Raw Mango Curry Recipe In Marathi
Raw Mango Curry Recipe In Marathi कैरीचा सिझन सुरू झालाय आणि बाजारामध्ये सगळीकडे कैऱ्यांचा ढीग लागलाय. उन्हाळ्यात आंबट कैरी खायला तर सर्वांनाच आवडतं. वर्षभर आपण या चटपटीत कैरीची वाट पाहत असतो. कैरीला लाल तिखट आणि मीठ लावून खाणं म्हणजे उन्हाळ्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. कैरी खाल्ली की उन्हाच्या चटक्यापासून थोडा आराम मिळतो.
लहान मुलांच्यासुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यांना तर आंबट कैऱ्या खायला खूप आवडतं. गावाकडे तर मुलं कैऱ्या झाडावरूनच पाडतात आणि मस्त खातात. आंबा येण्याच्या आधी कैऱ्या सगळेच आवडीने खातात. जेवणासोबत कैरी तोंडी लावल्यावर जेवणाचा स्वाद आणखीनच वाढतो. उन्हाळ्यात चार घास जरा जास्तच आपल्या पोटात जातात.
कैरी खाणं आपल्या आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर आहे. उन्हाळ्यात अनेक समस्यांपासून आपल्या शरीराचा बचाव होऊ शकतो. कैरीपासून अनेक पदार्थ बनवता येतात. कैरीचं पन्हं, कैरीची चटणी, कैरीची आमटी, कैरीची भाजी, कैरीची कढी, कैरीचं लोणचं, कैरीची लौंजी, कैरीचं सॅलड, कैरीचा रायता, कैरी राईस असे अनेक चटपटीत पदार्थ तुम्ही बनवू शकता.
आज आम्ही तुमच्यासाठी विशेषतः कोकणात बनवली जाणारी कैरीची आमटी Raw Mango Curry Recipe In Marathi बनवण्याची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही आमटी भाताबरोबर खाल्ली जाते आणि खूपच टेस्टी लागते. ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून पहा.
कैरीची आमटी बनवण्याचं साहित्य :
कैरीची आमटी Raw Mango Curry Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे काप
1 हिरवी मिरची
अर्धा इंच आल्याचा तुकडा
4-5 लसणाच्या पाकळ्या
1 छोटा चमचा धनेपूड
1 छोटा चमचा लाल मिरची पावडर
1 छोटा चमचा मिक्स मसाला
थोडंसं पाणी
1 चमचा तांदळाचं पीठ
2 चमचे तूप
1 चमचा मोहरी
थोडेसे मेथीदाणे
3-4 कढीपत्त्याची पानं
पाव चमचा हळद
अर्ध्या छोट्या कैरीचे काप
अर्धा कप पाणी
2 चमचे गूळ
आवश्यकतेनुसार पाणी
चवीनुसार मीठ
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
कैरीची आमटी बनवण्याची कृती :
1. कैरीची आमटी Raw Mango Curry Recipe In Marathi बनवण्यासाठी सर्वात आधी अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत. हे खोबरं छिलून घ्यायचं आहे म्हणजे आमटीचं टेक्सचर एकदम स्मूथ होतं.
2. आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी हे खोबऱ्याचे काप मिक्सरच्या भांड्यात घालूया. एकदम फ्रेश खोबरं आपल्याला वापरायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं घ्यायचं नाही.
3. त्यानंतर यामध्ये 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा चमचा धनेपूड, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 छोटा चमचा मिक्स मसाला टाकायचा. जर मिक्स मसाला नसेल तर तुम्ही कोणताही घरगुती मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
4. कमीतकमी 3 ते 4 मिनिटे सलग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये पुन्हा थोडं पाणी टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आपल्याला जितकं बारीक करता येईल तितकी बारीक याची पेस्ट तयार करायची आहे.
5. पुन्हा 2 ते 3 मिनिटे हे मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे. एकदम बारीक हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तुम्ही कॉर्न फ्लोर वापरू शकता किंवा 1 चमचा बेसनसुद्धा वापरू शकता.
जशी आपण ताकाची कढी करतो तेव्हा थोडंसं बेसन लावतो त्याचप्रमाणे या Raw Mango Curry Recipe In Marathiआमटीलासुद्धा आपल्याला तांदळाचं पीठ किंवा कॉर्न फ्लोर किंवा बेसन लावायचं आहे म्हणजे आपली आमटी फाटणार नाही आणि छान स्मूथ टेक्सचर आमटीला येईल.
https://faktyojana.com/ukadpendi-recipe-in-marathi-2024
6. हे पुन्हा मिक्सरला एखादं मिनिट फिरवून घ्यायचं. आपलं हे वाटण मस्त बारीक स्मूथ तयार झालेलं आहे.
7. आता आपण Raw Mango Curry Recipe In Marathi आमटीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करून घ्यायची. त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं. तुम्ही तेलही टाकू शकता. तूप छान गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की यात थोडेसे मेथीदाणे टाकायचे. तेसुद्धा थोडे तडतडले की यात 3-4 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि पाव चमचा हळद टाकून एकदा छान मिक्स करून घ्यायचं.
8. त्यानंतर यामध्ये अर्ध्या कैरीचे काप करून टाकायचे आणि एखादं मिनिट फोडणीमध्ये छान परतून घेऊया. आपल्याला खूप जास्त कैरीचे काप घालायचे नाही एकदम आंबट आमटी छान लागत नाही त्यामुळे फक्त 5 ते 6 कैरीचे काप टाकायचे.
9. आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि एकदा मिक्स करून घ्यायचं. कढईवर झाकण ठेवून साधारण 2 मिनिटे हे आपण शिजवून घेऊया. कैरी छान शिजली गेली पाहिजे. 1 ते 2 मिनिटात छान शिजते. आता आपली कैरी छान मऊ झालेली आहे.
10. त्यानंतर यामध्ये 2 चमचे गूळ टाकायचा आणि मिक्स करायचं. आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं. आपल्याला हे वाटण जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटायचं आहे. हे वाटण टाकल्यावर चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे.
11. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून उरलेलं वाटण कढईत टाकायचं. आपल्याला Raw Mango Curry Recipe In Marathi आमटी जेवढी पातळ ठेवायची आहे त्यानुसार पाणी इथे टाकायचं आहे. आपल्याला आमटी थोडीशी पातळ करायची आहे त्यामुळे आणखी थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला आमटी जेवढी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार पाणी टाकायचं. आपण मिडीयम कंसिस्टंसीची आमटी ठेवलेली आहे. थोडी पातळच आहे.
12. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे. चमच्याने मिक्स करून घ्यायचं. एकदम छान टेक्सचर आपल्या आमटीला आलेलं आहे. आता कढईवर झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनिटे वाफ येईपर्यंत शिजवून घेऊया. आपल्याला आमटीला खूप उकळी येऊ द्यायची नाही किंवा शिजवायची नाही. हलकीशी गरम करून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आणि आमटीला एकदम स्मूथ कंसिस्टंसी आलेली आहे. अशीच हवी असते.
13. त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तांदळाचं पीठ लावल्यामुळे आमटीला छान टेक्सचर आलेलं आहे. जर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्न फ्लोर किंवा बेसन पीठ नाही लावलं तर तुमची आमटी फाटू शकते त्यामुळे नारळाचं सत एकीकडे आणि पाणी एकीकडे त्यामुळे मजा येत नाही.
14. आपली Raw Mango Curry Recipe In Marathi आमटी तयार आहे. गॅस बंद करायचा आणि गरम भाताबरोबर तुम्ही ही आमटी वाटीमध्ये सर्व्ह करू शकता. छान आंबट, गोड, तिखट चटपटीत आमटी भाताबरोबर खूप छान लागते. ही आमटी गरम गरम सर्व्ह करायची असते. जर उरली तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. कारण जसाजसा वेळ जातो ही आमटी आंबट होत जाते. जर खूप जास्त आंबट झाली तर यामध्ये थोडं पाणी टाकून तुम्ही कढी किंवा सोलकढीसारखं पिऊसुद्धा शकता.
Raw Mango Curry Recipe In Marathi महत्वाच्या टिप्स :
1. कैरीची आमटी Raw Mango Curry Recipe In Marathi बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्याचे काप छिलून घ्यायचे त्यामुळे आमटीची कंसिस्टंसी टेक्सचर स्मूथ होते.
2. ओलं खोबरं फ्रेश घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवलेलं घ्यायचं नाही.
3. कैरीची आमटी बनवताना त्याला तांदळाचं पीठ किंवा कॉर्न फ्लोर किंवा बेसन लावायचं म्हणजे आमटी फाटणार नाही आणि स्मूथ टेक्सचर आमटीला येईल.
4. कैरीचे काप कमीच घालायचे फक्त 5 ते 6 टाकायचे कारण एकदम आंबट आमटी छान लागत नाही.
5. ही आमटी गरमच खायची पण उरली तर फ्रीजमध्ये ठेवायची कारण नंतर ती आंबट होत जाते. जास्त आंबट झाली तर पाणी टाकून कढी किंवा सोलकढीसारखं पिऊ शकता.
वरील टिप्स वापरून तुम्ही ही चटपटीत कैरीची आमटी Raw Mango Curry Recipe In Marathi सहज बनवू शकता.
Raw Mango Curry Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :
1. कैरीची आमटी Raw Mango Curry Recipe In Marathi कशी बनवायची ?
कैरीची आमटी बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्याचे काप घ्यायचे. ते थोडे छिलून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या, धनेपूड, लाल मिरची पावडर, मिक्स मसाला आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करायची. पुन्हा थोडं पाणी टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. एकदम बारीक आपलं वाटण तयार आहे. यात तांदळाचं पीठ टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आपलं स्मूथ वाटण तयार आहे. आता तुपामध्ये मोहरी, मेथीदाणे, कढीपत्त्याची पानं, हळद टाकून फोडणी करायची. त्यात कैरीचे काप टाकून परतून घ्यायचं. पाणी टाकून कैरी शिजवून घ्यायची. गूळ टाकायचा. पाणी टाकायचं. मीठ टाकून वाफ येऊ द्यायची आणि कोथिंबीर टाकायची. आपली कैरीची आमटी तयार आहे.
2. उन्हाळ्यात कैरी खाण्याचे कोणते फायदे आहेत ?
कैरी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. कैरीमध्ये साखर कमी प्रमाणात असते त्यामुळे शरीरातील ब्लडशुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. कैरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं त्यामुळे रक्ताचा प्रवाह चांगला राहतो. यातील मॅगिफरीन तत्वामुळे हृदय स्वस्थ राहतं. कैरी खाल्ल्यामुळे पाचन तंत्र स्वस्थ राहतं. कैरीमुळे बॅड कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहतं. लिव्हरचं काम चांगलं होतं. कैरीमध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं.
या उन्हाळ्यात चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी कैरीची आमटी नक्की बनवून पहा. कैरी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदेही आहेत. ही चटपटीत कैरीची आमटी तुम्ही गरमागरमच घरच्यांना खायला द्या. सर्वांना नक्कीच खूप आवडेल. आजच ही कैरीची आमटी नक्की बनवून पहा.
तुम्हाला ही Raw Mango Curry Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच चटपटीत रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.