेल आणि माझा त्रास कमी होईल.”

श्री स्वामी समर्थ मराठी गोष्ट

प्रताप आणि त्याचे बाबा एकमेकांकडे पाहून हसू लागतात. तर कल्याणी चिडून म्हणते, “हे काय करतेस कोमल, काही अक्कल वगैरे आहे की नाही तुला ? हे काय लिहिलंय बोर्डावर आणि अशी भिक मागत का बसलीये येथे ?” Saas Bahu Story कोमल म्हणते, “सासुबाई तुम्ही रोज मला टोमणा देतात, तुझ्या आई बापाने लग्नात काही दिलं नाही. त्यांची परिस्थिती तर काही देण्याची नव्हती. आता मलाचं ते सगळं गोळा करावा लागेल ना आणि भीक मागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताचं पर्याय नाहीये.”

कल्याणी प्रतापला म्हणते, “पाहिलं का, तुझी बायको आपल्या घराची इज्जत कशी चव्हाट्यावर मांडतेय. तिला आताच्या आता घरी घेऊन चल. हे बाहेर कळलं, तर लोक तोंडाला काळ फासतील आपल्या.” Saas Bahu Story प्रताप म्हणतो, “आई आता यात तिची काय चूक आहे ? तू तिला रोज टोमणे मारते, तर तिला वाटतं की, हाच पर्याय आहे. मग ती करत असेल.”

कल्याणी चिडून म्हणते, “तू तर बायकोचा एक नंबरचा बैलच आहेस. तुला बोलून काय फायदा आणि हे तर तिचे बापचं आहेत. Saas Bahu Story त्यांना तिचं काय चुकीचं वाटणार.” असं म्हणून कल्याणी कोमलचा हात पकडते आणि तिला तसंचं ओढत ओढत घरी घेऊन येते.

घरात येऊन ती दरवाजा बंद करते आणि म्हणते, “लाज नाही का वाटली तुला, हे सगळं करताना.” कोमल म्हणते, “सासुबाई मी दुसरं काय करणार ? मला तुमच्या टोमण्यांचा खूप त्रास होतो. Saas Bahu Story मागील दोन वर्षांपासून सहन करतेय मी आणि मला हाच एक पर्याय दिसला. मी नोकरीही करत नाही. माझ्याकडे पैसे कमवायचं साधन नाही, मग मी भिकचं मागणार ना.

आता तुम्ही जेव्हा जेव्हा मला टोमणा द्याल की, तुझ्या आई बापाने लग्नात काही दिलं नाही, तेव्हा तेव्हा मी भीक मागणार.” हे ऐकून कल्याणीला जबर धक्काचं बसतो. ती विचार करते की, ‘आता झालं गेलं विसरूया. प्रताप आणि कोमलचं लग्नही झालंय. Saas Bahu Story लग्नाला दोन वर्ष झालीत. आता तिला काही टोमणे देऊन फायदा नाही. तिचे आईबाप फाटकेचं आहेत. ते काही पैसे देणार नाही. मग कशाला उगाचं घराण्याची इज्जत चव्हाट्यावर आणायची. उद्या लोकांनी विचारलं, तर त्यांना काय उत्तर द्यायचं.’

हा विचार करून कल्याणी कोमलसमोर हात जोडते आणि म्हणते, “माफ कर बाई मला. खूप चुकले मी. तुला, तुझ्या बापांना टोमणे दिले. नाव ठेवली. परंतु यानंतर मी असं कधीही करणार नाही. तुही भीक मागण्याची थेरं आता करू नकोस. कोमल म्हणते, “ठीक आहे सासुबाई, तुम्ही मला टोमणे नाही दिले, तर मी भीक मागणार नाही.’ कल्याणी चिडून म्हणते, “हो आता मी माझ्या तोंडाला चिकटपट्टीचं लावून घेते” आणि ती रागारागाने खोलीत जाते.

प्रताप आणि प्रतापचे बाबा खूप खुश होतात. कोमललाही आनंद झालेला असतो. हे तिघे हात मिळवतात आणि कल्याणीला चांगलीचं अद्दल घडवली असं म्हणतात. Saas Bahu Story त्या दिवसानंतर कल्याणी पुन्हा कधीही कोमलला टोमणा देत नाही आणि हळूहळू कोमल तिचं मन जिंकून घेते आणि मग सगळे आनंदाने राहतात.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top