Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana : सोलार पंप घेण्यासाठी तुम्हाला भरावे लागणार इतके पैसे

Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana In Marathi

Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana शेतकरी शेतात त्याच्या कष्टाने सोन पिकवतो परंतु हे सोनं पिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं पाणी आणि शेताला पाणी मिळतं सिंचनाने.

महाराष्ट्राच्या अनेक भागात दुष्काळ असतो. तेथे शेतासाठी पाणी मिळवण हे अवघडचं. परंतु जिथे पाण्याचा दुर्भिक्ष नाही, पाणी मुबलक प्रमाणात आहे. अशा ठिकाणीही विजेच्या कमतरतेमुळे शेताला पाणी पुरवणं, हे जिकिरीचं काम असतं.

Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana 

कारण शेतीसाठी दिवसा वीज पुरवली जात नाही आणि रात्रीचं वीज पुरवली जाते. अशावेळेस शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री जागावं लागतं. एवढंच नाही तर काही हिंसक जनावरांची भीतीही असते.

त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणली आहे. योजनेचे नाव आहे “प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना” (Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana) आणि राज्य सरकारच्या योजनेचे नाव आहे “मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना”. ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सोलार पंप लावायचा आहे. त्यांच्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. कारण या योजनेत सोलार पंपवर जवळपास 95% अनुदान मिळतं. आज आम्ही तुम्हाला या योजनांबद्दल सांगणार आहोत.

काय आहे प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना ?

केंद्र सरकारने 2023-2024 यावर्षी प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत जवळपास 5 लाख सोलर पंप आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 2 लाख सौर पंप शेतकऱ्यांना वाटप करण्याचं ठरवलं आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप (Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana) योजनेत किती अनुदान मिळतं ?

यो योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी 90% तर अनुसूचित प्रवर्गासाठी 95% अनुदानावर सोलर पंप वितरित केले जातात.

शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करावा लागतो आणि जर त्यांना सोलार पंप मंजूर झाला, तर एचपी क्षमतेनुसार पैसे भरून हा सोलर पंप मिळतो.

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत सोलर पंपच्या किमती.

खाली दिलेल्या सर्व किमती या खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या 90 टक्के अनुदानावर आधारित आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही 3 एचपी, 5 एचपी आणि 7 एचपी क्षमतेचे सोलर पंप निवडू शकता.

3 एचपी क्षमतेच्या सोलार पंपची बाजार किंमत 1 लाख 94 हजार रुपये आहे. शासनाच्या अनुदानानंतर तुम्हाला फक्त 19380 रुपये भरावे लागतील.

जास्त व्याज देणाऱ्या बचत योजना

5 एचपी क्षमतेच्या सोलार पंपची बाजार किंमत 2 लाख 70 हजार रुपये आहे. शासनाच्या अनुदानानंतर तुम्हाला फक्त 27 हजार रुपये भरावे लागतील.

7 एचपी क्षमतेच्या सोलार पंपची बाजार किंमत 3 लाख 75 हजार रुपये आहे. शासनाच्या अनुदानानंतर तुम्हाला फक्त 75 हजार रुपये भरावे लागतात.

एकूणचं ही Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana योजना शेतकरी मित्रांसाठी खूप फायद्याची आहे. तुम्हाला हा लेख फायदेशीर वाटला असेल, तर नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेख नक्कीच वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top