Patal Pohyancha Chivda Marathi Recipe
Patal Pohyancha Chivda Marathi Recipe चिवडा हा आपल्या सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी आपली आई आपल्याला नेहमी चिवडाच खायला द्यायची. विशेषतः दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी मक्याचा चिवडा, पातळ पोह्यांचा चिवडा असे अनेक प्रकारचे चिवडा बनवले जातात. दिवाळीच्या फरळात या चिवड्याला खूप महत्व असतं.
खमंग पातळ पोह्यांचा चिवडा हा खूपच टेस्टी असतो. खाताना एकदम कुरकुरीत लागणारा हा चिवडा कधी संपतो ते कळतसुद्धा नाही. घरातील लहानमोठ्यांना पातळ पोह्यांचा चिवडा प्रचंड आवडतो त्यामुळे प्रत्येक घरात हा चिवडा जरा जास्तच बनवला जातो. अतिशय टेस्टी असल्यामुळे दिवाळीनंतरही हा चिवडा अनेकदा आपल्या घरी बनतच असतो.
घरी पाहुणे आल्यानंतरही आपण हा चिवडा त्यांना खायला देऊ शकतो. असा हा पातळ पोह्यांचा चिवडा बनवायलाही खूप सोपा असतो. आज आम्ही तुमच्यासाठी खमंग पातळ पोह्यांचा चिवडा Patal Pohyancha Chivda Marathi Recipe बनवण्याची सोपी रेसिपी आणि त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचीही रेसिपी घेऊन आलो आहोत.
चिवड्याचा मसाला बनवण्याचं साहित्य :
पातळ पोह्यांचा चिवडा Patal Pohyancha Chivda Marathi Recipe बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
मसाला बनवण्याचं साहित्य
आपण पाव किलो पोह्यांच्या प्रमाणात मसाला बनवतोय
- 3 पाव चमचा मीठ
- 2 चमचे साखर
- 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड
- पाव चमचा हळद
- 1 चमचा लाल मिरची पावडर
- 2 चमचे धने
- अर्धा चमचा बडीशेप
- पाव चमचा लिंबू सत
- अर्धा चमचा काळं मीठ
- अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला
- चिमूटभर हिंग
पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याचं साहित्य :
- पाव किलो कागदी पोहे
- 5-6 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- 3 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे
- कढीपत्त्याची पानं
- 2 कप मुरमुरे
- थोडंसं तेल
- चिमूटभर हळद
- थोडंसं मीठ
- 2 कप तेल
- 1 कप शेंगदाणे
- पाव कप काजू
- अर्धा कप खोबऱ्याचे काप
- 1 कप फुटण्याच्या डाळ्या
- पाव कप किशमिश
- 2 मोठे चमचे तेल
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धा चमचा जिरे
- 12-15 लसणाच्या पाकळ्या
- 1 चमचा तीळ
पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याची कृती :
- पातळ पोह्यांचा चिवडा Patal Pohyancha Chivda Marathi Recipe बनवण्यासाठी सर्वात आधी आपण चिवड्याचा मसाला तयार करून घेऊया. आपण पाव किलो पोहे घेणार आहोत या प्रमाणातच सर्व साहित्य घ्यायचंय.
- सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 पाव चमचा मीठ, 2 चमचे साखर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे धने, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा लिंबू सत, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला, चिमूटभर हिंग टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आपला चिवडा मसाला तयार आहे. तुम्ही हा मसाला कोणताही चिवडा बनवताना वापरू शकता. चिवडा खूपच छान बनेल.
- चिवडा बनवण्यासाठी Patal Pohyancha Chivda Marathi Recipe आपल्याला पाव किलो कागदी पोहे घ्यायचे आहेत. हे पोहे 2 दिवस उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. आपले पोहे आधीच छान कुरकुरीत आहेत. 5-6 हिरव्या मिरच्यांचे बारीक काप करून उन्हात वाळवून घेतलेले आहेत. 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. 2 कप मुरमुरे घ्यायचे आहेत.
- आता आपण पोहे भाजून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल, चिमूटभर हळद टाकायची आणि मग पोहे टाकायचे. हे पोहे आपण 2-3 बॅचेसमध्ये भाजून घेणार आहोत.
- वरून थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पोहे आकसत नाहीत. मीठ, तेल आणि हळद टाकली तर पोह्याचा शेप जसाच्या तसा राहतो आणि पोहे छान कुरकुरीत भाजले जातात. गॅस कमी फ्लेमवर ठेवूनच आपल्याला हे पोहे भाजायचे आहेत. आपले पोहे छान कुरकुरीत भाजून झालेत. आता हे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे. उन्हात ठेवल्यामुळे आपले पोहे कुरकुरीत होतेच.
- आता आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचेत. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल, हळद, मीठ टाकायचं आणि मुरमुरे टाकून छान भाजून घ्यायचे. जर तुम्हाला फक्त पातळ पोह्यांचा चिवडा करायचा असेल तर मुरमुरे नाही टाकले तरी चालतील. मुरमुरे छान कडक झाले की ते पोह्यांसोबत भांड्यात काढून घ्यायचे.
- एका कढईमध्ये 2 कप तेल गरम करून घ्यायचं. त्या तेलात 1 कप शेंगदाणे तळून घ्यायचे. गॅस कमी फ्लेमवरच ठेवायचा आणि शेंगदाणे तडतडेपर्यंत तळून घ्यायचे. जास्त वेळ होऊ द्यायचे नाही नाहीतर ते काळे पडतात. हे शेंगदाणे तळून झाल्यावर लगेच पोहे आणि मुरमुऱ्यांमध्ये टाकायचे.
- त्यानंतर वाळवून घेतलेला कांदा खरपूस रंग येईपर्यंत तेलात तळून पोह्यांमध्ये टाकायचा. गॅस कमी फ्लेमवर ठेवायचा. कांदा वाळलेला आहे म्हणून लवकर जळतो.
पाव कप काजू लवकरच तळून त्यात टाकायचे. - अर्धा कप खोबऱ्याचे काप खरपूस रंग येईपर्यंत तेलात तळून पोह्यांमध्ये टाकायचे. त्यानंतर 1 कप फुटण्याच्या डाळं तेलात तळून टाकायचे. पाव कप किशमिश तेलात तळून त्यात टाकायची.
- सगळ्यात शेवटी कढीपत्त्याची पानं छान कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळायचे आणि पोह्यांमध्ये टाकायचे. गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि 2-3 मिनिटे तेलात ठेवायचं. सगळं छान कुरकुरीत झालंय.
- आता आपण फोडणी करून या चिवड्यामध्ये घालणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 12-15 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या, लसणाचा रंग बदलायला लागल्यावर उन्हात वाळवलेल्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. 1 चमचा तीळ टाकायचं आणि गॅस कमी फ्लेमवर ठेवून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं.
- लसूण आणि मिरची कुरकुरीत झाली की आपण तयार केलेला चिवड्याचा मसाला घालायचा. गॅसचा फ्लेम कमी ठेवून 1 मिनिट मसल्यासोबत परतून घ्यायचा आणि मग गॅस बंद करून थोडावेळ तसंच परतून घ्यायचं आणि हा मसाला पोह्यांच्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचा.
- एकदा हाताने हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर साखर किंवा मीठ काही कमी वाटत असेल तर टाकू शकता पण आपण घेतलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे.
- चिवडा Patal Pohyancha Chivda Marathi Recipe शेवटपर्यंत कुरकुरीत ठेवायचा असेल तर हा चिवडा पूर्ण तयार झाल्यावर त्याला पुन्हा एकदा भाजून काढायचा. हा चिवडा आधीच कुरकुरीत आहे पण याला अजून एकदा भाजून काढल्यावर हा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो.
गॅसच्या कमी फ्लेमवर पोहे छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे. साधारण 6 ते 7 मिनिटे चिवडा भाजून घ्यायचा आणि मग गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवायचा. हा Patal Pohyancha Chivda Marathi Recipe 15 दिवस ते 1 महिना तुम्ही खाऊ शकता.
Gol Kanda Bhaji Marathi Recipe | गोल कांदा भजी रेसिपी 2024
आपला खमंग आणि अगदी कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा Patal Pohyancha Chivda Marathi Recipe तयार आहे. तो तुम्ही तुमच्या घरच्यांना सर्व्ह करू शकता.
Important Tips For Patal Pohyancha Chivda Marathi Recipe
- पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी कागदी पोहे 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान कुरकुरीत होतात.
- पोहे भाजताना वरून थोडंसं मीठ घातलं तर पोहे आकसत नाहीत. तेल, मीठ आणि हळद टाकली तर पोह्यांचा शेप तसाच राहतो आणि पोहे छान कुरकुरीत भाजले जातात.
- तुम्हाला फक्त पातळ पोह्यांचा चिवडा बनवायचा असेल तर त्यात मुरमुरे नाही टाकले तरी चालतील.
- सर्व वस्तू तळताना गॅस कमी फ्लेमवरच ठेवायचा आणि 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये राहू द्यायच्या.
- तुम्हाला चिवडा जर शेवटपर्यंत कुरकुरीत ठेवायचा असेल तर चिवडा तयार झाल्यावर तो पुन्हा एकदा भाजून काढायचा. गॅस कमी फ्लेमवर ठेवून चिवडा 6 ते 7 मिनिटे भाजून घ्यायचा म्हणजे तो शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो.
अशा सर्व टिप्स वापरून तुम्ही कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा घरीच बनवू शकता.
FAQ’s For Patal Pohyancha Chivda Marathi Recipe
- Patal Pohyancha Chivda Marathi Recipe कसा बनवला जातो ?
पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल, मीठ, हळद आणि पोहे टाकून भाजून घ्यायचे आणि एका भांड्यात काढायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल, मीठ, हळद टाकून मुरमुरे भाजायचे आणि पोह्यांमध्ये टाकायचे. यानंतर तेलामध्ये शेंगदाणे, कांदा, खोबऱ्याचे काप, काजू, किशमिश, कढीपत्त्याची पानं तळून पोह्यांमध्ये टाकायचे. त्यानंतर जिरे, मोहरी, लसूण, हिरव्या मिरच्या, तिळ, मसाल्याची फोडणी करून पोह्यांमध्ये टाकायची. हाताने हे सगळं मिक्स केल्यावर आपला चिवडा तयार होईल.
- पोह्यांमुळे ऍसिडिटी होते का ?
पोहे हा आपल्या सर्वांचा आवडता नाश्ता आहे. अनेकदा आपण हे पोहे खात असतो पण पोहे आंबटपणा निर्माण करणारं अन्न आहे त्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते.
- पातळ पोह्यांचा चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी काय करावं लागेल ?
आपल्याला पातळ पोह्यांचा चिवडा जास्त दिवस कुरकुरीत ठेवायचा असेल तर चिवडा पूर्ण बनवल्यावर तो कमी गॅसवर कढईमध्ये पुन्हा एकदा 6 ते 7 मिनिटे भाजून घ्यायचा. गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवायचा. यामुळे चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहतो.
- हा पोह्यांचा चिवडा किती दिवस चांगला राहू शकतो ?
हा पातळ पोह्यांचा चिवडा छान भाजून घेतल्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत चांगला राहू शकतो पण हा चिवडा इतका टेस्टी बनतो की काही दिवसांतच संपून जाईल.
आपला खमंग पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे. दिवाळीच्या फराळामध्ये बनवला जाणारा हा चिवडा सगळेजण खूप आवडीने खातात. तुमच्या घरच्यांना हा चिवडा सर्व्ह करू शकता. सगळ्यांना हा चिवडा खूपच आवडेल. तुम्ही ही चिवड्याची रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा.
तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी Patal Pohyancha Chivda Marathi Recipe आवडली का नक्कीच सांगा. अशाच खमंग रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.