Paris Olympics 2024. येत्या 26 जुलै 2024 पासून पॅरिस ऑलिंपिकला सुरुवात होत आहे. भारतीय संघ पॅरिस ऑलिंपिकसाठी रवानाही झालाय. यावेळेस आपण नक्कीचं इतिहास रचू आणि टोक्यो ऑलिंपिकपेक्षा जास्त पदक मिळवू अशी सर्वांनाच आशा आहे.
आजपर्यंत ऑलम्पिकच्या इतिहासात भारताने अनेक सुवर्णपदकं, रौप्य पदक आणि कांस्यपदकं जिंकली आहेत. परंतु वैयक्तिक स्पर्धेत पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवणारा पहिला भारतीय एक मराठी माणूस होता. आपल्या महाराष्ट्राचे महान पैलवान खाशाबा जाधव. हे ऐकल्यावर प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून येईल यात शंका नाही.
Paris Olympics 2024
खाशाबा जाधव यांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदकाची कमाई केली होती. खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म साताऱ्यातील एका मराठी कुटुंबात 1926 मध्ये झाला. त्यांचे वडीलसुद्धा एक कुस्तीपटू होते आणि वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी खाशाबा जाधव यांना कुस्तीचे धडे गिरवायला सांगितले.
परंतु त्यांच्याकडे पाहून ते इतके मोठे कुस्तीपटू असतील, असं कोणालाही वाटत नव्हतं. त्यामुळेचं कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना कॉलेजच्या कुस्ती संघातही प्रवेश मिळाला नव्हता. परंतु त्यानंतर कॉलेजच्या प्रिन्सिपलने सांगितल्यामुळे त्यांना कुस्ती संघात भाग मिळाला आणि मग त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
1948 च्या लंडन ऑलम्पिकमध्ये त्यांनी सर्वप्रथम भाग घेतला. पण ते सहाव्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर त्यांनी हेलसिंकी ऑलिंपिकसाठी आणखी जोमाने तयारी सुरु केली आणि या स्पर्धेसाठी पात्र ठरले.
परंतु हेलसिंकीला जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने त्यांना 7000 रुपयांची मदत केली आणि राज्य सरकारने 4000 रुपये दिले. परंतु तरीही पैसे कमी होते. त्यामुळे खाशाबा जाधव यांना स्वतःचं राहत घर गहाण ठेवावं लागलं आणि इतर अनेक लोकांच्या मदतीने ते हेलसिंकी पोहोचले.
तू भेटशी नव्याने मालिकेचे कलाकार
या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव आपले पहिले पाचही कुस्तीचे सामने जिंकत सुवर्णपदकाचे मोठे दावेदार बनले होते. परंतु सहाव्या कुस्तीमध्ये ते जपानच्या पैलवानाकडून हरले आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातचं त्यांना पुढची कुस्ती खेळावी लागली.
हे नियमबाह्य होतं. त्यांना कमीत कमी 30 मिनिटांचा आराम द्यायला हवा होता. परंतु कोणताही भारतीय अधिकारी त्यांच्याबरोबर नव्हता. त्यांना इंग्रजीही ठीकठाक येत नव्हतं. त्यामुळे त्यांना स्वतःची बाजू मांडता आली नाही आणि ही कुस्ती लढावी लागली. अति थकवा आल्यामुळे आणि पुरेसा आराम न मिळाल्यामुळे ते कुस्ती हरले आणि शेवटी त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तरीही त्यांनी इतिहास रचला होता. कारण स्वतंत्र भारताच्या इतिहासात ऑलम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते.
भारतात परतल्यानंतर 101 बैलगाड्याची मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांना मुंबई पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरी मिळाली आणि पुढे ते रिटायरमेंट पर्यंत असिस्टंट पोलीस कमिशनरही बनले.
अशा या महान कुस्तीपटूला आपण शतशत नमन करूया आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !