पारू फेम अभिनेता सचिन देशपांडे हा मराठी मालिकाविश्वातील अतिशय लोकप्रिय कलाकार आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची‘ या मालिकेतील भूमिकेमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय.
नुकताच तो झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या लोकप्रिय मालिकेत अजय ही भूमिका साकारताना दिसला होता. त्याची ही भूमिकासुद्धा प्रेक्षकांना फार आवडली होती.
पारू मालिकेतील अभिनेता
काल सचिनच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली. सचिनच्या बायकोचं नाव पियुषा आहे. तिने फायनान्स अँड मार्केटिंगमध्ये एमबीए केलंय. सचिन आणि पियुषाला एक मुलगीसुद्धा आहे.
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सचिनने आपल्या लग्नातील काही फोटो शेअर केलेत आणि पत्नीसाठी एक सुंदर पोस्टसुद्धा लिहली आहे.
त्याने या पोस्टमध्ये लिहलंय की,
सरकार झाली की ६ वर्ष पूर्ण
म्हणजे नवीन term च पण एक वर्ष पूर्ण केलंय आपण, ते ही यशस्वी पणे
अशा अनेक term माझं मत कायम तुम्हालाच पडणार आहे ह्याची खात्री
बाळगा.
पण गेल्या ६ वर्षातल हे वर्ष सगळ्यात कठीण होतं, एका कलाकाराशी लग्न करताना हा काळ आपल्या आयुष्यात येईल ह्याची तुला कल्पना जरी असली तरी तो काळ प्रत्यक्षात आल्यावर काय करायला हवं ह्याची पूर्व तयारी करता येत नाही, पण तरीही तू मला ह्या काळात जे काही सांभाळून घेतलस त्याला तोड नाही.
तुझं निव्वळ असणंच मला इतका Confidence देऊन जातं ना, तू आहेस म्हणुन मी तरलोय
अशीच कायम माझ्या बरोबर रहा आणि अशा अनेक पंचवार्षिक योजना आपण एकत्र पूर्ण करत राहू
बाकी हे तुझ्यासाठी खास
अमुक माझं तमुक तुझं जुनं माझं ताज तुझं भूत माझा भविष्य तुझं
साधना माझी यश तुझं आता जे काही आहे माझं ते सारं सारं तुझं
माझ्या परमेश्वरातला “प” ही तुझा आणि माझ्या श्रधेतलं स्थान ही तुझंच
I Love You
सचिनने आपल्या बायकोला ऍनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून वन प्लसचा मोबाईलसुद्धा गिफ्ट केलाय.
पारू मालिकेतून या अभिनेत्याने घेतली एक्झिट
आता सचिनसारखीच त्याची बायको पियुषानेही इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय. तिने लिहलं की,
याच दिवशी गेल्या वर्षी…..
संकल्प केला होता पटकन चिडण कमी करण्याचा..
तसा योग आला नाही की तू चान्स दिला नाहीस मला रागवण्याचा….?? आता, मी झाले समजूतदार की तू झालास शहाणा…
याचा हिशेब काही मांडत नाही…
कारण काहीही असलं तरी एवढं मात्र नक्की की आपलं एकमेकांशिवाय
काहीही होऊ शकत नाही…..
लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…. नवऱ्या…
बाकी दिनचर्ये प्रमाणे तुझं माझं मीराच ब्रीदवाक्य…..
“घट्ट मिठी, भरपूर सारं प्रेम, । भयंकर लव्ह यू…”
आणि खास गिफ्ट साठी खुप thank you…..now I m in your “one plus”community….
सचिन आणि पियुषाच्या पोस्टवर अनेक फॅन्सनी आणि मराठी कलाविश्वातील कलाकारांनी सुंदर कमेंट्स करत या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पारू मालिकेतील त्याची भूमिका सर्वाना आवडलेली.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !