Post Office Savings Account मित्रांनो प्रत्येक माणसाचं बँकेत अकाऊंट असणं हे खूपच गरजेचं आहे कारण ते आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्वाचं आहे.
तुम्हाला जर आर्थिक व्यवहारांसाठी आणि बचत करण्यासाठी बँकेत अकाऊंट उघडायचं असेल तर तुम्ही पोस्टाच्या बचत खात्याचाही विचार करू शकता कारण पोस्ट ऑफिससुद्धा तुम्हाला बँकेसारखंच सुविधा देतं.
या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यासोबत सरकार तुम्हाला खूप साऱ्या सुविधा देतात.
Post Office Savings Account पोस्ट ऑफिस बचत खाता योजनेचं स्वरूप :
बँकेप्रमाणेच हे बचत खातं तुम्ही पोस्ट ऑफिसमधेही उघडू शकता.
या बचत खात्यावर तुम्हाला दरवर्षी 4% व्याज मिळते.
हे अकाऊंट तुम्ही एकट्याच्या नावावर उघडू शकता किंवा 3 माणसं मिळून जॉईंट अकाऊंटसुद्धा उघडू शकता.
हे बचत खाते फक्त 20 रुपये जमा करून तुम्ही उघडू शकता.
जर तुम्हाला बचत खात्यासोबत चेकबुकची सुविधा हवी नसेल तर तुम्हाला खात्यामध्ये कमीतकमी 50 रुपये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे.
पण जर तुम्हाला चेकबुकची सुविधा हवी असेल तर तुम्हाला अकाऊंटमध्ये कमीतकमी 500 रुपये ठेवावे लागतील.
हे अकाऊंट अल्पवयीन मुलाच्या नावाने सुद्धा उघडता येतं पण सोबत पालकांचेही कागदपत्रे लागतात. पण मुलगा मोठा झाल्यानंतर त्याच्या नावावर हे अकाऊंट ट्रान्सफर करता येतं.
हे खातं जर वापरात नसेल तर ते सुरू ठेवण्यासाठी किमान 3 वर्षात 1 ट्रांझेक्शन करणं गरजेचं आहे.
पोस्ट ऑफिस वरीष्ठ नागरिक बचत योजना
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं (Post Office Savings Account) कोण उघडू शकतो :
हे बचत खातं एक व्यक्ती सिंगल अकाऊंट किंवा दोन व्यक्ती मिळून जॉईंट अकाऊंटही उघडू शकतात.
10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मुलं मुली स्वतःच्या नावावर बचत खातं उघडू शकतात.
अल्पवयीन मुलांच्या वतीने त्यांचे पालक आणि मतिमंद मुलांच्या वतीने त्यांचे पालक बचत खाते उघडू शकतात.
कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये फक्त एकच खाते उघडू शकते.
व्याजदर किती मिळतो :
पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर (Post Office Savings Account) तुम्हाला दरवर्षी 4% व्याजदर मिळतो.
दरवर्षी तुम्हाला हे व्याज अकाऊंटमध्ये दिले जाते. व्याजातून आलेले पहिले 10000 रुपयांवर कोणताही टॅक्स घेतला जात नाही.
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (Post Office Savings Account) उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
ओळखपत्र म्हणून
1. आधारकार्ड
2. रेशनकार्ड
3. मतदानकार्ड
5. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेचं ओळ्खपत्र
6. पासपोर्ट
7. पासपोर्ट साईझ फोटो
8. लाईट बिल आणि फोन बिल
9. सॅलरी स्लिप
पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी फॉर्म कसा भरायचा :
तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा हे बचत खाते (Post Office Savings Account) उघडण्याचा फॉर्म भरू शकता.
फॉर्मसोबत महत्त्वाची कागदपत्रे जोडायची आणि संबंधित अधिकाऱ्याकडे हा फॉर्म जमा करायचा.
यानंतर ठराविक रक्कम भरून तुम्ही हे बचत खाते उघडू शकता.
सरकार वरिष्ठ नागरिकांसाठी एक विशिष्ट फॉर्म उपलब्ध करून देते तो भरून हे बचत खातं उघडता येते.
पोस्ट ऑफिस बचत खात्याचा (Post Office Savings Account) फॉर्म तुम्ही ऑनलाईनसुद्धा भरू शकता :
सगळ्यात आधी तुम्हाला पोस्टाची ऑफिशियल वेबसाईट
https://www.indiapost.gov.in वरून बचत खातं उघडण्याचा फॉर्म PDF स्वरूपात डाऊनलोड करावा लागेल.
त्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून फॉर्म पोस्ट ऑफिसमध्ये भरून जमा करायचा आहे.
पोस्ट ऑफिस बचत खात्याचे फायदे :
1. या बचत खात्यावर (Post Office Savings Account) तुम्हाला दरवर्षी 4% व्याज मिळतं.
2. हे बचत खातं तुम्ही एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकता.
3. एटीएमच्या साहाय्याने तुम्ही दररोज 25000 रुपये काढू शकता.
4. या खात्यासोबत तुम्हाला नॉमिनेशनची सुविधासुद्धा दिली जाते.
5. पोस्ट ऑफिसमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे डिपॉझिट केले जातात आणि पैसे काढलेसुद्धा जातात.
पोस्ट ऑफिसचं हे बचत खातं (Post Office Savings Account) सर्वांसाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यायलाच हवा.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !