Panchmukhi Hanuman Avatar Katha : बजरंगबलींनी पंचमुखी अवतार का घेतला ?

Panchmukhi Hanuman Avatar Katha

Panchmukhi Hanuman Avatar Katha संकटमोचन हनुमान की जय, जय बजरंग बली हे नाव एकदा जरी घेतलं, तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये  एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच शक्ती निर्माण होते. कितीही मोठ संकट असलं, तरी आपले बजरंगबली, संकटमोचन हनुमान ते संकट  नक्कीच दूर करतील, अशी प्रत्येकाला शंभर टक्के शाश्वती असते.

बजरंगबली हे फक्त आपल्या भक्तांचंच संकट दूर करत नाही, तर ते ज्यांचे परमभक्त आहेत, त्या प्रभू श्रीरामांवरील एक खूप मोठ संकट त्यांनी दूर केलं होतं आणि हे संकट दूर करत असताना त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या पंचमुखी हनुमान Panchmukhi Hanuman Avatar Katha अवताराचंही दर्शन घडवलं.

Panchmukhi Hanuman Avatar Katha

तुम्ही पंचमुखी बजरंगबलींचं दर्शन नक्कीचं केलं असेल. अनेकांच्या घरात पंचमुखी हनुमान अवताराची मूर्ती किंवा प्रतिमा असते. पण तुम्हाला माहितेय का या पंचमुखी हनुमान अवताराचीची गोष्ट ? बजरंग बली यांनी पंचमुखी अवतार का घेतला आणि कसा आहे हा अवतार ? या अवतारातील पाच मुख कोणते आहेत ? या पाच मुखांचं महत्त्व काय आहे ? आज आपण Panchmukhi Hanuman Avatar Katha त्याबद्दलचं जाणून घेऊया.

पंचमुखी हनुमान अवताराची कथा आहे  रामायणातील. जेव्हा प्रभू श्रीराम माता सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्रीलंकेत पोहोचले आणि युद्धाला सुरुवात झाली, तेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यावर एक खूप मोठ संकट आलं.

आपल्या सर्वांना रावणाचे दोन भाऊ तर माहित आहेत. पहिला आहे विभीषण आणि दुसरा कुंभकर्ण. परंतु यांच्या व्यतिरिक्त रावणाला अजून एक भाऊ होता, त्याचं नाव होतं अहिररावण. अहिररावण हा पाताळात राहायचा

बजरंगबलींनी पंचमुखी अवतार का घेतला ?

प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर रावणाने त्याचा भाऊ अहिररावणची मदत मागितली. अहिररावण रावणासारखाचं मायावी राक्षस होता. अहिररावणने त्याच्या मायावी शक्तीने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना बेशुद्ध केलं, मूर्च्छित केलं आणि तो या दोघांना घेऊन पाताळात आला.

आता प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना अहिररावणच्या तावडीतून कसं सोडवायचं, हाच प्रश्न वानरसेनेला पडला होता. तेव्हा संकटमोचन बजरंग बली पाताळात गेले. परंतु प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना कसं सोडवावं हे त्यांना कळत नव्हतं. जोपर्यंत अहिररावणचा वध केला जात नाही, त्याचा मृत्यू होत नाही. तोपर्यंत त्याच्या मायावी बंधनातून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला सोडवणं अशक्य होतं. कारण अहिरावण हा मायावी राक्षस होता आणि त्याने मरण येऊ नये यासाठी एक माया रचली होती.

त्याला असं वरदान प्राप्त होतं की, जोपर्यंत पाताळाच्या पाच दिशेत लावलेले दिवे एकाच वेळेस कुणी विझवत नाही, तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही आणि एकाच व्यक्तीने, एकाच वेळेस पाच दिशेत लावलेले दिवे विझवणं, हे जवळपास अशक्य होतं.

पंचमुखी हनुमान अवतार कथा

परंतु आपल्या बजरंग बलीसाठी काहीही अशक्य नाही. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना वाचवण्यासाठी त्यावेळेस बजरंग बली यांनी पंचमुखी अवतार घेतला. पाच दिशांमध्ये त्यांचे पाच मुख प्रकट झाले आणि याच बजरंगबलींच्या अवताराला पंचमुखी हनुमान अवतार Panchmukhi Hanuman Avatar Katha असं म्हटलं जातं.

या पाच मुखांच्या सहाय्याने बजरंग बली यांनी अहिररावणने पाच दिशेत लावलेले पाच दिवे एकाच वेळेस विझवले आणि त्यानंतर अहिररावणचा वध केला. अहिररावणचा मृत्यू झाल्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे त्याच्या बंधनातून मुक्त झाले आणि मग पुन्हा एकदा रावणाविरुध्दच्या युद्धात सामील झाले.

रामायणातील या घटनेनंतरचं बजरंग बली यांचा पंचमुखी हनुमान अवतार Panchmukhi Hanuman Avatar Katha प्रसिद्ध झाला आणि आजही त्याची पूजा केली जाते. 

16 वेळेस रामायण पाहिलेले काकभुशुंडी कोण आहेत ?

पंचमुखी हनुमान अवतार महात्म्य

पंचमुखी हनुमान अवताराला खूप महत्त्व आहे. आपण या पाच मुखांबद्दल जाणून घेऊया.

पंचमुखी हनुमान अवतारात Panchmukhi Hanuman Avatar Katha पहिलं मुख आहे वानर मुख. हे वानर मुख पूर्व दिशेत आहे आणि ते शत्रूंवर विजय मिळवून देतं.

दुसरं मुख आहे, गरुड मुख. हे मुख पश्चिम दिशेत आहे आणि ते आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करत.

तिसरं मुख आहे, वराह मुख. हे मुख हे उत्तर दिशेत असून ते व्यक्तीला दीर्घायुष्य, प्रसिद्धी आणि शक्ती देत.

चौथं मुख आहे, नृसिंह मुख आणि हे मुख दक्षिण दिशेत असून ते आयुष्यातील भीती, तणाव आणि अडचणी दूर करतं.

पाचवं मुख आहे अश्व मुख. हे मुख आकाशाच्या दिशेने आहे आणि ते इच्छा पूर्ण करतं.

पंचमुखी हनुमान अवताराची Panchmukhi Hanuman Avatar Katha पूजा करण्याला खूप महत्त्व दिलं गेलंय. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी या पंचमुखी हनुमान अवताराची पूजा केली जाते.

बजरंग बली यांना अमरत्व प्राप्त आहे आणि असं म्हटलं जातं की, जेव्हा भगवान विष्णूंचा कल्की अवतार या पृथ्वीवर येईल. तेव्हा बजरंग बली पुन्हा एकदा प्रकट होतील आणि कली दानवाविरुद्ध असलेल्या लढाईत भगवान कल्की यांची मदत करतील.

आजही जिथे जिथे प्रभू श्रीराम यांची कथा सांगितली जाते, तिथे बजरंग बली नक्कीच येतात.

भारतातील प्रत्येक गावात बजरंगबलींचं एक मंदिर नक्कीच असतं. जेव्हा कधी कोणाला भीती वाटते, शक्तीची गरज असते, तेव्हा ते बजरंग बलींचं स्मरण करतात आणि ते नक्कीच प्रत्येकाला शक्ती देतात, भक्तांचं संकटंपासून रक्षण करतात. म्हणूनच त्यांना संकटमोचन हनुमान म्हटलं जातं.

कमेंट बॉक्समध्ये बजरंग बली की जय असं लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन पौराणिक कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top