PM Kisan Samman Nidhi 17th Hafta : या दिवशी येणार प्रधानमंत्री शेतकरी सम्मान निधी योजनेचा 17 वा हफ्ता

PM Kisan Samman Nidhi 17th Hafta

PM Kisan Samman Nidhi 17th Hafta सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळे पक्ष प्रचार करत आहेत आणि या प्रचारामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे सर्वात पुढे आहेत. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी सगळेचं उमेदवार, सगळेचं पक्ष आपापल्या परीने विविध आश्वासनं देत आहेत.

आणि आता या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यानचं भाजप सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांशी योजना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता (PM Kisan Samman Nidhi 17th Hafta) शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे.

PM Kisan Samman Nidhi 17th Hafta

मे महिन्यामध्ये या योजनेचा सतरावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केला जाईल. मागील म्हणजे 16 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात आला होता. तेव्हा 9 कोटी शेतकऱ्यांना 21000 कोटी रुपये देण्यात आले होते आणि आता 17 हप्ता लवकरचं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

तसं तर जवळपास सगळेचं शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अजूनही मिळत नाहीये, ते प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या संकेतस्थळावर गेल्यावर अर्ज कसा भरायचा याबद्दलची विस्तृत माहिती तुम्हाला मिळेल.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी 17 वा हफ्ता

काही लाभार्थी शेतकऱ्यांना या PM Kisan Samman Nidhi 17th Hafta योजनेचे पैसे मिळण्यासाठी अडचणी येतात आणि याचं कारण म्हणजे त्यांचं बँक अकाउंट आधार नंबरशी जोडलेलं नसतं. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी लवकरात लवकर तुमच्या बँकेशी संपर्क साधून तुम्ही बँक अकाउंट आधार कार्डशी जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ सहज मिळेल.

नमो शेतकरी महासम्मान निधी योजना

कोणते शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी आहेत, ही यादी दरवेळेस प्रसिद्ध केली जाते. तुम्ही या योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन या यादीत आपलं नाव आहे की नाही, तेही चेक करू शकतात.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त केंद्र सरकारच्या योजनेचाचं नाही, तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचाही फायदा मिळतो आणि या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दरवर्षी मिळतात.

म्हणजेचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांचे मिळून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जमा केले जातात. प्रत्येक चार महिन्यात 4 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये या PM Kisan Samman Nidhi 17th Hafta योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा होतात.

अशाचं महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top