Prarthana Behere Biography प्रार्थना बेहेरे ही मराठी कलविश्वातील अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या जबरदस्त अभिनयाने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
आज प्रार्थना बेहेरे सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय पण तिने कधीच अभिनेत्री बनायचं ठरवलं नव्हतं.
Prarthana Behere Biography
अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी ती एक न्यूज रिपोर्टर होती. अशीच एकदा न्यूज रिपोर्टिंग करताना ती अभिनेत्री रेणुका शहाणे यांना भेटली. तेव्हा त्यांनी प्रार्थनाला ‘रिटा’ या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याविषयी विचारलं. तेव्हा प्रार्थनाने त्यासाठी होकार दिला.
प्रार्थनाने (Prarthana Behere Biography) रेणुका शहाणेंना रिटा चित्रपटासाठी असिस्ट केलं आणि तिने या चित्रपटात अनुराधा साळवी नावाची छोटीशी भूमिकासुद्धा केली होती.
प्रार्थना बेहरे जीवनकहानी
यानंतर तिला अभिनयात गोडी निर्माण झाली. तिने पवित्र रिशता या मालिकेतील वैशाली या पात्रासाठी ऑडिशन दिलं आणि तिची निवडसुद्धा झाली. तिचं हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडलं आणि तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
प्रार्थनाने नंतर लव्ह यू मिस्टर कलाकार, बॉडीगार्ड या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं.
तिने हिंदीसोबतच Prarthana Behere Biography अनेक मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मितवा, कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, फुगे, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, वक्रतुंड महाकाय यासारख्या चित्रपटात तिने अभिनय केला.
Majhi Tujhi Reshimgath Hindi Remake : माझी तुझी रेशीमगाठ ही लोकप्रिय मालिका पुन्हा सुरू होतेय
काही महिन्यांपूर्वी प्रार्थनाची माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठीवरील मालिका प्रचंड गाजली होती. यात तिच्याबरोबर अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होता.
प्रार्थनाने 14 नोव्हेंबर 2017 रोजी अभिषेक जावकरसोबत अरेंज मॅरेज केलं. Prarthana Behere Biography अभिषेक हा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे.
सध्या प्रार्थना साड्यांचा व्यवसायसुद्धा करतेय. तिने आपल्या नणंदेसोबत मिळून ‘वी नारी’ हा साड्यांचा ब्रँड सुरू केलाय.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !