Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 | प्रधानमंत्री कौशल विकास योजना

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 आपला भारत देश जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनलाय. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या वेगाने पुढे जात आहे. या प्रगतीच श्रेय जातं भारतातील तरुणांना. जे रात्रंदिवस मेहनत करून आपल्या देशाला पुढे नेण्याचं काम करताय. मग ते कोणतेही क्षेत्र असो, शेती असो, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असो, इंजीनियरिंग असो, मेडिकल असो, किंवा विविध असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे तरुण. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळेचं भारताची अर्थव्यवस्था इतक्या वेगाने पुढे जातेय.

परंतु विकसनशील देशांमध्ये आणखीन एक मोठी समस्या असते आणि ती म्हणजे बेरोजगारी. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे, ते काम करत आहेत. परंतु असेही अनेक तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत. ज्यांच्या हाताला काम नाहीये. त्यांना रोजगार हवा आहे आणि कोणत्याही देशात बेरोजगार तरुण ही खूप मोठी समस्या असते. ती सोडवायलाच हवी. म्हणूनचं भारत सरकारने बेरोजगार तरुणांची ही समस्या सोडवण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मग ही प्रधानमंत्री कौशल विकास योजना नेमकी आहे तरी काय ? Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 या योजनेअंतर्गत तरुणांना काय लाभ मिळेल ? प्रधानमंत्री कौशल विकास योजना बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळवून देते ? आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेची उद्दिष्टे

आपल्या देशातील बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री कौशल विकास योजना (Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0) राबवण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने 40 वेगवेगळ्या क्षेत्रांचं प्रशिक्षण दिलं जातं. या योजनेमध्ये सहभागी होणारे तरुण त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेऊ शकतात आणि मग त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना सरकारकडून प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र आणि आठ हजार रुपये देखील मिळतात. त्यांना रोजगाराच्या संधीही दिल्या जातात. बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देणं, त्यांच्या हाताला कौशल्य देणं हेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती

1) आपल्या देशामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच (Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0) चौथ पर्व म्हणजेच प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 सुरू आहे.

2) या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुण ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने 40 विभिन्न क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेऊ शकतात.

3) ज्या तरुणांना ऑनलाइन पद्धतीने एखाद्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घ्यायचंय, ते केंद्र सरकारच्या स्किल इंडिया या ऑनलाइन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकतात.

4) तर ऑफलाईन प्रशिक्षणासाठी संपूर्ण देशामध्ये 32 हजार प्रधानमंत्री कौशल विकास केंद्र उघडण्यात आले आहेत.

5) या योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे.

https://www.pmkvyofficial.org/index.php.

6) याव्यतिरिक्त तुम्ही खाली दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करूनही या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.

08800055555

7) या Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु या बेरोजगार तरुणांनी कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण घेणं अनिवार्य आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत लाभार्थी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदाराचं आधार कार्ड

2) अर्जदाराचं बँक अकाउंट पासबुक

3) अर्जदाराचं शाळेचं प्रमाणपत्र

4) अर्जदाराचा मोबाईल नंबर

5) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

हेही वाचा : Mukhyamantri Rajshree Yojana | मुख्यमंत्री राजश्री योजनेची संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत अर्ज कसा करायचा

या Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 योजनेसाठी ज्या बेरोजगार तरुणांना अर्ज करायचा आहे, त्यांना ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी काय काय स्टेप्स आहेत, आपण ते पाहूया.

1) सर्वात आधी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.

https://www.pmkvyofficial.org/index.php

2) या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला कॅंडिडेट या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

3) त्यानंतर फाईंड अ ट्रेनिंग सेंटर या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राची माहिती तुम्हाला मिळेल.

4) तुमच्या जवळील कौशल्य विकास केंद्र दिसल्यानंतर तुम्हाला स्वतःची वैयक्तिक माहिती भरून या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करता येईल.

5) रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लॉगिन डिटेल्स मिळतील. त्या लॉगिन डिटेलच्या साह्याने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता आणि तुम्हाला पुढील अपडेट्स मिळत राहतील.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत कोणत्या विषयांची ट्रेनिंग मिळते

आपण याआधी चर्चा केलीये, या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना 40 क्षेत्रांमध्ये ट्रेनिंग दिली जाते. मग हे कोण कोणते क्षेत्र आहेत, ते पाहूयात.

या Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 योजनेअंतर्गत हॅंडीक्राफ्ट, लेदर टेक्नॉलॉजी, जेम्स अँड ज्वेलरी, फूड प्रोसेसिंग, फर्निचर अँड फिटिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर या क्षेत्रांमध्ये ट्रेनिंग मिळते.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचं सामाजिक महत्त्व

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये तरुण सर्वात मोठी संपत्ती आहे. जगातील ज्या देशांमध्ये तरुणांची संख्या जास्त असते, तो देश प्रगती करतो. सध्या भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे आणि त्यातल्या त्यात या लोकसंख्येमध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे जगभरात भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखलं जातं. 

जगभरात भारताला काम करणाऱ्यांची तरुणांची खाण म्हटलं जातं. त्यामुळे जगभरातील विविध कंपन्या ज्यांना काम करण्यासाठी हातांची गरज आहे, मनुष्यबळाची गरज आहे, त्या भारतामध्ये येत आहेत. भारतीय लोकांना नोकऱ्या देत आहेत.

परंतु जेव्हा भारतातील आणि जगभरातील लोकांना  काम करणाऱ्या हातांची, मनुष्यबळाची गरज आहे. तेव्हा हे मनुष्यबळ स्किल्ड असलं पाहिजे. त्यांच्याकडे एखाद्या विषयात, एखाद्या क्षेत्राचं चांगलं शिक्षण, चांगलं नॉलेज असलं पाहिजे. तरच या मनुष्यबळाचा वापर होईल आणि हीच गरज ओळखून भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हणजे जेव्हा कोणत्याही कंपनीकडून रोजगाराबद्दल एखादी रिक्वायरमेंट येईल की, आम्हाला हे काम करू शकणारी माणसं हवी आहेत. मग ते कोणतही काम असो. तेव्हा असे हजारो शिकलेले हात वर आले पाहिजे की, आम्हाला हे काम जमतंय. आम्हाला रोजगाराची गरज आहे .नाहीतर रोजगाराच्या संधी समोरून चालत आल्या, पण तुमच्याकडे ते कौशल्य नसलं, तर तुम्हाला ती संधी मिळवता येत नाही. रोजगार मिळवता येत नाही.

भारत सरकारने हीच गोष्ट हेरली की, पुढील काही वर्षांमध्ये आपल्या देशात रोजगाराच्या खूप संधी असतील, खूप नोकऱ्या असतील. परंतु जोपर्यंत तरुणांना प्रशिक्षण मिळत नाही. ट्रेनिंग मिळत नाही. त्यांच्या हातात ते कौशल्य असत नाही. तोपर्यंत त्यांना या संधीचा फायदा होणार नाही. म्हणूनचं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 खूप महत्त्वाची आहे.

या जगात कोणतही काम करायचं असेल, तरी तुमच्याकडे कौशल्य असणं खूप महत्त्वाचं आहे. मग ते घरातील नळ फिटिंग करण्यापासून ते एखादं सॉफ्टवेअर बनवण्यापर्यंत असतं. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला प्रशिक्षण मिळण्याची गरज असते.

परंतु अनेक लोकांना हे प्रशिक्षण मिळवण्यासाठी, जे कोर्स करावे लागतात, जे शिक्षण घ्यावं लागतं, तेवढे पैसे त्यांच्याकडे नसतात. अशावेळेस भारत सरकारने हीच गरज ओळखली आहे आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 40 विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण फ्री दिलं जातं. त्यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत.

म्हणूनच गरीब घरातील तरुणांना ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, परंतु पैसा नाहीये, संधी नाहीये. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना खूप मोठी संधी आहे, यात शंका नाही.

FAQ About Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 कधी सुरू करण्यात आली ?

उत्तर : भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ 2015 मध्ये केला होता. सध्या या योजनेचं चौथ चरण सुरू आहे.

2) प्रश्न : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे ?

उत्तर : या योजनेअंतर्गत आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना 40 विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना हे प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात. देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे कौशल्य वाढवणे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

3) प्रश्न : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठी शैक्षणिक पात्रता हवी आहे का ?

उत्तर : या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी बेरोजगार तरुणांनी कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.

4) प्रश्न : Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 कोणत्या क्षेत्रांमध्ये ट्रेनिंग दिली जाते ?

उत्तर : या योजनेअंतर्गत हॅंडीक्राफ्ट, लेदर टेक्नॉलॉजी, जेम्स अँड ज्वेलरी, फूड प्रोसेसिंग, फर्निचर अँड फिटिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर या क्षेत्रांमध्ये ट्रेनिंग दिली जाते.

5) प्रश्न : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करणाऱ्या व्यक्तींचे वय किती असावं ?

उत्तर : या योजनेत रजिस्ट्रेशन करणाऱ्या व्यक्तीचं वय 15 ते 45 या वयोगटात असायला हवं.

एकूणच आपल्या देशात बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे आणि या समस्येवर समाधान म्हणूनचं भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यायला हवा आणि आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात करायला हवी.

तुमच्याही मनात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीच कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन योजनांच्या माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top