ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची धमाकेदार बॅटिंग. सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 वर्ल्डकप सुरू आहे. रोहित शर्माच्या मार्गदर्शनात भारतीय टीम या वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलीये. त्यामुळे हा वर्ल्डकप आपण नक्कीचं जिंकू असा विश्वास चाहत्यांमध्ये आहे.
परंतु सेमीफायनलमध्ये पोहोचण्याआधी भारताचा सामना झाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी. ज्यांनी 2023 वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हरवायचं असं प्रत्येक भारतीयाच्या मनात होतं. शेवटी झालंही तसंच. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि सिंहाचा वाटा उचलला कर्णधार रोहित शर्माने.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची धमाकेदार बॅटिंग
रोहित शर्माने या सामन्यात 92 धावांची वादळी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हरवणं भारताला सोपं झालं. भारताच्या T20 इतिहासात रोहित शर्मा असा पहिला कर्णधार ठरला ज्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला.
वर्ल्डकप म्हटल्यावर क्रिकेटप्रेमी टीव्ही आणि हॉटस्टार या OTT ऍपकडे डोळे लावून बसले आहेत आणि जेव्हा रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करत होता, तेव्हा हॉटस्टारने व्ह्यूवरशिपचे सगळे रेकॉर्ड्स मोडलेत.
रोहित शर्माची बॅटिंग पाहण्यासाठी तब्बल 3.1 कोटी लोक हॉटस्टारवर होते आणि हा या वर्ल्डकपमधील रेकॉर्ड आहे. याआधी भारत पाकिस्तान सामन्यात 2.46 कोटी लोक हॉटस्टारवर होते.
महाराष्ट्रात सुरू होणार लाडली बहना योजना
एकूणच माही मार रहा हैं प्रमाणे रोहित मार रहा है, हे समजल्यावर सर्वांनीच आपल्या नजरा या सामन्यावर वळवल्या होत्या. T20 मध्ये खूप वर्षांनंतर रोहित शर्माची अशी धमाकेदार बॅटिंग चाहत्यांना पाहायला मिळाली त्यामुळे सगळेचं खुश आहेत.
तर तुम्ही पाहिली की रोहितची धमाकेदार बॅटिंग ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !