Puranpoli Marathi Recipe | पुरणपोळी गुळवणी रेसिपी 2024

Puranpoli Marathi Recipe

Puranpoli Marathi Recipe

Puranpoli Marathi Recipe सणावाराला आपल्या प्रत्येक मराठी घरात पुरणपोळी नक्कीच बनवली जाते. गोड पुरणपोळी बनवून आपण सणाचा आनंद साजरा करतो. देवांनादेखील आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. यासोबतच कोणताही सण धुमधडाक्यात साजरा केल्यानंतर जेवणात पुरणपोळी खाऊन आपण सेलिब्रेशनचा शेवट करतो.

पुरणपोळी (Puranpoli Marathi Recipe) हा पदार्थ आपल्या मराठी संस्कृतीचं प्रतीक आहे आणि घरातल्या लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण पुरणपोळी खूप आनंदाने खातात. पुरणपोळी खूपच स्वादिष्ट गोड पदार्थ आहे.

आज आपण लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यासोबत गुळवणी बनवायची रेसिपी शिकणार आहोत. पुरणपोळी रेसिपी (Puranpoli Marathi Recipe) खूपच सोपी आहे.

पुरणपोळी बनवण्याचं साहित्य :

घरातील 4-5 जणांसाठी लुसलुशीत पुरणपोळी (Puranpoli Marathi Recipe) बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूया.

पुरणपोळी बनवण्याचं साहित्य :

  • 2 ग्लास हरभरा डाळ
  • दीड ग्लास साखर
  • 1 चमचा वेलची
  • चिमूटभर किसलेलं जायफळ
  • थोडीशी किसलेली सुंठ
  • 2 ग्लास गव्हाचं पीठ

गुळवणी बनवण्याचं साहित्य :

  • 1 वाटी गूळ
  • 2 – 3 चमचे तूप
  • 1 वाटी दूध
  • अर्धा चमचा वेलची
  • चिमूटभर सुंठ
  • चिमूटभर जायफळ

Procedure For Puranpoli Marathi Recipe पुरणपोळी बनवण्याची कृती :

  1. एका कुकरच्या भांड्यामध्ये 2 ग्लास हरभऱ्याची डाळ टाकून त्यात 3 ग्लास पाणी टाकायचं आणि 15 ते 20 मिनिटे गॅसवर शिजवून घ्यायचं.
  2. डाळ शिजल्यानंतर ती एका पातेल्यात काढून घ्यायची आणि पुरणाच्या चाळणीमध्ये थोडी थोडी काढून बारीक करून घ्यायची.
  3. मग एका कढईत 1 – 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये साखर, इलायची, सुंठ, जायफळ टाकून छान पैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर ते पुरण पातळ होतं त्याला 10 – 15 मिनिटे हलवत राहायचं आणि घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं.
  4. आपलं पुरण तयार आहे.
  5. एका ताटामध्ये 2 ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं. त्या पीठामध्ये थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं आणि चिमूटभर मीठ टाकायचं. त्यानंतर चिमूटभर हळद, अर्धा वाटी मैदा टाकायचा हे सगळं मिक्स करून पिठाला छान मळून घ्यायचं.
  6. त्यानंतर कणिक अर्धा तास मुरू द्यायची. मग कणकेचा गोळा घेऊन त्याची कटोरी तयार करायची. त्यामध्ये जेवढी कटोरी तेवढंच पुरण घालायचं आणि मग ते बोटाच्या साहाय्याने बंद करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची.
  7. मग तव्यावर तूप टाकायचं आणि पोळी दोन्ही बाजूने तूप लावून तव्यावर भाजून घ्यायची. आपली पुरणपोळी तयार आहे.

गुळवणी बनवण्याची कृती :

  1. एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्यायचं त्यात किसलेला गूळ टाकायचा. गुळाऐवजी तुम्ही 1 वाटी साखरही टाकू शकता.
  2. गूळ टाकल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची. मग त्यात सुंठ, ईलायची, जायफळ टाकायचं.
  3. त्यानंतर पाणी एका पातेल्यात चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं. ओतल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं. त्यात 1 वाटी दूध आणि 2 – 3 चमचे तूप टाकायचं. आपली गुळवणी तयार आहे.

आपली पुरणपोळी आणि गुळवणी तयार आहे. आता एका प्लेटमध्ये गुळवणी घ्या आणि त्यामध्ये आपली पुरणपोळी टाका. वरून थोडंसं साजूक तूप टाका. ही पुरणपोळी तुम्ही घरच्यांना सर्व्ह करू शकता.

Puranpoli Marathi Recipe पुरणपोळी ही खूपच स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी आहे. पण सणावाराला आपण फक्त पुरणपोळी खात नाही तर यासोबतच आणखी खूप सारे पदार्थ आपल्या ताटात असतात. पुरणपोळी, गुळवणी, आमटी भात, भजी, पापड, कुरडई असे अनेक पदार्थ सणाच्या दिवशी आपल्या ताटात असतात त्यामुळे आपल्या खाण्याची खूप मज्जा असते.

Masala Dosa Marathi Recipe | मसाला डोसा रेसिपी

पुरणपोळीचे वेगवेगळे प्रकार

आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळीदेखील (Puranpoli Marathi Recipe) बनवता येतात. तुम्ही त्यासुद्धा नक्कीच बनवून पाहू शकता.

  1. साखरेची पुरणपोळी

सध्या बहुतेक घरात साखरेचीच पुरणपोळी बनवली जाते. पूर्वी गुळाची पुरणपोळी बनवली जायची पण अनेकांना गुळाची चव आवडत नाही त्यामुळे गूळ वापरण्याऐवजी साखरेचा वापर करून पुरणपोळी बनवतात. यामध्ये पुरणपोळीला पिवळा रंग येण्यासाठी थोडीशी हळदसुद्धा टाकतात.

  1. साखर गुळाची पुरणपोळी

तुम्हाला जर फक्त गुळाची पुरणपोळी आवडत नसेल तर तुम्ही साखर आणि गूळ समप्रमाणात मिक्स करून साखर गुळाची पुरणपोळी बनवू शकता. ही पुरणपोळीसुद्धा खाण्यासाठी खूप टेस्टी असते.

  1. कणकेपासून बनवलेली पुरणपोळी

कणकेची पुरणपोळी ही आधीपासून बनवली जाणारी पारंपरिक पद्धतीची पुरणपोळी आहे. यामध्ये पोळीच्या कणकेमध्ये हरभरा डाळ आणि गुळाचं सारण भरून पोळी लाटून पुरणपोळी बनवतात. ही पुरणपोळी खूप टेस्टी बनते.

  1. खापरावर बनवलेली पुरणपोळी

नावाप्रमाणेच ही पुरणपोळी मातीच्या खापरावर बनवली जाते. पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही पुरणपोळी असते. आपल्या खानदेशात खापर पुरणपोळी खूप प्रसिद्ध आहे. या पुरणपोळीचा वेगळाच स्वाद असतो.

  1. मूगडाळ पुरणपोळी

तुम्ही कधी मुगाच्या डाळीपासून बनवलेली पुरणपोळी खाल्लीय का ? मुगाच्या डाळीपासूनसुद्धा अनेकजण पुरणपोळी बनवतात. ही पुरणपोळी पचायला खूप हलकी असते आणि अतिशय टेस्टी लागते.

  1. ड्रायफ्रूटची पुरणपोळी

ड्रायफ्रूटचा वापर करूनसुद्धा पुरणपोळी बनवता येते. तुम्हाला जर ड्रायफ्रूटची पुरणपोळी खायची असेल तर ड्रायफ्रूटची पूड पुरणाच्या सारणात टाकून ही पुरणपोळी बनवू शकता.

  1. खोबऱ्याची पुरणपोळी

पुरणाच्या सारणात तुम्ही खोबरं टाकून ही पुरणपोळी बनवू शकता. नारळी पौर्णिमेला ही खास खोबऱ्याची पुरणपोळी बनवली जाते. ही खोबऱ्याची पुरणपोळी खूपच टेस्टी लागते.

  1. शुगर फ्री पुरणपोळी

आपण घरामध्ये पुरणपोळी बनवतो तेव्हा घरात जर कोणी डायबिटीसचं पेशंट असेल तर त्यांना पुरणपोळी खाता येत नाही कारण त्यांची शुगर वाढून जाते. जर कोणाला डाएट करायचं असेल तर तेही पुरणपोळी खात नाहीत.
मग त्यांच्यासाठी शुगर फ्री पुरणपोळी बनवावी लागते.

शुगर फ्री पुरणपोळी बनवण्यासाठी तुम्ही शुगर फ्री पावडर वापरू शकता. यामुळे तुमच्या घरात जर कोणी पेशंट असतील तर त्यांचीही शुगर वाढणार नाही आणि त्यांना पुरणपोळी खाण्याचा आस्वाद घेता येईल. डाएट करणाऱ्यांनाही ही शुगर फ्री पुरणपोळी खाता येते.

  1. सतूची पुरणपोळी

साखरेची पुरणपोळी खाल्ल्यामुळे वजन वाढते त्यामुळे तुम्ही सतूची पुरणपोळी खाऊ शकता. सतूच्या पुरणपोळीत खूप पोषणतत्व असतात आणि त्यामुळे वजनसुद्धा वाढत नाही.

  1. इन्स्टंट बनणारी पुरणपोळी

आजकाल अनेक खाद्यपदार्थ रेडिमिक्स स्वरूपात मिळतात तसेच पुरणपोळीचं रेडिमिक्ससुद्धा मिळतं. यामध्ये पाणी टाकून तुम्ही हे सारण पोळीमध्ये भरायचं. तुमची पुरणपोळी तयार आहे.

याशिवाय अनेक वेगवेगळ्या फ्लेवरच्या पुरणपोळ्यादेखील आपण बनवू शकतो.

अननस, आंबा, खजूर, खवा, चॉकलेट, बदाम, फणस, अंजीर, तीळ, गाजर, तिखट या सर्व फ्लेवर्समधेही आपण पुरणपोळी बनवू शकतो.

यासोबतच वेगवेगळ्या फळांचा गर वापरूनदेखील आपण पुरणपोळी बनवू शकतो.

आजकाल अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात. अशा हॉटेलमध्ये जाऊन अनेकजण या स्वादिष्ट पुरणपोळ्यांचा आस्वाद घेत असतात.

Important Tips For Puranpoli Marathi Recipe महत्वाच्या टिप्स :
  1. पीठ मळताना त्यात दूध घातलं तर आपली पुरणपोळी मऊ होते.
  2. पीठामध्ये तुपाचं मोहन घातलं तर पोळी लुसलुशीत होते.
  3. डाळ शिजल्यानंतर तुम्ही त्यात साखर, वेलची टाकून मिक्स करून घेऊ शकता आणि चाळणीच्या साहाय्याने पुरण करून घेऊ शकता त्यामुळे पुरण लवकर होतं.
FAQ’s For Puranpoli Marathi Recipe
  1. पुरण कसं दळायचं ?

पुरणपोळीसाठी पुरण दळताना तुम्ही दोन प्रकारे दळू शकता.

पुरण हे पुरण पात्राने दळू शकता किंवा मग पुरणाच्या चाळणीनेदेखील दळू शकता. पुरण चांगलं दळून झालं तर पुरणपोळीसुद्धा खूप छान होते.

  1. Puranpoli Marathi Recipe इतिहास काय आहे?

पुरणपोळी हा आपल्या महाराष्ट्रातील अतिशय स्वादिष्ट गोड पदार्थ आहे. या पुरणपोळीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हजारो वर्षांपासून पुरणपोळी आपल्या मराठी संस्कृतीचा भाग आहे. अगदी 12 व्या शतकात साऊथमधील राजा सोमेश्वर यांच्या संस्कृत ग्रंथामध्ये पुरणपोळीचा संदर्भ आहे. त्याचबरोबर 13 व्या शतकात ज्ञानेश्वरी ग्रंथात पुरणपोळीचा मांडे म्हणून उल्लेख आहे.

  1. पुरणपोळी कशापासून बनवली जाते ?

पुरणपोळी हे पुरण आणि पोळीचं मिश्रण आहे. गव्हाच्या पिठाच्या बनलेल्या पोळीमध्ये हरभरा डाळीपासून बनलेलं पुरणाचं सारण घालायचं असतं आणि मग ही पोळी लाटून तव्यावर बनवतात. दर सणावाराला सगळेजण आपल्या घरात खूप आनंदाने पुरणपोळी बनवतात.

  1. पुरण कोरडं झालं तर ठीक कसं करायचं ?

पुरण जर कोरडं झालं असेल तर तुम्ही त्यात 1 चमचा कोमट दूध टाका आणि चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या आणि तुम्हाला हवं तसं पुरण होईपर्यंत हलवून घ्या.

  1. पुरण कसं जास्त काळासाठी टिकवायचं ?

पुरण जर तुम्हाला जास्त काळासाठी टिकवायचं असेल तर तुम्ही ते एका डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये पुरण हे आठवडाभर टिकतं. त्यापेक्षा जास्त काळ टिकवायचं असेल तर पुरण नीट गुंडाळून डब्यात ठेवायचं.

  1. पुरणपोळी आपल्याकडे एवढी प्रसिद्ध का आहे ?

पुरणपोळी (Puranpoli Marathi Recipe) हे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रतीक आहे. पुरणपोळीचा आपल्या सणावारांशी घनिष्ठ संबंध आहे. आपल्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीचं महत्वपूर्ण स्थान आहे. पुरणपोळीची चव आणि महत्वामुळे ती आपल्याकडे इतकी प्रसिद्ध आहे. आपल्या महाराष्ट्रात प्रयेक मोठया सणाला पुरणपोळी म्हणजेचं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्याची प्रथा आहे. पुरणपोळी बनवल्याशिवाय कोणताही सण पूर्णचं होत नाही.

आपली लुसलुशीत पुरणपोळी (Puranpoli Marathi Recipe) आणि गुळवणी तयार आहे. ती तुम्ही सणावाराला बनवून आपल्या कुटुंबातील सदस्यांना सर्व्ह करू शकता. तुमच्या घरातील सर्वांना ही स्वादिष्ट पुरणपोळी नक्कीच आवडेल आणि सगळे तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवण्याचा आग्रहदेखील करतील हे मात्र नक्की.

तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top