Pradhanmamtri Mudra Yojana आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे तरुणांना नोकरीच्या संधी दिवसेंदिवस कमी होत आहेत. शिक्षण घेतल्यानंतरही रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे तरुणांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतोय.
अशावेळी तरुणांनी स्वयंरोजगाराच्या संधी शोधणं खूप महत्त्वाचं असतं. पण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे भांडवल. भांडवलाअभावी अनेकजण आपला व्यवसाय सुरू करण्याऐवजी नोकरीच करणं पसंत करतात. पण आता हीच समस्या मिटवण्यासाठी आपल्या सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना आणली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhanmamtri Mudra Yojana).
Pradhanmamtri Mudra Yojana
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँक ग्रामीण तसेच शहरी भागातील व्यक्ती, लघु किंवा मध्यम उद्योगांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. कर्जाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते ज्याच्या बदल्यात बँकेकडे काहीही तारण ठेवण्याची गरज नाही.
महिलांना उद्योगात प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रा लोन योजनेत विशेष सवलती दिल्या जातात. अत्यंत कमी व्याजदरात त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Pradhanmamtri Mudra Yojana योजनेत तुम्हाला तीन प्रकारचे कर्ज मिळतात :
1. शिशु स्कीम – या स्कीममध्ये तुम्हाला 50 हजार पर्यंतचं कर्ज मिळतं.
2. किशोर स्कीम – यात तुम्हाला 50 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळतं.
3. तरुण स्कीम – यात तुम्हाला 5 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
हे कर्ज घेतल्यापासून 12 महिने ते 5 वर्षापर्यंत फेडावे लागते.
मुद्रा लोनसाठी बँकेला कोणतंही सेक्युरिटी डिपॉझिट देण्याची गरज नाही.
प्रोसिसिंग फी काहीच आकारली जाणार नाही.
याशिवाय व्याज हे तुमच्या प्रोफाईल आणि बिझनेसच्या गरजेनुसार आकारलं जातं.
प्रधानमंत्री मुद्रा लोन कोणाला मिळू शकतं :
सामान्य व्यक्ती
व्यावसायिक तसेच नवीन उद्योजक
मध्यम आणि लघु उद्योग
दुकानदार
रस्त्यावर गाडी लावणारे
व्यापारी
छोटे निर्माते आणि कारागीर
मुद्रा लोनसाठी (Pradhanmamtri Mudra Yojana) अर्ज कसा करायचा :
प्रधानमंत्री मुद्रा लोन (Pradhanmamtri Mudra Yojana) योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट mudra.org.in वरून तुम्ही फॉर्म डाऊनलोड करू शकता आणि तो भरून सोबत महत्वाची कागदपत्रे जोडून तुम्ही लोन हवं असलेल्या बँकेत जमा करू शकता. बँक हा फॉर्म चेक करते आणि सगळं बरोबर असेल तर पुढची कर्जाची प्रक्रिया केली जाते.
दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून त्याला जोडू शकता. तुमचा फॉर्म चेक झाल्यानंतर सर्वकाही बरोबर असेल तर पुढील 7 ते 10 दिवसांत कर्जाची रक्कम तुमच्या बँक अकाऊंटला जमा होते.
मुद्रा लोनसाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात :
मुद्रा लोन (Pradhanmamtri Mudra Yojana) मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे महत्वाची कागदपत्रे द्यावी लागतात.
1. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा फॉर्म योग्यप्रकारे भरून द्यावा आणि त्यावर पासपोर्ट साईझ फोटो जोडलेला असावा.
2. महत्वाची कागदपत्रे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदानकार्ड, पासपोर्ट, लाईटबिल किंवा पाण्याचे बिल फॉर्मला जोडावे लागतात.
3. मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट जोडावे लागते.
4. तुमच्या व्यवसायाचं ठिकाण, पत्ता आणि किती वर्षांपासून तो व्यवसाय करता याचे पुरावे द्यावे लागतात.
5. तुम्ही जर अनुसूचित जाती जमातीचे असाल तर त्याचे प्रमाणपत्र महत्वाचे आहे.
6. याशिवाय बँकेला जर काही कागदपत्रे लागत असतील तर तीसुद्धा द्यावी लागतात.
मुद्रा लोनचे फायदे :
1. कर्ज घेताना बँकेकडे कोणत्याही प्रकारचं सिक्युरिटी डिपॉझिट ठेवण्याची गरज नसते.
2. प्रोसिसिंग फी आणि व्याजदर हे शून्य किंवा खूपच कमी आकारले जाते.
3. महिलांना व्याजदरात आणखी सवलत मिळते.
4. भारत सरकारने क्रेडिट गॅरेंटी स्कीममध्ये या योजनेचा समावेश केलाय.
5. अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना मुद्रा लोन विशेष व्याजदरावर मिळते.
6. या योजनेत टर्म लोन, कॅपिटल लोन आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिसिटीसुद्धा दिली जाते.
मुद्रा योजनेतून (Pradhanmamtri Mudra Yojana) कर्ज मिळाल्यानंतर बँकेकडून तुमचं मुद्रा लोन बँक अकाऊंट उघडलं जातं आणि त्यातून तुम्हाला मुद्रा कार्ड दिलं जातं. हे एक डेबिट कार्ड असतं. मुद्रा लोन तुमच्या बॅंक अकाऊंटला ट्रान्सफर केलं जातं आणि तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही या डेबिट कार्डच्या साहाय्याने पैसे काढू शकता आणि आपल्या व्यवसायासाठी वापरू शकता. या योजनेचा फायदा देशातील बेरोजगार तरूणांनानक्की होईल, ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय. त्यामुळे गरजवंतांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे (Pradhanmamtri Mudra Yojana) सामान्य व्यक्तीलासुद्धा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मोलाची मदत मिळते. हे सरकारकडून उचललं गेलेलं खूप प्रशंसनीय पाऊल आहे.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !