या लोकप्रिय गायिकेच्या घरी बाळाचं आगमन, सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

 या लोकप्रिय गायिकेच्या घरी बाळाचं आगमन

या लोकप्रिय गायिकेच्या घरी बाळाचं आगमन. प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड ही सारेगमप लिटिल चॅम्प या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रिय झाली. तिने आपल्या सुंदर गाण्याने सर्वांना आपलं फॅन बनवलं आहे. मराठी कलाविश्वातील ती नावाजलेली गायिका आहे. तिने आजवर अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

 या लोकप्रिय गायिकेच्या घरी बाळाचं आगमन

कार्तिकीने 2020 साली रोनित पिसेसोबत लग्न केलं होतं. रोनित हा एक बिजनेसमन आहे. तो पुण्याचाच राहणारा असून इंजिनिअर आहे. त्यालाही संगीताची खूप आवड आहे आणि तो तबला खूप छान वाजवतो.

लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी आणि रोनितच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. मार्च महिन्यात आपण आई होणार असल्याची बातमी कार्तिकीने चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने आपल्या डोहाळेजेवणाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले होते. हा सोहळा खूपच धुमधडाक्यात पार पडला होता.

या लोकप्रिय गायिकेच्या घरी बाळाचं आगमन
 या लोकप्रिय गायिकेच्या घरी बाळाचं आगमन

त्यात आपल्याला ‘कुणीतरी येणार येणार गं‘ असं लिहलेली भव्य रांगोळी पाहायला मिळाली होती. कार्तिकी आणि तिच्या नवऱ्याची ग्रँड एन्ट्री पाहायला मिळाली. सर्व कुटुंबियांची झलकही पाहायला मिळाली होती. हे सर्व फोटो व्हिडिओ शेअर करत आई होणार असल्याची गुडन्यूज कार्तिकीने चाहत्यांना दिली होती.

कार्तिकी गायकवाड बनली आई

Popular Marathi Actress Become Mother  

आता कार्तिकी आणि रोनितला मुलगा झाला आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. कार्तिकीने ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. आपल्या आवडत्या गायिकेला मुलगा झाल्यामुळे तिचे चाहते खूप खुश आहेत. कार्तिकीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी आणि अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

या लोकप्रिय गायिकेच्या घरी बाळाचं आगमन
Little Champ Fame Kartiki Gaikwad Child Birth Good News

आता फॅन्स कार्तिकीच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. लवकरच आपल्याला तिच्या बाळाची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळेल अशी आशा करूया.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top