Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana
Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana ही भारत सरकारची खूप महत्वकांक्षी योजना आहे. आपल्या भारत देशात गरीब लोकांची संख्या लक्षणीय आहे. 2024 मध्येही अनेक कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगताय. गरीब लोकांसाठी 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करणं खूप अवघड जातं. अशा कुटुंबाना सरकारतर्फे अन्नधान्याची मदत होणं, खूप गरजेचं आहे.
म्हणूनचं भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवण्यात येत आहे. पण ही योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेचा गरीब लोकांना काय फायदा होईल ? या योजनेचा लाभार्थ्यांना फायदा कसा मिळवता येईल ? प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अटी काय आहेत ? आज आपण याबद्दलचं जाणून घेऊया.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना नेमकी आहे तरी काय ?
2020 मध्ये जेव्हा कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला, तेव्हा आपल्या भारत देशातही या महामारीने चांगलंच आकांडतांडव माजवलं होतं. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे भारत सरकारने देशात लॉकडाऊन लावलं आणि काही अति महत्त्वाच्या सेवा वगळता सामान्य माणसांना घराबाहेर निघण्यास मज्जाव घातला.
ज्या लोकांना सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये वर्क फ्रॉम होम अशा सुविधा प्राप्त होत्या किंवा श्रीमंत माणसं ज्यांच्याकडे आधीपासून पैसा होता, अशा लोकांना लॉकडाऊनचा जास्त फरक पडला नाही. परंतु गरीब आणि दारिद्र्यरेषेखाली कुटुंबांना मात्र या लॉकडाऊनमुळे खूप मोठ नुकसान झालं. कारण हे लोक रोज काम करून पैसे कमावतात. त्यांच्याकडे साठवलेले पैसे संपत्ती नसते. त्यामुळे आज संध्याकाळी घरात शिजवायचं काय ? जगायचं कसं ? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावेळेस भारत सरकारने Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवली.
लॉकडाऊनमध्ये Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana ठरली गेमचेंजर
या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत रेशन पुरवण्यात आलं. सुरुवातीला तर ही योजना जोपर्यंत लॉकडाऊन आहे, तोपर्यंतचं राबवण्यात येईल, असं सांगितलं गेलं होतं. परंतु 2020 नंतर 2021 मध्ये पुन्हा एकदा कोरोना संपूर्ण भारतात पसरला आणि या योजनेची मुदत वाढवण्यात आली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या रोगाचं थैमान कमी झालं. रुग्ण कमी झाले. लोक पुन्हा एकदा कामावर जाऊ लागले. परंतु लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठ नुकसान झालं. उद्योग धंदे करणारे लोक, व्यावसायिक आणि मोलमजुरी करून रोज पैसे कमवणारे लोक यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे केंद्र सरकारने मोफत रेशन योजनेचा कालावधी आणखीन वाढवला.
लोकांना सहज आणि सोप्यारितीने लाभ पोहोचवणारी ही योजना असून, कोणताही भ्रष्टाचार न होता प्रयेकाच्या हक्काचं धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे ही योजना लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. जेव्हा ही योजना Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana आता बंद होत आहे, हे लोकांना समजलं, तेव्हा सगळेच खूप दुखी झाले होते कारण दोन वेळचं अन्न मिळवणं हा प्रत्येकाचा हक्क असतो आणि या योजनेअंतर्गत ते पूर्ण होत होतं. त्यामुळेच सरकारने जनभावना ओळखली आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढील ५ वर्षांसाठी अविरतपणे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
31 डिसेंबर 2023 पर्यंत ही योजना लागू होती. परंतु त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी 5 वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केलीये. म्हणजेचं आता पुढील 5 वर्ष 31 डिसेंबर 2028 पर्यंत ही योजना लागू असेल. आता आपण या योजनेत गरिबांना काय लाभ मिळेल, ते जाणून घेऊया.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे फायदे
या योजनेअंतर्गत भारत देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन पुरवण्यात येईल. ज्या कुटुंबांकडे बीपीएल रेशन कार्ड आहे, त्या कुटुंबांना दरमहा 5 किलो धान्य मोफत दिलं जातं. यामध्ये 4 किलो गहू आणि 1 किलो तांदळाचा समावेश असतो.
भारतातील विविध राज्य सरकारनेसुद्धा केंद्र सरकारच्या या योजनेला पाठिंबा दर्शवत आपल्या स्वतंत्र योजनाही लागू केल्या आहेत आणि अनेक राज्यांमध्ये बीपीएल कार्डधारकांबरोबरचं केशरी आणि पिवळ्या रंगाचं रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांनाही दरमहा मोफत रेशन पुरवलं जातं.
याप्रकारे Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात आहे आणि पुढील 5 वर्ष ही योजना अशीचं राबविण्यात येईल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अटी
या योजनेसाठी कोणत्याही विशेष अटी लावण्यात आलेल्या नाहीत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फक्त रेशन कार्ड असणं गरजेचं आहे.
तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या कोणत्याही रेशन दुकानात जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सरकार तर असंही सांगतं कीझ जर तुम्ही तुमच्या घरापासून लांब असाल, तर कोणत्याही राज्यात, कोणत्याही शहरातील रेशन दुकानावर या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही मोफत अन्नधान्य मिळवू शकतात.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर किती भार पडेल ?
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयानुसार 2023 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana दोन लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. आता भारत सरकारने ही योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढवली आहे. म्हणजेचं पुढील पाच वर्षात या योजनेवर जवळपास 10 लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात येईल.
ही खूप मोठी रक्कम असून, अनेक देशांचे वार्षिक उत्पन्न या रकमेपेक्षाही कमी असतं. परंतु भारत हा एक खूप मोठा देश आहे, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. त्यामुळे सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी उचललेले हे पाऊल नक्कीचं कौतुकास्पद आहे.
या Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana योजनेवर सरकारने आजपर्यंत किती खर्च केला आहे ?
जेव्हा 2020 – 2021 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची सुरुवात करण्यात आली होती, तेव्हा या योजनेवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. परंतु त्यानंतर या योजनेवरील खर्च सरकारने दरवर्षी कमी केला. खालील आकडेवारीत ही बाब स्पष्ट होते.
FY2020-21 Rs 5,41,330 कोटी
FY2021-22 Rs 2,88,969 कोटी
FY2022-23 Rs 2,87,194 कोटी
FY2023-24 Rs 1,97,350 कोटी
मागील काही वर्षात भारत सरकारने गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या सर्व योजनांमध्ये Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना एक गेम चेंजर योजना म्हणून ओळखली जाते. गरिबांना या योजनेचा खूप फायदा झाला आहे.
आपण सगळेचं अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांना मूलभूत गरजा म्हणतो. प्रत्येक व्यक्तीला दोन वेळचं अन्न मिळायलाचं हवं. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरीब कुटुंबांना हे अन्न मिळवणंसुद्धा अवघड जातं. त्यामुळे केंद्र सरकारने उचललेलं हे पाऊल खूप कौतुकास्पद आहे. या योजनेमुळे कमीत कमी दोन वेळेचं अन्न गरिबांना मिळतंय.
Maharashtra Vidhawa Pension Yojana । महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
लॉकडाऊनमध्ये जे लोक स्वतःच्या घरात कोंडले गेले होते, त्यांच्याकडे पैसे कमवण्याचा कोणताही स्रोत नव्हता. तेव्हा या योजनेचा सर्वांनाचं खूप फायदा झाला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या कामांना सुरुवात केली. परंतु अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे त्यांना अपेक्षित रोजगार मिळत नव्हता. अशावेळेस या योजनेचा पुन्हा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
केंद्र सरकारच्या या योजनेस संलग्न राज्य सरकारनेही अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबांना दुप्पट फायदा होतोय. महाराष्ट्रात राज्य सरकारनेही दिवाळीला आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतला होता.
गरिबांची दिवाळी गोड व्हावी, असा सरकारचा प्रयत्न होता. ज्या अंतर्गत दरमहा मिळणाऱ्या मोफत धान्याबरोबरचं दिवाळीसाठी उपयोगी पडेल अशा वस्तू देण्यात आल्या. या आनंदाच्या शिध्यामध्ये हरभरा डाळ, रवा, तेल आणि साखर या वस्तूंचा समावेश होता.
FAQ’s about Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
या Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana योजनेचा लाभ भारतातील 80 कोटींपेक्षा जास्त जनतेला झालाय. त्यामुळे अनेकांच्या मनात याबद्दल प्रश्न असतील. आपण वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
- प्रश्न : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अजून किती दिवसांसाठी सुरू आहे ?
उत्तर : सरकारने आर्थिक वर्ष 2023 – 2024 च्या आर्थिक संकल्पात या योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षांसाठी वाढवला आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2028 पर्यंत गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- प्रश्न : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा फायदा कोणत्या कुटुंबांना मिळतो ?
उत्तर : या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांकडे पिवळं आणि केशरी रंगाचं रेशनकार्ड आहे, त्या कुटुंबांना मोफत धान्य पुरवलं जातं.
- प्रश्न : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत दरमहा किती धान्य मोफत मिळतं ?
उत्तर : या Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना पाच किलो धान्य दरमहा मोफत मिळत.
- प्रश्न : या योजनेअंतर्गत कोणतं धान्य मोफत मिळतं ?
उत्तर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दरमहा 4 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ असं धान्य मोफत मिळतं.
- प्रश्न : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना कधी सुरू करण्यात आली होती ?
उत्तर : ही योजना लॉकडाऊन दरम्यान आर्थिक वर्ष 2020 – 21 मध्ये सुरू करण्यात आली आणि त्यानंतर ती अविरतपणे सुरू आहे.
तुमच्या मनात Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेबद्दल अजून काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा आणि आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. या संकेतस्थळावर आम्ही आणखी अनेक योजनांची माहिती दिली आहे, ती ही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !