Post Office Investment Schemes पैसा पैसा आणि पैसा. पैसा म्हणजे 21 व्या शतकातील आणि या कलियुगातील सर्वात मोठं सत्य. ज्याच्याकडे पैसा आहे, तो सुद्धा टेन्शनमध्ये आहे आणि ज्याच्याकडे नाहीये, तो सुद्धा टेन्शनमध्ये आहे. ज्याच्याकडे नाहीये त्याला कमवायचं टेन्शन आणि ज्याच्याकडे आहे त्याला पैसा सुरक्षित ठेवण्याचं आणि वाढवण्याचं.
म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी तुम्ही कष्टाने कमवलेला पैसा कसा सुरक्षित ठेवता येईल आणि वाढवता येईल याबद्दलची खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. अशा अनेक योजना आहेत जेथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकतात आणि चांगला परतावा मिळवू शकतात. परंतु यामधील काही योजनांमध्ये रिस्क असते. काही लोकांना अशा योजनांमध्ये पैसे गुंतवायला नाही आवडत, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा 5 योजनांबद्दल सांगणार आहोत (Post Office Investment Schemes) जेथे तुमचा पैसा सुरक्षित राहील आणि चांगला परतावाही मिळेल.
Post Office Investment Schemes
तर चला या 5 योजनांबद्दल जाणून घेऊया.
1) किसान विकास पत्र : भारतीय पोस्टाची ही खूप लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे. या योजनेमध्ये सध्या 7.5% व्याजदर मिळतो. म्हणजे जर तुम्ही 9 वर्ष 7 महिने या योजनेत पैसे गुंतवले तर ते डबल होऊ शकतात. तसंच पोस्टाची हमी असल्याने तुमचे पैसे बुडणार नाहीत किंवा नुकसान होणार नाही, हेही नक्की.
2) सीनियर सिटीजन सेविंग स्कीम : नावाप्रमाणेचं या योजनेत फक्त वरिष्ठ नागरिक पैसे गुंतवू शकतात. सध्या योजनेवर 8.2% व्याजदर मिळत आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
3) नॅशनल सेविंग सर्टिफिकेट : तब्बल 7.60% व्याजदर देणारी ही पोस्टाची स्कीम 5 वर्ष चालते. या योजनेत पैसे गुंतवण्याची कोणतीही जास्तीची लिमिट नाहीये.
4) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ : या योजनेवर सध्या 7.1% व्याजदर मिळते. ही योजना सामान्य लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
5) नॅशनल सेविंग टाईम डिपॉझिट अकाउंट : या योजनेअंतर्गत तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षाप्रमाणे पैसे गुंतवू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार व्याजदरही वाढतं. जास्तीत जास्त पैसे जमा करण्याची कोणतीही लिमिट नाहीये.
तरी आहेत पोस्टाच्या त्या 5 गुंतवणुकीच्या योजना (Post Office Investment Schemes) ज्या तुम्हाला मोठा परतावा मिळवून देऊ शकतात आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील. तर तुम्ही पोस्टामध्ये पैसे गुंतवता का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !