Ranjana Deshmukh Accident मराठी चित्रपट विश्वातील एकमेव सुपरस्टार अभिनेत्री होती रंजना देशमुख. रंजनाच्या अभिनयाला तोड देणारी आणि तिच्या एवढी लोकप्रियता मिळवणारी दुसरी कोणती अभिनेत्री अजून मराठी मनोरंजन विश्वात जन्माला आलेली नाहीये.
रंजना देशमुख यांनी 1975 मध्ये चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर झुंज या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आणि पुन्हा कधीही मागे वळून पाहिलं नाही. मुंबईचा फौजदार, बिनकामाचा नवरा, अरे संसार संसार असे त्यांचे चित्रपट खूप गाजले.
Ranjana Deshmukh Accident
अशोक सराफ यांच्याबरोबर तर त्यांची जोडी चांगली जमली आणि त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. एक काळ असा होता की, अभिनेत्री रंजना मराठी चित्रपट विश्वातील नंबर वन अभिनेत्री होत्या. अनेक बडे अभिनेत्यांना सुद्धा त्या घाम फोडायच्या. त्यांच्यासमोर कुणीही टिकू शकत नव्हतं.
परंतु अवघ्या 32 वर्षाच्या वयात नशिबाने त्यांच्यावर घाला घातला. नशिबाला त्यांची लोकप्रियता, त्यांचे यश मान्यचं नव्हतं. 1987 साली एका चित्रपटाच्या शूटिंगला बँगलोरला जात असताना त्यांचा गाडीचा जबर अपघात Ranjana Deshmukh Accident झाला आणि या अपघातात त्यांचे दोन्ही पाय आणि एक हात निकामी झाला.
अवघ्या 32 व्या वर्षी अभिनेत्री रंजना व्हीलचेअरवर खिळल्या. Ranjana Deshmukh Accident आणि त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. पुन्हा कधीही त्यांनी कोणत्या चित्रपटात काम केलं नाही. असं म्हटलं जातं की, त्यांच्या अभिनयाच्या करिअर बरोबरचं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यालाही ब्रेक लागला होता. हा अपघात होण्याआधी त्या एका अभिनेत्याच्या प्रेमात होत्या आणि लवकरचं ते लग्न करणार होते. परंतु या अपघातानंतर या अभिनेत्याने त्यांच्याशी सर्व संबंध तोडले आणि त्या एकाकी पडल्या.
चेहऱ्यावरील पिंपल्स हटवण्यासाठी घरी बनवा हा फेसपॅक
जवळपास 13 वर्ष अभिनेत्री रंजना देशमुख व्हीलचेअरला खिळून होत्या. 3 मार्च 2000 रोजी मुंबईत राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी त्या हे जग सोडून गेल्या.
परंतु मृत्यूआधी त्यांनी फक्त एकदाच या मराठी नाटकात काम केलं होतं. या नाटकाची गोष्ट अशी होती की, व्हीलचेअरवर असलेल्या प्रेमिकेला तिचा प्रेमी सोडून जातो आणि ती एकटीचं राहते. असं म्हटलं जातं या नाटकाची गोष्ट त्यांच्या आयुष्यावर आधारित होती.
तर तुम्हाला अभिनेत्री रंजना देशमुख यांचा कोणता चित्रपट, त्यांची कोणती भूमिका आवडते ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !