Pavbhaji Recipe In Marathi
Pavbhaji Recipe In Marathi घराबाहेरचं खायला तर आपल्याला प्रत्येकालाच आवडतं. वडापाव, समोसा, सँडविच, कचोरी, बटाटा वडा हे आपल्या सर्वांचेच आवडते पदार्थ आहेत. मग आठवड्यात एकदा नाहीतर महिन्यातून आपण घरातलं जेवण सोडून बाहेरचं खातोच आणि त्यातल्या त्यात फास्टफूड आपल्या सर्वांच्याच आवडीचा विषय आहे.
मार्केटमध्ये मिळणारे अनेक खाद्यपदार्थ आपण हमखास खात असतो त्यात पावभाजी ही तर प्रत्येकाचीच आवडती डिश आहे. पावभाजी ही टेस्टी असण्यासोबतच खूप हेल्दीसुद्धा असते त्यामुळे सर्वांचीच फेव्हरेट आहे. अनेकजण आपला आनंदाचा दिवस पावभाजी खाऊन साजरा करतात. बर्थडे असो किंवा मग सुट्टीचा दिवस प्रत्येकजण पावभाजी खायला पसंती देतो. लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत पावभाजी सर्वांनाच आवडते.
पाव आणि भाजी या दोन पदार्थांना मिळून आपली पावभाजी बनलीय. पावभाजीचा शोधदेखील आपल्या मुंबईतच लागला.
बाहेर मार्केटमध्ये अनेक ठिकाणी पावभाजी मिळते पण घरी बनवलेल्या पावभाजीची मजा काही वेगळीच असते. आपण घरीसुद्धा अगदी मार्केटसारखीच टेस्टी आणि हेल्दी पावभाजी बनवू शकतो. अनेकांना तर घरी बनवलेलेच खाद्यपदार्थ जास्त आवडतात.
त्यामुळे आज आपण हीच सर्वांची आवडती Pavbhaji Recipe In Marathi पावभाजी घरच्याघरी बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत.
Ingredients For Pavbhaji Recipe In Marathi | पावभाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
आपण चार ते पाच जणांची पावभाजी (Pavbhaji Recipe In Marathi) बनवण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य घेणार आहोत.
- 4-5 बटाटे
- 4 टोमॅटो
- 5 ते 6 कांदे
- 5 शिमला मिरची
- कोबी
- फ्लॉवर
- बीट
- एक वाटी वाटाणे
- आलं लसूण पेस्ट
- दालचिनी
- कोथिंबीर
- हळद
- चवीप्रमाणे मीठ
- पावभाजी मसाला
- बटर
- पाव
एवढ्या साहित्यात तुम्ही 4 ते 5 लोकांसाठी पुरेल अशी स्वस्त आणि मस्त पावभाजी Pavbhaji Recipe In Marathi बनवू शकतात.
पावभाजी बनवण्याची कृती
एकदम ऑथेंटिक पावभाजी बनवण्यासाठी तुम्ही खालील पाककृती नक्की फॉलो करा. तुम्हाला जर पावभाजीबरोबर कोणताही एक्सपेरिमेंट आवडत नसेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे.
1. पावभाजीमध्ये सर्वात महत्वाची असते ती म्हणजे भाजी. सर्वात आधी आपण आपली भाजी बनवून घेऊया. आता आपली झणझणीत आणि टेस्टी भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी एक पॅन गॅसवर ठेवायचा आणि त्यामध्ये दोन ते चार चमचे तेल टाकायचं आहे.
2. त्यानंतर कांदा चिरून घ्यायचा आणि कांदा चांगला लालसर फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा लालसर फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे.
3. मग पॅनमध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची ती पण छान पैकी फ्राय करून घ्यायची.
4. टोमॅटोची ग्रेव्ही तयार करून घ्यायचीय आणि ती टोमॅटोची ग्रेव्ही त्या कांद्यामध्ये टाकायची. हे मिश्रण छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं
5. या मिश्रणाला चांगले तेल सुटू द्यायचं आहे. मग त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसारही लाल तिखट टाकू शकता.
6. त्यानंतर दोन ते तीन चमचे पावभाजी मसाला टाकायचाय. हा पावभाजी मसाला तुम्ही मार्केटमधून आणू शकता किंवा तुम्हाला बाहेरचा मसाला नको असेल तर घरचे मसालेदेखील टाकू शकता. त्यानंतर लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबू टाकल्याने चव आणखीनच छान येते.
7. हा सर्व मसाला पुन्हा छान फ्राय करून घ्यायचाय. मग या मसाल्याला थोडं तेल सुटतं आणि हा आपला पावभाजीचा मसाला तयार आहे.
8. आता आपण घेतलेल्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने छान धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. कुकरमध्ये या सर्व भाज्या 10 मिनिटे छान शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे पावभाजीमध्ये छान मिक्स करता येतील आणि आपली पावभाजी छान टेस्टी होईल.
9. या मसाल्यामध्ये आपण ज्या भाज्या पावभाजी बनवण्यासाठी शिजवून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या छानपैकी मॅश करून घ्यायच्या आहेत.
10. Pavbhaji Recipe In Marathi सर्व भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपण जो सर्व मसाला बनवला होता त्यामध्ये पावभाजीसाठी मॅश केलेल्या सर्व भाज्या टाकून द्यायच्या आहेत.
11. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय. या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि छान पैकी शिजू द्यायचं. भाजीमध्ये बटर टाकायचंय त्यामुळे भाजीला खूपच छान टेस्ट येईल. वरून तुम्ही चवीसाठी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता.
12. आता आपली एकदम झणझणीत पावभाजी तयार आहे. तुम्ही कांदा आणि लसूण न वापरतादेखील पावभाजी बनवू शकता.
13. भाजी झाल्यानंतर आता आपण पावसुद्धा आणखीनच टेस्टी बनवून घेऊया. या पॅनमध्ये बटर आणि मसाले टाकून आपण पाव फ्राय करून घ्यायचे आहेत.
14. यानंतर एका प्लेटमध्ये कांदा, लिंबू आणि कोथिंबीरसोबत पावभाजी सर्व करायची आहे.
ही तर झाली (Pavbhaji Recipe In Marathi) साधी पावभाजी, पण यासोबतच तुम्ही बटर पावभाजी आणि चीज पावभाजीसुद्धा बनवू शकता.
Cheese Pavbhaji Recipe In Marathi चीज पावभाजी बनवण्याची कृती
पावभाजीची भाजी बनवून झाल्यानंतर तुम्ही त्यावर चीज किसून टाकू शकता म्हणजे तुमची स्पेशल चीज पावभाजी तयार होईल. ही चीज पावभाजी खूपच टेस्टी बनते आणि अनेकांचीच खूप फेव्हरेट असते. अनेकांना चीज पावभाजी आवडते, तर असेही काही पावभाजी लव्हर आहेत, ज्यांना वाटते कि चीजमुळे पावभाजीची ऑथेंटिक चव कमी होते. त्यामुळे हा संपूर्णपणे तुमचा चॉईस आहे कि, पावभाजीमध्ये चीज टाकायचं कि नाही.
बटर पावभाजी बनवण्याची कृती :
बटर पावभाजीसुद्धा खूपच सोप्या पद्धतीने बनवता येते. Pavbhaji Recipe In Marathi या तयार झालेल्या भाजीवर तुम्ही बटर टाकू शकता म्हणजे तुमची बटर पावभाजी तयार होईल. अमूल बटर हे पावभाजीसाठी हमखास वापरले जाते. बटर पावभाजी ही साध्या पावभाजीपेक्षा जास्त रुचकर लागते.
याशिवाय पावभाजीचे अनेक प्रकार आहेत. पनीर पावभाजीसुद्धा खूपच प्रसिद्ध आहे. पनीर पावभाजीसाठी भाजीमध्ये पनीर टाकला जातो आणि तुमची पनीर पावभाजी तयार आहे. पनीर पावभाजीसुद्धा सर्वांची खूपच फेव्हरेट आहे.
आजकाल मार्केटमध्ये पावभाजीच्या फ्लेवरमध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत. तुम्ही हे स्नॅक्ससुद्धा घरी नक्की बनवू शकता.
. पावभाजी टोस्ट
. पावभाजी ढोकळा
. पावभाजी बर्गर
. पावभाजी पुलाव
. पावभाजी पास्ता
. पावभाजी खाकरा
. कडधान्यापासून बनवलेली पावभाजी
. पावभाजी पिझ्झा
. पावभाजी डोसा
असे खूप सारे (Pavbhaji Recipe In Marathi) पावभाजीपासून बनवलेले नवनवीन स्नॅक्स उपलब्ध आहेत आणि खूप जास्त लोकप्रियदेखील आहेत. पावभाजी खाऊन बोर झाले असाल ते हे स्नॅक्स नक्की बनवा आणि ट्राय करा. पावभाजीच्या फॅन्सना हे स्नॅक्ससुद्धा नक्कीच आवडतील यात शंका नाही.
Pavbhaji Recipe In Marathi पावभाजी रुचकर बनवण्यासाठी महत्वाच्या टिप्स
पावभाजीमध्ये तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. बटरमुळे पावभाजी आणखीनच जास्त टेस्टी बनते. तुम्ही आवडीनुसार पावभाजीमध्ये भाज्या कमी किंवा जास्त करू शकता. कांदा, काकडी, लिंबू यासर्वांच्या वापरामुळे पावभाजीची टेस्ट आणखीनच वाढते.
पावभाजी हेल्दी असते का ? पावभाजी ही बहुतांश हेल्दी समजली जाते कारण पावभाजीमध्ये खूप साऱ्या भाज्या टाकल्या जातात ज्या अनेकदा सर्वच घरांमध्ये आवडीने खाल्ल्या जात नाहीत. पण या भाज्या पावभाजीत टाकल्या तर सगळे खूप आवडीने खातात आणि त्याचे फायदे सर्वांना मिळतात. यासोबतच तुम्ही मैद्यापासून बनलेले पाव खाण्याऐवजी गव्हापासून बनलेले पावदेखील खाऊ शकता. ते आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात.
मुंबईची फेमस पावभाजी कोणती आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खूपच टेस्टी पावभाजी मिळते पण सरदार पावभाजी ही खूपच फेमस आहे. अनेक दुसऱ्या ठिकाणी मिळणाऱ्या पावभाजी भरपूर लोकप्रिय आहेत. मुंबई स्टाईल पावभाजी तर सगळीकडेच खूप प्रसिद्ध आहे.
Pavbhaji Recipe In Marathi हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. पावभाजी हा आपल्या महाराष्ट्र राज्याचाच मूळ खाद्यपदार्थ मानला जातो. आपल्या मुंबईमध्ये कापड मिल कामगारांसाठी हलकं आणि लवकर पचणारे अन्न म्हणून पावभाजी हा पदार्थ खाल्ला जायचा पण सध्या महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशभरात हा खाद्यपदार्थ खूप आवडीने बनवला जातो आणि खाल्लासुद्धा जातो.
पावभाजी हा खूपच टेस्टी खाद्यपदार्थ आहे. यासोबतच अनेकांच्या बजेटमध्येही असते त्यामुळे सर्वांची पावभाजीला प्रचंड पसंती मिळते. पावभाजीत अनेक भाज्यांचे मिश्रण असते त्यामुळे ही डिश खूपच रुचकर बनते आणि तितक्याच आवडीने खाल्ली जाते.
पावभाजी घरी बनवायला किती वेळ लागतो. पावभाजी बनवण्यासाठी जवळपास १ तास लागू शकतो. पावभाजी खाल्ल्याने वजन वाढू शकते. हो पावभाजी खाल्ल्याने वजन वाढू शकते कारण यामध्ये बटर वापरले जाते ज्यामधून आपल्याला शरीराला भरपूर कॅलरीज मिळतात आणि यासोबतच पाव हा मैद्यापासून बनलेला असतो त्यामुळे पावभाजी खाल्ल्याने आपलं वजन वाढतं.
FAQ’s For Pavbhaji Recipe In Marathi पावभाजीबद्दल वारंवार विचारले जाणारे
1. पावभाजी घरची चांगली की बाहेरची ?
पावभाजी ही नेहमी घरचीच चांगली असते. बाहेरची पावभाजी ही स्वच्छ आणि टेस्टी असेलच असं नाही. यात वापरल्या जाणाऱ्या भाज्या आणि खाण्याचा रंग चांगल्या दर्जाचा असेल का याबाबत शंका असते पण याउलट घरची पावभाजी ही नेहमी स्वच्छ आणि टेस्टी असते. यासोबतच प्रत्येकाच्या बजेटमध्येही बसते.
2. Pavbhaji Recipe In Marathi छान कलर येण्यासाठी काय करावं ?
पावभाजीला छान कलर येण्यासाठी मार्केटमध्ये मिळणारा खाण्याचा रंग टाकण्याऐवजी बीट भाजीमध्ये घालावा म्हणजे पावभाजीला छान रंग येईल. बीट टाकल्यामुळे पावभाजी आणखीनच जास्त आरोग्यदायी बनते.
3. पावभाजी टेस्टी बनण्यासाठी कोणता मसाला वापरावा ?
पावभाजी अगदी मार्केटसारखी बनावी यासाठी सर्वचजण बाहेर मिळणारे तयार मसाले वापरतात. यामुळे पावभाजीला अगदी बाहेरच्यासारखीच चव येते आणि सगळे आवडीने खातात. पण जर तुम्हाला बाहेरचा बनलेला पावभाजी मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही घरात असणारे मसाले वापरून देखील पावभाजी बनवू शकता.
4. Pavbhaji Recipe In Marathi खाल्ल्याचे नुकसान कोणते ?
पावभाजी खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. यातून तुमच्या शरीराला जास्त कॅलरीज मिळतात. पण तुम्ही रेसिपीमध्ये बदल करून याचा आस्वाद घेऊ शकता.
मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा आपल्या घरच्यांसाठी ही टेस्टी आणि हेल्दी पावभाजी (Pavbhaji Recipe In Marathi) बनवा आणि मस्त टेस्ट करा. तुमच्या घरच्यांना ही मस्त पावभाजी नक्कीच आवडेल आणि ते तुमचं खूप कौतुकदेखील करतील. अशाप्रकारची पावभाजी तुम्ही घरात नेहमीसुद्धा बनवू शकता म्हणजे तुम्हाला कधीच मार्केटची पावभाजी खाण्याची गरज पडणार नाही आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
खूप खूप धन्यवाद.