Rutuja Bagwe In Hindi Serial अभिनेत्री ऋतुजा बागवे ही मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने याआधी ‘नांदा सौख्यभरे’, ‘तू माझा सांगाती’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकांमध्ये काम केलंय. यासोबतच तिने ‘लंडन मिसळ’, ‘सोंग्या’, ‘अंकुश’, ‘शहीद भाई कोतवाल’, ‘अथांग’, ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातही भूमिका साकारल्यात.
पण ऋतुजा मागील काही काळापासून कोणत्याही मालिकेत दिसली नव्हती त्यामुळे फॅन्स तिला खूप मिस करत होते. आता ऋतुजा लवकरच एका मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. पण ही एखादी मराठी मालिका नसून ती आपल्याला हिंदी मालिकेत दिसणार आहे.
Rutuja Bagwe In Hindi Serial
ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe In Hindi Serial) आपल्याला ‘माती से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत वैजू ही भूमिका साकारताना दिसणार आहे. ऋतुजाने याआधी अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत पण ही तिची पहिलीच हिंदी मालिका आहे. ‘बिग बॉस 10‘ चा स्पर्धक अंकित गुप्तासह ऋतुजा हिंदी मालिकेत एन्ट्री करणार आहे.
या भूमिकेबद्दल ऋतुजाने मुलाखतीत सांगितलं की, ती अनेक दिवसांपासून चांगल्या भूमिकेच्या शोधात होती. नाटक चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती पण पुन्हा मालिका करावीशी वाटत होती.
अभिनेत्री ऋतुजा बागवे दिसणार या हिंदी मालिकेत
पडद्यावर नेहमी दिसत राहणं ही कलाकाराची गरज आहे. टीव्ही मालिकांमुळे हे शक्य होतं. मालिका हे माध्यम कलाकारांसाठी खूप चांगलं आहे. ते कलाकारांना खूप काही देतं. मालिका हे माध्यम सोपं वाटतं पण कलाकारांसाठी आव्हानात्मक असतं. ऋतुजाला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबतच एक वेगळी भूमिका साकारायची होती. यावेळी तिला या हिंदी मालिकेसाठी विचारण्यात आलं. तिने मालिकेची कथा, आपली भूमिका आणि दिग्दर्शक असा सगळाच विचार करून ही भूमिका स्वीकारली आहे. ही मालिका एका कन्नड मालिकेपासून बनवण्यात आली आहे.
या मराठी अभिनेत्याला वडिलांचं अंत्यदर्शन करता आलं नाही
मागील काही दिवसांमध्ये अनेक मराठी कलाकार हे हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करताना दिसताय. आता अभिनेत्री ऋतुजा बागवेसुद्धा (Rutuja Bagwe In Hindi Serial) हिंदी मालिकेत दिसणार असल्यामुळे तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत आणि सर्वजण तिला या नवीन भूमिकेसाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत. या नवीन मालिकेबद्दल आणि ऋतुजाच्या भूमिकेबद्दल आणखी माहिती लवकरच समोर येईल. ऋतुजाच्या नवीन भूमिकेबद्दल फॅन्समध्ये खूपच उत्सुकता आहे.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !