PM Awas Yojana 2024 | प्रधानमंत्री आवास योजना माहिती

PM Awas Yojana

PM Awas Yojana

PM Awas Yojana आजच्या काळात पैसे खूप महत्वाचे आहेत. आपण नेहमीचं म्हणतो की, अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या तीनही मूलभूत गरजा प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण व्हायलाचं हव्यात. अन्न आणि वस्त्र या गरजा पूर्ण करणं जवळपास प्रत्येकासाठी शक्य आहे. परंतु वाढत्या महागामुळे स्वतःच्या हक्काचं घर घेणं हे खूप कठीण होत चाललंय.

गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी स्वतःचं हक्काचं घर असणं हे सर्वात मोठे स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न आता पूर्ण करणं दिवसेंदिवस कठीण बनत चाललंय. म्हणूनचं भारत सरकारने आपली जबाबदारी ओळखत सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट ठेवत प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केलीये. या घोषणेअंतर्गत भारतातील शहरी आणि ग्रामीण भागात कोट्यावधी घरांची निर्मिती केली जाईल आणि प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचं घर असावं, हे उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल.

मग ही PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेची उद्दिष्ट काय आहेत ? या योजनेचा लाभ कसा घेता येईल ? या योजनेच्या अटी काय आहेत ? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

(PM Awas Yojana) प्रधानमंत्री आवास योजना नेमकी काय आहे ?

भारत सरकारने 1 जून 2015 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केली होती. हाउसिंग फॉर ऑल या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात 3 कोटींपेक्षा जास्त घरे बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. याआधी आपल्या देशात इंदिरा आवास योजना आणि राजीव आवास योजना अशा गरिबांना घर मिळवून देणाऱ्या योजना होत्या. परंतु आता या सर्व योजना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येतात.

PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन भाग करण्यात आले आहेत. शहरी आणि ग्रामीण. या दोन्ही भागांसाठी वेगवेगळ्या अटी आहेत. वेगवेगळे लाभ दिले जाणार आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे वर्गीकरण

या योजनेअंतर्गत कोणाला घर देण्यात यावं, यासाठी लाभार्थ्यांचे वर्गीकरण त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे करण्यात आलंय.

दुर्बल आर्थिक वर्ग – वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी

कमी उत्पन्न आर्थिक वर्ग – वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाख रुपये दरम्यान

मध्यम आय वर्ग 1 – वार्षिक उत्पन्न 6 ते 9 लाखा दरम्यान

मध्यम आय वर्ग 2 – वार्षिक उत्पन्न 9 ते 12 लाखा दरम्यान

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणत्या अटी आहेत

या PM Awas Yojana लाभ मिळण्यासाठी खालीलप्रमाणे अटी घालून दिलेल्या आहेत.

  1. ज्या कुटुंबात आई-वडील आणि त्यांची लग्न न झालेली मुलं आहेत, त्यांना एक कुटुंब म्हणून संबोधले जातं. तर कुटुंबातील लग्न झालेल्या मुलांना एक स्वतंत्र कुटुंब अशी व्याख्या केली गेली आहे.
  2. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या कुटुंबाच्या नावावर देशातील कोणत्याही भागात घर किंवा प्लॉट असू नये.
  3. ज्या कुटुंबाकडे आधीपासून एक घर आहे, परंतु त्या घराचा एरिया 21 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी आहे, अशा घरांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.

प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना (PM Awas Yojana Rural)

आपण या आधी पाहिलंय की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भागात वर्गीकृत करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील घरे बांधण्यासाठी जो लाभ दिला जातो, तो रोख स्वरूपात 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत आहे.

2024 पर्यंत भारत सरकारने ग्रामीण भागात 2 कोटी 95 लाख घरे बांधण्याचा निर्धार केला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जोडण्यात आलं आहे. ज्यामुळे प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये वेगळे दिले जातात.

प्रधानमंत्री आवास शहरी योजना (PM Awas Yojana Urban)

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडी दिली जाते. लाभार्थ्यांच्या आर्थिक उत्पन्नानुसार त्यांना 3 टक्के ते 6 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळेल. 2 लाख 65 हजार रुपयांपर्यंतची सबसिडी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिली जाते.

केंद्र सरकारने शहरी भागात 2 करोड घर उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सबसिडी कशी मिळते ?

या PM Awas Yojana चा लाभ घेण्यासाठी सदर लाभार्थ्यांना अर्ज सादर करावा लागतो. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर सबसिडी केंद्रीय नोडल एजन्सी बँकेकडे वर्ग करते. उदाहरणार्थ जर तुम्ही 30 लाख रुपयांचं लोन घेतलं असेल आणि तुम्हाला 2 लाखांची सबसिडी मिळाली असेल, तर 30 लाख रुपयांच्या मुळ रकमेतून हे 2 लाख रुपये वजा केले जातात आणि तुमचं कर्ज फक्त 28 लाख रुपयांचं राहतं. अशाप्रकारे तुमच्या लोन अकाउंटवर ही सबसिडी डायरेक्ट पाठवली जाईल.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा

या योजनेसाठी केंद्र सरकारने एक स्वतंत्र पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता. शहरी भागात अनेक बँका आणि बिल्डर स्वतःहून घर खरेदी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.

एकदा अर्ज सादर केल्यानंतर 3 ते 4 महिन्यात ही सबसिडी तुमच्या लोन अकाउंटवर पोहोचते.

प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी
  1. या PM Awas Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. या आधार कार्डाच्या माध्यमातूनचं लाभार्थ्यांचं लोन अकाऊंट या योजनेशी जोडले जाईल.
  2. होम लोन घेताना 10, 15, 20, 30 वर्षे असा लोन परत करण्याचा कालावधी असतो. परंतु जास्तीत जास्त 20 वर्षांची परतफेड असलेल्या कर्जावरचं तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सबसिडी मिळू शकेल. यापेक्षा जास्त वर्षांच्या लोन रीपेमेंटवर तुम्हाला या सबसिडीचा लाभ घेता येणार नाही.
  3. प्रधानमंत्री आवास योजनेचं (PM Awas Yojana) स्वरूप असं आहे की, लाभार्थ्याला जी सबसिडी मिळते, ती मूळ कर्जाच्या रकमेतून वजा केली जाते. तुम्हाला बँक जे व्याज लावत त्या व्याजावर कोणतीही सूट दिली जात नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या बँकांद्वारे लोन घेतलेलं असाव ?

आपल्या देशातील सर्व प्रमुख सरकारी बँका आणि खाजगी बँका प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देतात. तसंच तुम्ही जर घर शहरी भागात खरेदी करत असाल, त्यावेळेस या योजनेसाठी आपण पात्र आहोत की नाही, आपण ज्या बँकेतून कर्ज घेतोय, ती बँक या योजनेचा लाभ घेऊ देईल की नाही, हे तपासून घेणे खूप महत्त्वाचं आहे.

Namo Drone Didi Yojana 2024 | नमो ड्रोन दीदी योजनेची माहिती

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंतचं सर्वांना घरे मिळतील, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु सरकारला हे लक्ष पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे 2024 च्या आर्थिक बजेटमध्ये पुढील पाच वर्षात ग्रामीण भागात आणखीन 2 करोड घर बांधण्याचा निश्चय करण्यात आला आहे आणि सरकारने तीन कोटी घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं ठरवलंय.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वपूर्ण कागदपत्रे

या PM Awas Yojana लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील प्रमाणे कागदपत्रे तयार असायला हवीत

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. रेशन कार्ड
  4. वोटर आयडी
  5. बँक अकाउंट पासबुक
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. मोबाईल नंबर
  8. वयाचा दाखला
प्रधानमंत्री आवास योजना यशस्वी आहे का ?

आपल्या देशात लोकसंख्या वाढ ही मोठी समस्या आहे. कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न, रोजगाराच्या समस्या, वाढती महागाई या समस्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ही खूपच मोठी आणि महत्त्वपूर्ण योजना आहे. ती नक्कीचं गेम चेंजरही ठरू शकते.

मागील 8 वर्षांमध्ये कोट्यावधी घरं या योजनेअंतर्गत बांधली गेली आहेत. अनेक लोकांना सबसिडी देण्यात आली आहे. अनेकांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्नही पूर्ण झालंय.

त्यामुळे ही योजना नक्कीचं यशस्वी आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. परंतु आपल्या देशात ज्याप्रकारे लोकसंख्या वाढ होत आहे. महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे ही योजना काही काळापूर्ती मर्यादित ठेवणं, हे चुकीचं वाटतं. ही योजना पुढे काही वर्ष सुरू ठेवली, तर नक्कीच अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल यात शंका नाही.

याआधी ज्या सरकारी योजना अस्तित्वात होत्या आणि त्यात जी घरे बांधले जायची, त्यामध्ये शौचालय, पाण्याचा नळ, वीज कनेक्शन अशा सुविधा पुरवल्या जात नव्हत्या. परंतु प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी घरे बांधली जातात, त्यामध्ये शौचालय, नळ आणि वीज कनेक्शन या गोष्टींकडेही विशेष लक्ष दिलं जातं. म्हणजेचं जी घर आहेत, ती परिपूर्ण असतात आणि एक कुटुंब तेथे आनंदाने राहू शकत.

FAQ About PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
  1. प्रश्न : PM Awas Yojana कधी सुरू करण्यात आली ?

उत्तर : ही योजना 1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आली.

  1. प्रश्न : प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन वेगवेगळे भाग आहेत का ?

उत्तर : होय, या योजनेचे दोन वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी.

  1. प्रश्न : प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत कोणता लाभ दिला जातो ?

उत्तर : प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मूळ कर्जाच्या रकमेवर 2 लाख 65 हजार रुपयांची सबसिडी दिली जाते.

  1. प्रश्न : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात किती घर बांधण्याचे उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं ?

उत्तर : या PM Awas Yojana योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 2 कोटी 95 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं.

PM Awas Yojana ही आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहे. आजपर्यंत या योजनेअंतर्गत अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न साकार झालंय. धकाधकीच्या युगात प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं, हे स्वप्न असतं आणि ही योजना त्यासाठी गेमचेंजर ठरली आहे.

तुमच्या मनात प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे राबवल्या जाणाऱ्या इतर योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवरील इतर लेखही नक्कीच वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top