Premalu On OTT चित्रपट पाहायला आपल्या सर्वांनाचं आवडतं आणि जेव्हापासून ओटीटी सुरू झाले आहेत. तेव्हापासून तर जगभरातील विविध भाषांमध्ये चित्रपट पाहणं खूप सोपं झालं आहे. आता चित्रपट पाहणाऱ्यांसाठी भाषेचं कोणतंही बंधन राहिलेलं नाहीये. अनेक चित्रपटांचे डब व्हर्जन असतात. त्यामुळे जगभरातील चित्रपट आपण पाहतोय.
म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी अशाचं एका चित्रपटाबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. जो चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता आणि हा चित्रपट सध्या सगळीकडे खूपच आवडीने पाहिला जातोय. एक चांगली लव्हस्टोरी, एक क्युट लवस्टोरी पहायची असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे.
Premalu On OTT
आम्ही बोलतोय मल्याळम चित्रपट प्रेमालूबद्दल. हा चित्रपट तुम्ही कोठे पाहू शकता, त्याबद्दल तर आम्ही सांगणारचं आहोत. आधी या चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटाचं बजेट फक्त 3 कोटी रुपयांचं होतं. पण चित्रपटाने शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आणि मल्याळम चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला.
प्रेमालू Premalu On OTT गोष्ट आहे सचिन आणि रेणू या दोघांची. हे दोघे हैदराबादमध्ये राहतात. रेणू एका आयटी कंपनीमध्ये काम करते. तर सचिन एका बर्गरच्या मोठ्या दुकानात काम करतो. पण तो इंजिनियर आहे आणि त्याला विदेशात जायचंय.
प्रेमालू चित्रपट
एका लग्न समारंभात या दोघांची ओळख होते आणि मग त्यानंतर त्यांच्यात मैत्री होते. सचिन पहिल्याचं भेटीत रेणूच्या प्रेमात पडतो. परंतु रेणूसाठी मात्र तो एक लहान मुलासारखाचं असतो, ती त्याची काळजी घेते. पण जेव्हा सचिन तिचा प्रपोज करतो, तेव्हा मात्र मी नकार देते. मग पुढे काय होतं, यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
डिज्नी प्लस हॉटस्टार या OTT ऍपवर हा चित्रपट 12 एप्रिलला रिलीज झालाय. तुम्ही हॉटस्टारचं प्रीमियम सबस्क्रीप्शन विकत घेऊन, हा चित्रपट पाहू शकतात.
सध्या सगळीकडे ॲक्शन चित्रपटांची चलती आहे. मारधाडवाले चित्रपट लोकांना पाहायला आवडताय. पण जर तुम्हाला असा एखादा चित्रपट पाहायचा असेल, जो एक क्युट आणि सुंदर लव स्टोरी असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठीचं आहे. लव्ह स्टोरीच्या चाहत्यांसाठी तर ही एक पर्वणीचं आहे, यात शंका नाही.
तर तुम्ही पाहिला का Premalu On OTT नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !