Pune Hinjewadi Metro महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे यांसारख्या महानगरांमध्ये वाहतुकीची समस्या ही दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. दहा ते पंधरा किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी लागणारा तास 2 तासाचा वेळ हा सर्वांनाच कंटाळवाणा झालेला आहे. आता आधीपासून जे रस्ते किंवा उड्डाणपूल बनले आहेत, ते तर आणखीन वाहतूक नाही सहन करू शकत. मग यासाठी एक सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मेट्रो.
मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये मेट्रोची कामं मोठ्या वेगाने सुरू आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वीच स्वारगेट ते कसबा पेठ हा मेट्रो मार्ग सुरू करण्यात आला होता. ज्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि आता पुणेकरांना बहुप्रतिक्षित असलेला छत्रपती शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प लवकरचं सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Pune Hinjewadi Metro Line
पुण्यातील हिंजवडी येथे जगातील सर्वात मोठा आयटी पार्क आहे. रोज लाखो लोक पुण्याच्या विविध भागातून येथे नोकरीसाठी जात असतात. परंतु त्यामुळे हिंजवडीला जात असताना बाणेर, बालेवाडी, हिंजवडी या भागात मोठा वाहतुकीचा खोळंबा होतो. काही महिन्यांपूर्वी या वाहतुकीच्या खोळंब्यामुळेच हिंजवडीतील अनेक आयटी कंपन्यांनी महाराष्ट्र बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी ही समोर आली होती.
पण आता या सर्व समस्यांना उत्तर असलेला छत्रपती शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजीनगर ते हिंजवडी हा एकूण 23 किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. जो बाणेर आणि बालेवाडी या प्रमुख स्थानकांना जोडेल.
सद्यस्थितीमध्ये या प्रकल्पाचे 74% काम पूर्ण झालं असून 2025 मध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय.
तर तुम्ही पुण्यातील कोणता मेट्रो मार्ग सुरू होण्याची वाट पाहताय, नक्कीचं कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !