Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त अन्नदाता म्हणून शेतकऱ्यांचे स्थान खूप मोठे आहे. परंतु भारत देश विविधतेने नटल्यामुळे, हवामानातील बदलामुळे, पाण्याच्या कमी जास्त उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोर जावं लागतं.
शेतकरी खूप मेहनतीने त्यांच्या जमिनीवर अन्नधान्य पिकवतात. परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल, याबद्दल शाश्वती देता येत नाही. निसर्गचक्रातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट तर होतचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेतमालाला योग्य बाजार भावही मिळत नाही. त्यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चाललीये. त्यामुळे शेतकरी आत्महत्या यांसारख्या समस्याही दिवसेंदिवस वाढत आहेत.
हे रोखण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक स्तरावर मदत करण्याची खूप गरज आहे. म्हणूनचं भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केलीये. मग ही योजना नेमकी आहे तरी काय ? Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana काय लाभ मिळतो ? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय अटी आहेत ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा इतिहास
भारत सरकारने 1 डिसेंबर 2018 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. परंतु भारत सरकारने या योजनेची घोषणा करण्याआधी तेलंगणा सरकारने या स्वरूपातील एक योजना सुरू केली होती. जिथे शेतकऱ्यांना वर्षातून दोन हप्त्यांमध्ये एक ठराविक रक्कम दिली जायची.
केंद्र सरकारने या योजनेचा अभ्यास केला आणि मग Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana सुरू केली. तेव्हा या योजनेसाठी वार्षिक 75 हजार कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं होतं. या योजनेसाठी एक महत्त्वाची अट होती की, ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अशा अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता.
या योजनेअंतर्गत एका वर्षात या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा केले जायचे. दर चार महिन्यांनी तीन हप्ते असं करून वर्षभरामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे एकूण सहा हजार रुपये पाठवले जायचे.
परंतु त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेमध्ये एक मोठा बदल घडवून आणला. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेची ही अट शिथिल करण्यात आली आणि सरसकट देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचं ठरवलं गेलं. म्हणजेच देशातील प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्या नावावर शेतजमीन आहे, त्याला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केली जाते.
हेही वाचा : Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana |गरीब कल्याण अन्न योजना
आजपर्यंत Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana या योजनेअंतर्गत जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली गेली आहे आणि 16 हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पाठवले गेले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे फायदे
या योजनेअंतर्गत भारत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
एका आर्थिक वर्षात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांचा अकाउंटवर वर्ग केला जातो. अशाप्रकारे तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवली जाते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते.
जेव्हा या Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana योजनेची सुरुवात झाली होती, तेव्हा अल्पभूधारक शेतकऱ्यांनाचं या योजनेचा लाभ दिला जात होता. ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे फक्त त्यांनाचं. परंतु त्यानंतर ही अट शिथिल करण्यात आली आणि आता देशातील सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो आणि आर्थिक मदत केली जाते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची गरज असते.
- लाभार्थी शेतकऱ्यांचं आधार कार्ड
- लाभार्थी शेतकऱ्यांचा रहिवासी दाखला
- लाभार्थी शेतकऱ्यांच्या जमिनी संबंधित माहिती आणि कागदपत्रे
- लाभार्थी शेतकऱ्याचे बँक अकाउंट
- लाभार्थी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर
- लाभार्थी शेतकऱ्याचा पासपोर्ट साईज फोटो
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा
या Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारने एक स्वतंत्र पोर्टल सुरू केलं आहे
या पोर्टलला भेट दिल्यानंतर तुम्हाला होम पेजवरचं नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय दिसतो. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरावी लागेल आणि सबमिट केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल.
या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये तुमची नोंदणी झाली आहे की नाही ? किंवा नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतोय का ? तुम्हाला किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळतोय का ? हे सुद्धा चेक करता येईल.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी चेक करावी ?
या Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची नावे वगळली जातात. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना या योजनेचा हप्ता मिळत नाही. त्यामुळे वेळोवेळी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आपलं नाव आहे की नाही, हे सुद्धा चेक करणं खूप महत्त्वाचं असतं.
खालीलप्रमाणे प्रक्रिया करून तुम्ही या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी चेक करू शकतात.
- सर्वात आधी लाभार्थी शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- येथे आल्यावर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी चेक करण्यासाठी एलजी डिरेक्टरी (LG Directory) असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
- एलजी डिरेक्टरी या पर्यायावर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो ओपन होईल आणि यामध्ये दोन पर्याय दिसतील शहरी आणि ग्रामीण.
- शहरी किंवा ग्रामीण यामधील योग्य पर्यायाची निवड केल्यानंतर Get Data म्हणजेच डेटा मिळवा या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- डेटा मिळवा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल आणि मग तुम्ही जेथे राहता, तो संपूर्ण पत्ता निवडावा लागेल, म्हणजेचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर असे पर्याय निवडून तुम्ही लाभार्थ्यांची यादी पाहू शकता आणि त्यामध्ये स्वतःचं नावही चेक करू शकता.
ही तर झाली लाभार्थ्यांची यादी पाहण्याची पद्धत. आता तुम्ही या पोर्टलवरून व्यक्तिगत माहितीही मिळवू शकता की, तुम्हाला आजपर्यंत किती हप्ते मिळाले आहेत. यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
त्यानंतर शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करून तुमची स्थिती जाणून घेऊ शकता. या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आधार कार्ड नंबर सबमिट केल्यावर एक ओटीपी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल माहिती पाहता येईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल तर आपण सगळी माहिती पाहिली. आता जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल. 27 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना लॉन्च करण्यात आली.
केंद्र सरकारच्या Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेवर आधारित आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लॉन्च केली आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या अकाउंटवर दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत पाठवेल.
म्हणजेचं आता शेतकऱ्यांना डबल आर्थिक मदत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदती बरोबरचं महाराष्ट्र राज्य सरकारची 6000 रुपयांची आर्थिक मदतही मिळेल. याचा अर्थ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, या नवीन योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ? तर ज्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो, त्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ मिळेल.
महाराष्ट्रातील 85 लाख शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कोठेही अर्ज करायची गरज नाहीये. जे शेतकरी केंद्र सरकारच्या योजनेसाठी लाभार्थी आहेत, त्या शेतकऱ्यांना आपोआपचं राज्य सरकारच्या योजनेचाही लाभ मिळेल.
शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असायला हवेत, तुमची नोंदणी तेथे असायला हवी.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट
भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कुणापासूनही लपलेली नाहीये. शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जावी, या उद्देशाने Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे आणि आता महाराष्ट्र सरकारनेही त्यात हातभार लावलाय.
शेतकरी हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. त्यांच्या कष्टाला फळ मिळालंच पाहिजे. परंतु अशा अनेक बाबी आहेत, असे अनेक फॅक्टर्स आहेत, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळत नाही. मग ते निसर्गाची अवकृपा ते बाजार भाव न मिळण अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनचं शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे.
Pradhanmantri Kisan Sanman Yojana FAQ’s प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- प्रश्न : Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली.
- प्रश्न : Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana फायदा काय आहे ?
उत्तर : या योजनेअंतर्गत संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारद्वारे केली जाते.
- प्रश्न : नमो शेतकरी महासन्मान योजना काय आहे ?
उत्तर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरचं महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते ?
उत्तर : या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असावेत आणि तुमच्या नावावर शेतजमीन असावी या अटींची पूर्तता करावी लागते.
एकूणचं Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान योजना गेमचेंजर ठरली आहे. या योजनेचा देशातील 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळालेला आहे. शेतकऱ्यांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी ही योजना उपयोगी पडत आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना तोंड दिलंय आणि त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने खूप चांगली सुरुवात केली. परंतु अजूनही अनेक प्रयत्न करण्याची गरज आहे.
तुमच्या मनात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबाबत आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या इतर योजनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !