Palak Vada Marathi Recipe 2024
Palak Vada Marathi Recipe 2024 कडक उन्हाळा सुरू आहे आणि आपल्या घरातील लहान मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. मुलं घरात असली की ती रोज काहीतरी नवीन चमचमीत खाण्याची फर्माईश करत असतात. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की त्यांना चटपटीत पण तेवढंच हेल्दी असं काय खायला द्यावं. कारण या उन्हाळ्यात त्यांचं आरोग्य चांगलं राहणं हेही तितकंच महत्वाचं आहे.
अशावेळी तुम्ही पालक वडा हा पदार्थ सहज बनवू शकता. पालक वडा Palak Vada Marathi Recipe 2024 हा खूपच स्वादिष्ट आणि हेल्दी पदार्थ आहे. जो तुमच्या घरातील लहान मुलांसह मोठ्यांनाही खूपच आवडेल आणि हा पालक वडा तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. पावसाळ्यात असा खमंग पालक वडा खाण्याची तर खूप मजा येईल. थंडीच्या दिवसांमध्येही हा पौष्टिक पालक वडा तुम्ही खाऊ शकता.
हा पालक वडा Palak Vada Marathi Recipe 2024 विशेषतः विदर्भातील खाद्यपदार्थ आहे. तिकडे हॉटेलमध्ये तसेच रस्त्याच्या बाजूला गाड्यांवर हा पदार्थ हमखास खायला मिळतो. हा पालक वडा कढी आणि तर्रीबरोबर आणखी टेस्टी लागतो. पालक वडा घरीसुद्धा बनवायला खूप सोप्यात बनवता येतो आणि अतिशय टेस्टीसुद्धा बनतो.
आज आम्ही तुमच्यासाठी पालक वडा बनवण्याची सोपी Palak Vada Marathi Recipe 2024 रेसिपी घेऊन आलो आहोत. हा पालक वडा तुम्ही नक्कीच बनवून पहा.
पालक वडा बनवण्याचं साहित्य :
पालक वडा Palak Vada Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
अर्धा कप मुगडाळ 3 ते 4 तास पाण्यात भिजवायची
1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
पाव कप बारीक चिरलेला कोबी
पाव कप बारीक चिरलेला पालक
1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
धने, जिरे आणि भाजलेली बडीशेपची कुटून घेतलेली पूड
थोडीशी हळद
चवीनुसार मीठ
2 ते 3 मोठे चमचे मैदा
3 मोठे चमचे बेसन
तळण्यासाठी तेल
पालक वडा बनवण्याची कृती :
1. पालक वडे Palak Vada Marathi Recipe 2024 दोन पध्दतीने बनवता येतात एक तर वडवळची डाळ वापरून किंवा मग दुसऱ्या पद्धतीने मुगडाळ वापरून बनवतात. आज आपण याच दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहोत.
पालक वडा Palak Vada Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी सर्वात आधी आपण अर्धा कप मुगडाळ 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि यामधील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. ही मुगडाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. अर्धा कप मुगडाळ भिजवून 1 कप झालेली आहे.
2. मूगडाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. त्यानंतर ती एका बाऊलमध्ये काढून घ्यायची. यामध्ये थोडेसे डाळीचे दाणे असायला हवेत. पूर्ण पेस्ट नाही करायची भरड ठेवायची आहे.
3. यामध्ये आपण एकेक करून साहित्य घालणार आहोत. 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, पाव कप बारीक चिरलेला कोबी, पाव कप बारीक चिरलेला पालक, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धने जिरे आणि भाजलेली बडीशेप कुटून घालायची, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 2 ते 3 मोठे चमचे मैदा, 3 मोठे चमचे बेसन हे सर्व हाताने कोरडंच मिक्स करून घ्यायचं.
यात पाणी टाकण्याची गरज पडत नाही. इथे आपण हे भिजवून घेतलेलं आहे. डाळीमध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घातलेलं होतं तेवढ्यामध्ये हे झालेलं आहे. याला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही.
4. आपलं बॅटर तयार आहे त्यामुळे आपण वडे तळणार आहोत. हे पालक वडे आकाराने मोठे असतात पण आपण मिडीयम आकाराचे करणार आहोत.
5. गॅसवर एका भांड्यामध्ये तेल तापवून घ्यायचं त्यानंतर हे वडे तळायचे. आपण दोन वेळा हे वडे तळणार आहोत. सर्वात आधी आपण या बॅटरचे मध्यम आकाराचे गोळे करून तेलामध्ये सोडणार आहोत. हे वडे आपण 50 टक्के मिडीयम गॅसवर शिजवून घेणार आहोत. त्यानंतर हे वडे काढून घेणार आहोत आणि मग थोडावेळ थंड झाल्यावर प्रेस करून पुन्हा तळणार आहोत. तेल मिडीयम गरम असायला हवं.
वडे दोनदा तळायचे कारण वड्याचा शेप मोठा असतो आणि असं बॅटर केल्यानंतर ते वडे थापता येत नाही. जरी थापले तरी तेलामध्ये सोडता येत नाही त्यामुळे या बॅटरचा गोळा करून तेलात तळले की त्याला कडकपणा येतो आणि मग तो प्रेस करून आपल्याला चपटा वडा करता येतो.
6. आपले वडे 50 टक्के तळले गेलेत आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळे वडे असेच तळून घ्यायचे. वडे थंड झाल्यावर हाताने प्रेस करून चपटे करायचे आणि मिडीयम फ्लेमवर तेलात टाकून तळून घ्यायचे. एका बाजूने 4 ते 5 मिनिटे तळून घ्यायचं आणि मग दुसऱ्या बाजूने तळायचं. वड्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे.
7. वडा तळून झाल्यानंतर तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा. सगळे वडे असेच तळून घ्यायचे. सुरुवातीला वड्यांना हात लावायचा नाही कारण ते तुटू शकतात. त्यांना छान कडकपणा येऊ द्यायचा आणि मग पलटवायचे. साधारण 3 ते 4 मिनिटे एका बाजूने तळून घ्यायचे. अशाप्रकारे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. याबरोबरच मिरच्यांना काप करून त्याही तेलात तळून घ्यायच्या आहेत.
8. आपले क्रिस्पी कुरकुरीत पालक वडे Palak Vada Marathi Recipe 2024 तयार आहेत. हे वडे तुम्ही असेही खाऊ शकता. मिरच्यांबरोबर खाऊ शकता किंवा मग कढी आणि चण्याच्या तर्रीसोबतही खाऊ शकता.
आता आपण हा पालक वडा Palak Vada Marathi Recipe 2024 प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया. एक प्लेट घ्यायची त्यामध्ये आपला क्रिस्पी वसा हाताने कुस्करून घालायचा. यावर चमच्याने कढी टाकायची आणि चण्याची तर्री टाकायची. आता तुम्ही हा कुरकुरीत पालक वडा घरच्यांना सर्व्ह करू शकता.
हा पालक वड्याचा झणझणीत बेत पावसाळ्यात थंडगार वातावरणात खूप मस्त लागतो तुम्ही एकदातरी नक्की बनवून पहा. इतके टेस्टी वडे घरीच बनवल्यानंतर तुम्हाला बाहेर जाऊन खाण्याची काहीच गरज नाहीये. घरीच सहज बनवून तुम्ही ते खाऊ शकता.
https://marathihelper.com/amla-muramba-marathi-recipe-2024
पालक ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर हिरवी पालेभाजी आहे. या भाजीमध्ये अनेक पोषणतत्वे असतात. पालक खाल्ल्यामुळे अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. आपल्याला निरोगी राहण्यासाठी पालक तर नेहमी खाल्लाच पाहिजे. पण अनेक घरांमध्ये पालक खाण्याचा कंटाळा केला जातो अशावेळी आपण पालकपासून काहीतरी Palak Vada Marathi Recipe 2024 चटपटीत रेसिपी बनवू शकतो म्हणजे यामार्गाने तरी पालक आपल्या पोटात जाईल.
पालक भजी, पालक पुरी, पालक कटलेट, पालक ढोकळा, पालक इडली, पालक वडा, पालक पुलाव, पालक चकरी, पालक सूप, पालक पराठा अशाप्रकारे तुम्ही पालकच्या अनेक रेसिपी बनवू शकता.
Palak Vada Marathi Recipe 2024 महत्वाच्या टिप्स :
1. वडे बनवण्यासाठी मुगडाळ भिजवून मिक्सरमध्ये वाटून घ्यायची पण त्यात डाळीचे दाणे असायला हवेत. भरड ठेवायची आहे. पूर्ण पेस्ट नाही करायची
2. पालक वड्याचं पीठ बनवताना धने, जिरे आणि भाजलेली बडीशेप कुटून घालायचं. हे नक्की टाकायचं यामुळे स्वाद छान येतो.
3. वड्याचं बॅटर तयार करताना याला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही.
4. या बॅटरचे आपण गोळे तयार करून तेलात तळणार आणि काढल्यानंतर पुन्हा दाबून चपटे करून तळणार. हे वडे दोनदा तळायचे कारण हे वडे आकाराने मोठे असतात. असं बॅटर केल्यावर हाताने थापता येत नाही. थापले तरी तेलात सोडता येत नाही त्यामुळे गोळा करून तेलात तळल्यावर कडक होतात आणि तो प्रेस करून चपटा वडा बनवून पुन्हा तळायचा.
5. वडे प्रेस करून तेलात तळायला टाकल्यावर सुरुवातीला हात लावायचा नाही ते तुटू शकतात त्यामुळे ते कडक होऊ द्यायचे.
वरील सर्व टिप्स वापरून हे कुरकुरीत Palak Vada Marathi Recipe 2024 पालक वडे तुम्ही घरीच बनवू शकता.
FAQ For Palak Vada Marathi Recipe 2024 काही महत्त्वाचे प्रश्न :
1. पालक वडा कसा बनवता येतो ?
पालक वडा Palak Vada Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी मुगडाळ पाण्यात भिजवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. त्यानंतर बाऊलमध्ये काढून घ्यायची. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धने जिरे आणि भाजलेली बडीशेपचा कूट, हळद, मीठ, मैदा, बेसन टाकून कोरडंच मिक्स करून घ्यायचं. आपलं पालक वड्याचं बॅटर तयार आहे वडे तळून घ्यायचे. या बॅटरचे गोळे तयार करून तेलात तळायचे आणि तेलातून काढल्यावर पुन्हा हाताने दाबून चपटे करून पुन्हा तेलात तळायचे. आपले पालक वडे तयार आहेत.
2. पालक भाजी खाण्याचे काय फायदे आहेत ?
पालकमध्ये आयरन, प्रोटीन, व्हिटॅमिन, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, क्लोरीन, खनिज लवण भरपूर प्रमाणात असतात. पालक खाल्ल्याने आपल्याला शरीराला अनेक फायदे होतात. पालक खाल्ल्याने शरीरातील आयरनची कमी दूर होते. डायबिटीजच्या पेशंटसाठी पालक फायदेशीर आहे. शरीरात जास्त ग्लुकोज बनण्यापासून रोकतं त्यामुळे डायबिटीज कंट्रोल राहतं. पालकात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात. पालकमध्ये नायट्रेट पोषकतत्वे भरपूर असतं त्यामुळे हार्ट अटॅक येत नाही. पालक खाल्ल्याने डोळे चांगले राहतात. पालकमध्ये फायबर जास्त प्रमाणात आणि कॅलोरी कमी प्रमाणात असतात त्यामुळे वजन कमी राहतं.
तुम्हाला जर या सुट्ट्यांच्या दिवसात काहीतरी टेस्टी आणि चटपटीत खायची इच्छा असेल तर हा पालक वडा Palak Vada Marathi Recipe 2024 एकदा नक्कीच बनवून खा. तुम्ही या पालक वड्याचे फॅन होऊन जाल हे नक्की. घरातल्या सर्वांनाही हा मस्त पालक वडा खूप आवडेल. तुम्हाला पटकन काही नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर ही पालक वडा रेसिपी अगदी सहज बनते. एकदा पालक वडा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल हे खरं आहे त्यामुळे आजच पालक वडा बनवा.
तुम्हाला ही Palak Vada Marathi Recipe 2024 रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच स्पेशल रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.