Pradhanmantri Jan Aarogya Yojana | आयुष्मान भारत योजना 2024

Pradhanmantri Jan Aarogya Yojana

Pradhanmantri Jan Aarogya Yojana

Pradhanmantri Jan Aarogya Yojana उत्तम आरोग्य सुविधा मिळणं हा देशातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असतो. त्याचबरोबर त्या सुविधा देशातील नागरिकांना आणि मुख्यत्वे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना स्वस्त आणि विनामूल्य पुरवणं, हे देशातील सरकारचं मूलभूत कर्तव्य असतं.

म्हणूनचं भारत सरकारने आयुष्मान भारत योजना जी आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या नावाने ओळखली जातेय, सुरू केली आहे. मग ही आयुष्मान भारत योजना Pradhanmantri Jan Aarogya Yojana आहे तरी काय ? या योजनेत लाभार्थी होण्यासाठी काय अटी आहेत ? या योजनेचा काय लाभ मिळतो ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

आयुष्मान भारत योजना

23 सप्टेंबर 2018 रोजी भारताचे माननीय प्रधानमंत्री यांनी आयुष्मान भारत योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात.

आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड दिलं जातं. या कार्डच्या मदतीने ते भारतातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जे आयुष्मान भारत योजनेची संलग्न आहेत, तेथे प्राथमिक आणि माध्यमिक आरोग्य सुविधा घेऊ शकतात.

आयुष्मान भारत योजनेची उद्दिष्टे

भारत सरकारने ही Pradhanmantri Jan Aarogya Yojana योजना सुरू करण्यामागे खूप महत्त्वाची उद्दिष्टे ठेवली आहेत.

1) या योजनेअंतर्गत आर्थिक रूपाने वंचित असलेल्या घटकांना आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट करून घेण्यात येतं.

2) गरिबांना कॅशलेस सुविधेने आरोग्य सुविधा पुरवण्याची ही योजना आहे.

3) ही योजना गरीब कुटुंबांना 5 लाख रुपये प्रति वर्ष किमतीच्या आरोग्य सुविधा पुरवते.

4) आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 1400 आरोग्य प्रक्रिया येतात.

5) या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याच्या 3 दिवस आधी आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर 15 दिवसापर्यंत सगळे खर्च समाविष्ट केले जातात.

6) सरकारने या योजनेअंतर्गत Pradhanmantri Jan Aarogya Yojana भारतातील 10 कोटी कुटुंब म्हणजेचं जवळपास 50 कोटी लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवलंय. या 10 कोटी कुटुंबांपैकी 8 कोटी कुटुंब भारतातील ग्रामीण भागातील असतील, तर 2 कोटी कुटुंब शहरी भागातील असतील.

आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता आणि अटी

तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, या योजनेत Pradhanmantri Jan Aarogya Yojana लाभार्थी होण्यासाठी सरकारने कोणत्या पात्रता अटी ठेवल्या आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

भारत सरकारने या योजनेसाठी दोन वर्ग केले आहेत. ग्रामीण क्षेत्र आणि शहरी शेत्र. या दोन्ही क्षेत्रातील लोकांसाठी वेगवेगळ्या पात्रता अटी आहेत. सर्वात आधी आपण ग्रामीण भागातील नागरिकांसाठी असलेल्या पात्रता अटींबद्दल जाणून घेऊया.

1) अनुसूचित जाती आणि जमातीतील कुटुंब या योजनेसाठी लाभार्थी आहेत.

2) भूमिहीन कुटुंब जे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.

3) भीक मागून उदरनिर्वाह करणारी कुटुंब.

4) ती कुटुंब ज्यांच्याकडे स्वतःचं पक्क घर नाहीये.

5) असं कुटुंब ज्यामध्ये कोणतीही तरुण व्यक्ती नाहीये.

शहरी भागातील लाभार्थींसाठी पात्रता अटी

शहरी भागात सरकारने मुख्यत्वे त्या कुटुंबांना या योजनेचा Pradhanmantri Jan Aarogya Yojana लाभ देण्याचा ठरवलंय. जे असंघटित क्षेत्रात काम करतात. स्वतःचे छोटे-मोठे व्यवसाय करतात. जसं की कचरा उचलणारे, कपडे धुणारे इस्त्री करणारे, मेकॅनिक, बस ऑटो चालवणारे, घर काम करणारे, प्लंबर, मिस्त्री, सुतार, लोहार, शिल्पकार अशा कुटुंबांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ दिला जाईल.

आपण पाहिलं की, जी कुटुंब या योजनेसाठी लाभार्थी होऊ शकतात. आता आपण त्या कुटुंबांविषयी चर्चा करूया, जी या योजनेसाठी लाभार्थी होऊ शकत नाही. त्यासाठी सरकारने काही पात्रता अटी आखून दिल्या आहेत.

ज्या कुटुंबांकडे दोन चाकी, चार चाकी वाहनं आहेत, घरात फ्रीज आहे, पक्क घर आहे, 10 हजार रुपयेपेक्षा जास्त पगार देणारी मासिक नोकरी आहे आणि 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता कशी तपासाल

आयुष्मान भारत योजनेसाठी Pradhanmantri Jan Aarogya Yojana तुम्ही पात्र आहात की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

1) आयुष्मान भारत योजनेची अधिकृत वेबसाईट www.pmjay.gov.in ला भेट द्या

2) इथे आल्यावर माय एलिजिबिलिटी या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

3) त्यानंतर तुमचा आधार कार्डनंबर सबमिट करून ओटीपी जनरेट करावा लागेल.

4) तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.

5) या फॉर्ममध्ये तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि हा फॉर्म सबमिट करावा लागेल.

हेही वाचा : Yuva Nidhi Yojana 2024 | बेरोजगार भत्ता योजनेची संपूर्ण माहिती

आयुष्मान भारत योजनेत कोणत्या आजारांवर उपचार केले जातात

अस नाहीये की, सरकारच्या या योजनेअंतर्गत Pradhanmantri Jan Aarogya Yojana प्रत्येक रोगावरचं मोफत उपचार केले जातील. सरकारने काही आजारांची यादी प्रसिद्ध केली आहे, त्याच आजारांवर सर्जरी किंवा उपचार या योजनेअंतर्गत मोफत केले जातात.

आयुष्मान भारत योजनेचं सामाजिक महत्त्व

आपल्या देशात अनेक लोक जीवन विमा काढतात. जर तुमच्या आयुष्याला काही धोका झाला, तर तुमच्यानंतर कुटुंबाला हा जीवन विमा मिळतो. ज्यातून त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो. तसंच सध्या आरोग्य विमा म्हणजेचं हेल्थ इन्शुरन्स निघालेत.

पुढील भविष्यात जर तुम्हाला एखादा आजार झाला, तर त्या आजाराचा खर्च या हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून भागवला जातो.

परंतु आजार नाही झाला तर, हेल्थ इन्शुरन्सला भरले जाणारे पैसे वाया जातात. परंतु तरीही हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठ आहे. कारण सध्या मोठ मोठया शहरांमध्ये जी हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्ये छोटासा इलाज करणंसुद्धा खूप महाग बनलंय. त्यामुळे अनेक लोक हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवतात. ज्याचा फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो. परंतु हेल्थ इन्शुरन्स खूप महागडे असतात.

उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांना आज हेल्थ इन्शुरन्स घेणे परवडतं. परंतु मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी हेल्थ इन्शुरन्स घेणे शक्य नाहीये. अशा लोकांसमोर मग देशातील सरकारी हॉस्पिटलचा पर्याय असतो. परंतु आपल्या देशातील सरकारी आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे, हे आपल्या सर्वांना माहितीये.

गावांमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये तर कोणत्याही आरोग्या सुविधा उपलब्ध नसतात. अनेक वेळेस तर तेथे डॉक्टरही उपलब्ध नसतात. त्यामुळे गरिबांना शहराच्या ठिकाणी इलाज करण्यासाठी जावं लागतं. तिथे गेल्यावर त्यांना अनेक संकटांना तोंड द्याव लागतं. त्यांच्याकडे चांगला इलाज करण्यासाठी पैसे नसतात.

अशा गरीब लोकांसाठी भारत सरकारने आयुष्मान भारत योजना Pradhanmantri Jan Aarogya Yojana सुरू केली आहे. या योजनेचा भारतातील गरीब लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. ज्या लोकांचं आर्थिक उत्पन्न खूप कमी आहे. त्या लोकांना आरोग्य विषयक सुविधा मिळवून या योजनेअंतर्गत सोप्पं झालंय.

निर्धन कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा या योजनेअंतर्गत पुरवल्या जात आहेत आणि ही भारत सरकारची खूपच कौतुकास्पद योजना आहे. कारण चांगल्या आरोग्य सुविधा मिळणं हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना तो मिळतोय.

एक वेळेस गरिबांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणं सोपं होतं. परंतु त्यांना जर एखादी सर्जरी करायची असेल, तर ते त्यांच्या आवाक्या बाहेरचं असायचं आणि गरीब लोक आयुष्यभर हा त्रास सहन करायचे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या. परंतु आता आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत Pradhanmantri Jan Aarogya Yojana सर्जरी करणंही मोफत झालंय. त्यामुळे अनेक गरीब लोक या योजनेचा फायदा घेत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातून व्याधीना दूर करत आहेत.

FAQ About Pradhanmantri Jan Aarogya Yojana आयुष्मान भारत योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : Pradhanmantri Jan Aarogya Yojana कधी सुरू करण्यात आली ?

उत्तर : ही योजना भारत सरकारद्वारे 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली.

2) प्रश्न : आयुष्मान भारत योजनेत लाभार्थ्यांना काय लाभ दिला जातो ?

उत्तर : या योजनेअंतर्गत भारतातील गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत दिल्या जातात.

3) प्रश्न : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्रता अटी काय आहेत ?

उत्तर : या Pradhanmantri Jan Aarogya Yojana योजनेअंतर्गत मुख्यत्वे गरीब कुटुंबांना आरोग्य सुविधांचा लाभ दिला जातो. सरकारने ग्रामीण आणि शहरी भागांसाठी विविध पात्रता अटी जाहीर केल्या आहेत. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे योजनेच्या संकेतस्थळावर जाऊनही तपासू शकता.

4) प्रश्न : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये इलाज करता येतो का ?

उत्तर : होय, तुमच्याकडे जर आयुष्यमान भारत कार्ड असेल, तर या योजनेशी संलग्न असलेल्या कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात ईलाज करू शकता.

5) प्रश्न : Pradhanmantri Jan Aarogya Yojana अंतर्गत कॅशलेस सुविधेचा वापर करता येतो का ?

उत्तर : होय, या योजनेअंतर्गत तुम्ही कॅशलेस सुविधेचा वापर करू शकता.

आयुष्मान भारत योजना Pradhanmantri Jan Aarogya Yojana भारत सरकारने सुरू केलेली खूपचं उल्लेखनीय आणि कौतुकास्पद योजना आहे. या योजनेचा लाभ भारतातील गरीब कुटुंबाने नक्कीचं घ्यायला हवा.

तुमच्या मनात आयुष्मान भारत योजनेविषयी आणखीन काही प्रश्न असतील. तर नक्कीच कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि सरकारच्या इतर योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top