Petrol Price Today पेट्रोल आणि डिझेलच्या किमती हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा सरकार या किमती कंट्रोल करायचं, तेव्हा एक रुपयांची वाढ झाली, तरी मोठी बातमी व्हायची. परंतु मागील काही वर्षांपासून सरकारने पेट्रोल कंपन्यांना किंमत कमी किंवा जास्त करण्याचा हक्क दिला आहे आणि रोजच्या रोजचं या किमतींमध्ये बदल होतो. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीत खूप मोठी वाढ किंवा घट झाल्याशिवाय ग्राहकांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही की, पेट्रोलच्या किमती किती वाढल्यात की कमी झाल्यात.
परंतु कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा इतर कोणताही कारणासाठी आपल्याला आपल्या गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल तर भरावचं लागतं. त्यामुळे आज तुमच्या शहरात पेट्रोलची किंमत काय आहे, आपण याबद्दल जाणून घेऊया. त्याचबरोबर देशाच्या विविध भागात पेट्रोलची किंमत काय आहे ? कुठे स्वस्त आणि कोठे महाग पेट्रोल मिळतं ? तेही जाणून घेऊया.
Petrol Price Today
आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमध्ये सध्या 1 लिटर पेट्रोलची किंमत 104 रुपये 76 पैसे आहेत. मागील काही महिन्यांपासून 107 रुपयांपेक्षा किंमत कमी आहे. परंतु देशाच्या राजधानीचा विचार केला गेला, तर दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत फक्त 94 रुपये आहे. म्हणजे मुंबई आणि दिल्लीचा भावामध्ये तब्बल 10 रुपयांची तफावत आहे.
काय सांगता ? सोनं मिळतंय फक्त ४२ हजार रुपये प्रति तोळ
हैदराबाद सोडलं, तर आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये सर्वात महाग पेट्रोल (Petrol Price Today) मिळतं. तर दिल्ली आणि चंदीगड यासारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल (Petrol Price Today) मिळतं.
Diesel Price Today
या तर झाल्या पेट्रोलचा किमती, आता आपण डिझेलच्या किमतीबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्रात डिझेलची किंमत 92 रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे. तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये डिझेल 87 रुपये प्रति लिटर या किमतीत मिळतं. म्हणजेचं पेट्रोल प्रमाणे डिझेलच्या किमतीतही दिल्ली आणि मुंबईच्या भावांमध्ये पाच रुपयांची तफावत आहे.
महाराष्ट्रात संपूर्ण देशात सर्वात महाग डिझेल मिळतं, तर दिल्ली आणि चंदीगडसारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये डिझेल स्वस्तात मिळतं. या किमतीमध्ये रोजचं काही ना काहीतरी बदल घडत असतो. त्यामुळे किमती कमी जास्त होत आहेत, याकडे आता सर्वसामान्य ग्राहकांचं जास्त लक्ष राहत नाही.
तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल ? रोजच किमती बदलत असल्यामुळे ग्राहकांचं पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीकडे दुर्लक्ष होत आहे का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !