Punha Kartavya Aahe सध्या झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. सगळीकडेचं या मालिकेची गोष्ट आणि मालिकेतील कलाकारांची चर्चा सुरू आहे. आता पुन्हा कर्तव्य आहे मालिकेमध्ये चीनूची भूमिका साकारणारी बालकलाकार रुही जावीलबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली.
रुही जावीलने एक व्हिडिओ शेअर केलाय आणि या व्हिडिओमध्ये ती अभिनेत्री राधिका देशपांडेचे आभार व्यक्त करताना दिसतेय. रुहीने या व्हिडिओमध्ये सांगितलं की, ती रॅडी म्हणजेचं राधिका देशपांडेला खूप मिस करते. कारण राधिका देशपांडेच्या राधिका क्रिएशन्स या लहान मुलांच्या कार्यशाळेतचं ती अभिनय शिकली.
Punha Kartavya Aahe
येथे अभिनय शिकल्यानंतरचं तिने 3 नाटक आणि 2 चित्रपटात काम केलं आणि आता तिला झी मराठीच्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे. अभिनेत्री राधिका देशपांडेने सुद्धा या व्हिडिओवर कमेंट करत तिला आपल्या विद्यार्थिनीचा खूप अभिमान आहे असं सांगितलं.
अभिनेत्री राधिका देशपांडे मागील अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात काम करते. आई कुठे काय करते या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रीण देविका हे पात्र साकारलं होतं आणि ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
सध्या ती सियावर रामचंद्र की जय या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ती राधिका क्रिएशन या नावाने बालकलाकारांचे वर्कशॉप सुद्धा घेत असते. लहान मुलांना अभिनय शिकवत असते. तिचे अनेक विद्यार्थी आजपर्यंत मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये चांगले पात्र साकारत आहेत.
या प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं नवीन घर
रुही जागीरने सांगितलं की, साडेतीन वर्षांची असतानाचं तिने राधिकाची बाल कलाकारांची अभिनय कार्यशाळा जॉईन केली होती आणि येथे तिने अभिनयाचे धडे गिरवले. त्याचा तिला तिचा अभिनय सुधारण्यासाठी खूपचं मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
आता पुन्हा कर्तव्य आहे Punha Kartavya Aahe या मालिकेत रुहीची भूमिका चीनू प्रेक्षकांना खूपचं आवडतेय. ती खूप क्युट आहे आणि तिचा अभिनयही बोलका आहे. त्यामुळे सगळेचं तिचे फॅन झाले आहेत, यात शंका नाही.
तर तुम्ही पाहता का पुन्हा कर्तव्य आहे Punha Kartavya Aahe ही मालिका ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाची निगडित अशाचं नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !