Red Banana Farming आज शेतकऱ्यांसमोर किती अडचणी आहेत, हे आपल्या सर्वांनाचं माहिती आहे. रात्रंदिवस कष्ट करूनही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या विक्रीतून नफा मिळत नाही. अशावेळेस शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की, त्यांनी आधुनिक शेतीची कास धरायला हवी. त्यामुळेचं अनेक तरुण शेतकरी आधुनिक शेतीसाठी प्रयत्न करत आहेत आणि इतर शेतकऱ्यांसमोर आदर्शही ठेवताय. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुण शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत, जो तरुण शेतकरी लाल केळीच्या उत्पादनातून कमवतोय लाखो रुपये.
Red Banana Farming तरुण शेतकरी लाल केळीच्या उत्पादनातून कमवतोय लाखो रुपये
या शेतकऱ्याचं नाव आहे अभिजीत पाटील. अभिजीत पाटील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहतात. येथे त्यांची चार एकर शेत जमीन आहे. अभिजीतने 2015 मध्ये पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली होती. पण त्यानंतर त्यांनी नोकरी केली नाही आणि गावी परतले. आता आपल्या गावी शेती करायची, पण आधुनिक पद्धतीने असं त्यांनी ठरवलं.
2019 मध्ये त्यांनी Red Banana Farming लाल केळीबद्दल ऐकलं आणि शेतामध्ये चार एकरात लाल केळीचं उत्पादन घेतलं. 2022 मध्ये त्यांनी या लाल केळीच्या विक्रीतुन तब्बल 35 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे. सर्व खर्च वजा जाता त्यांना एवढा मोठा नफा झाला आहे.
आपण सगळीकडे पिवळी रंगाची केळी पाहतो. या केळीची किंमत 20 रुपये पासून 50 रुपये डझनपर्यंत असते. परंतु लाल केळीला मोठमोठ्या शहरांमध्ये आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खूप मागणी आहे आणि या Red Banana Farming लाला केळीचा भाव 55 ते 60 रुपये किलो असतो. त्यामुळे या लाल केळीच्या उत्पादनातून अभिजीत पाटील या तरुण शेतकऱ्याने इतकं मोठं यश मिळवलंय.
पिवळी केळीपेक्षा लाल केळीचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. जसे की, हृदयरोगावर लाल केळी फायदेशीर आहे. त्याचबरोबर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा लाल केळी खूप उपयोगी पडते. त्यामुळेच शहरी श्रीमंत वर्गामध्ये या केळीची क्रेझ आहे.
एकूणच अभिजीत पाटील या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा करून घेत आधुनिक पद्धतीने Red Banana Farming लाल केळीची शेती केली आणि एवढं मोठं यश संपादन केलंय. आता इतर शेतकरीही त्याच्याकडे मार्गदर्शन घ्यायला येत आहेत.
तर वाचकहो, आवडली का माहिती, नक्कीच कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !